sawidhan

Directions

sawidhan savidhan kay he

03/07/2026
24/10/2024

२००१ ते २०१९ च्या दरम्यान मी भारिप बहुजन महासंघ असा माझा प्रवास होता .परंतु नंतर मला माझ्या प्रोफेशन वर लक्ष केंद्रित करायचं होत म्हणून मी सक्रिय कार्यक्रम यातून ब्रेक घेतला यात काही बाळासाहेब आंबेडकर यांच्या जवळ असणारे ज्यांचा कधी चळवळीत संबंध नव्हता म्हणून ते ही कारण म्हणून मी बाहेर पडलो. परंतू Balasaheb Ambedkar आणि Anjali Maydeo ताई यांनी मला नेहमीच मुलाप्रमाणे वागणूक दिली .२००९ नंतर सोशल मीडिया मध्ये पक्षाची ओळख असावी अशी मांडणी केली त्याला बाळासाहेब आंबेडकर यांनी संमती दिली त्यानंतर आयटी विभाग ची स्थापना केली .त्याची मुख्य जबाबदारी बाळासाहेबांनी माझ्यावर दिली .पक्षाचे अनेक कार्यक्रम, कॅडर कॅम्प घेण्यास सुरुवात केली त्यात महाराष्ट्रभरातून तरुण मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागला . आंबेडकर भवन पडणारा रत्नाकर गायकवाड याचे भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा करून बाळासाहेबांना सुपूर्द केले .रोहित वेमुला आंदोलन असो की जातिनिर्मुलन परिषदा असा मोठा प्रवास होता.

अनेक विरोधी लोक बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बी टीम चा आरोप करतात.पैसे घेतल्याचे आरोप करतात परंतु मी अनेक वेळा बाळासाहेब सोबत असायचो निवडणुकीत प्रचार असो कार्यक्रम असो बाळासाहेबाना जेवणाची पण काळजी नसायची .अनेक वेळा वडा पाव सोबत खाल्लेला आहे .प्रचारात असताना घरून बाळासाहेबासाठी आणलेला डब्बा तसाच असायचा मग चालत्या गाडीत बाळासाहेब जेवण करायचे आणि सोबत असणाऱ्याला जेवायला लावायचे .एकदा बुलढाणा चिखली येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम होता .आयोजकांनी अत्यंत साधी खोली साहेबांसाठी केली तिथे सामान्य माणूस बसू शकत नाही परंतू बाळासाहेब शांतपणे आराम करत राहिले .इतका महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आणि काहीच अहिर्भाव नाही .त्या दिवशी बाळासाहेब तापेने फणफणत होते त्यांना डॉ ला आणू का विचारलं तर ऐकलं नाही .साधी तापेची गोळी घेतली आराम करणार तर पत्रकार,कार्यकर्ते लोकांची रीघ सुरू झाली परंतू आपले दुखणे बाजूला ठेवून लोकांच्या भेटी बाळासाहेब घेत राहिले .दुसरा प्रसंग असा की २०१७ ला जिल्हा परिषद निवडणुकीचा शेवटचा प्रचाराचा दिवस बुलढाणा जिल्हयात दोन भाग आहेत घाटाखाली घाटावर असे दोन भाग दोन्ही मिळून एकूण १२ सभा होत्या .जेवणाचा डब्बा खाण्यास वेळ नाही.थोडे फळे घेतले ते सुद्धा एक खावून सोबत असणाऱ्या आम्हाला बळजबरीने द्यायचे .बाळासाहेब म्हणाले आपण रस्त्याने टपरी असेल तर चहा घेऊ सभा घेत घेत घाटाखाली दुपारी ३ ते रात्री ९. वाजले एकही टपरी दिसली नाही . शेवटची १२ वी सभा १० ला रात्री शेगाव ला आटोपली आणि रात्री ११ ला जेवण केलं .सांगायचं तात्पर्य हेच की बाळासाहेब ताठर आहेत .रागावतात सुध्दा पण त्यामागे हेतू चांगला असतो परंतू बिजेपी ची बी टीम पैसे घेतल्याचे आरोप ऐकले की आरोप करणाऱ्याची आम्हाला कीव येते कारण की बाळासाहेब आम्हाला जास्त माहीत आहेत.

२००९ नंतर अनेक चांगले सहकारी सोबत होते त्यात अक्षय साळवे सातारा , संदीप नंदेश्वर नागपूर, Sumit Wasnik , Karunaditya Anish , संजय किर्तीकर, राज सावंत ,संगीता रामटेके,प्रशिक धांडे,प्रतीक कांबळे , प्रसंनजित कांबळे,राहुल जाधव , चक्रधर गवई, राज गवई, अनेक अनेक प्रत्येकाचे नाव घेतले नाहीतरी ते सर्व आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातून अनेक तरुण होते आणि वरिष्ठ मंडळी सुध्दा होती.
आजची परिस्थिती पाहता मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच पूर्ण समर्थन करत आहे तर अनेकांनी मला म्हटलं की तुम्हाला तिकीट मिळवायच असेल किंवा स्वत:चा स्कोर सेटल करायचां असेल परंतु जेव्हा मी होतो तेव्हा मी माझा फायदा करून घेऊ शकलो असतो परंतु कधीही मी केलं नाही आणि आता आंबेडकरी वेगळं अस्तित्व असायला पाहिजे हीच माझी भूमिका आहे. मी कधीही बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुध्द कधीही पोष्ट टाकली नाही परंतू पक्षातील काही लोकांच्या अवती भोवती असणारे यांच्याबद्दल बोललो .अंजली ताई बाळासाहेब मला अगोदरही आई वडीलाप्रमाणे होते ,आजही आहेत आणि नेहमीच राहतील त्यामुळे इतरांनी माझी चिंता करू नये. २०१९ नंतर मला काँग्रेस राष्ट्रवादी च्या ऑफर आल्या परंतू मी कुठेही गेलो नाही आणि जे जुने सहकारी त्यांनी सुद्धा आपला आंबेडकरीबाणा कायम ठेवला स्वाभिमानाने आजवर राहिलो .

आज अनेक नवे जुने सहकारी यांना आवाहन आहे की वेगळ अस्तित्व जपण आवश्यक आहे नाहीतर प्रस्थापित पक्षाच्या गर्दीत आंबेडकरी विचार अस्तित्व एकांगी पडून राहील .सर्वांनी वंचित बहुजन आघाडी सोबत आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मजबुतीने उभ राहायला पाहिजे किमान २५ आमदार आपण आणू याच ध्येय ठेवूया.......जयभीम
- प्रविण जाधव

24/10/2024

बाळासाहेब आंबेडकर यांचे धरसोडीचे धोरण
(मविआ च्या अनपेड लोकांना सुवर्णसंधी. पोस्ट डिलीट करण्यापूर्वी धडाधड कॉपी पेस्ट करून शेअर करा.)

का नाही बोलायचं यावर ?

१. आई शेकाप ची जिल्हा परीषद सदस्य असताना आणि भाऊ शेकाप कडून उभा असताना त्यांनी कॉंग्रेस कडून निवडणूक लढवली.
२. बीएमसीसी कॉलेज मधे समाजवाद्यांसोबत ही काम केले आणि संघाच्या लोकांसहीत अभाविपचं कामही केलं. प्रमोद महाजन यांनी सकाळ मधे लेख लिहीलेला आहे याबद्दल.
३. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर दोघेही राजकारणात येण्यापूर्वीच मैत्री. त्या वेळी कॉंग्रेसच्या विरोधात एक मासिक काढले. ते बंद पडले.
४. मात्र यशवंतराव चव्हाणांची मर्जी संपादन करून कॉंग्रेस मधे मंत्रीपद मिळवलं.
५. वसंतदादा पाटलांची मर्जी संपादन करून त्यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद.
६. पण लगेचच १९७७ मधे जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ यांच्याशी आघाडी करून पुलोद आघाडी बनवून मुख्यमंत्री
७. मुख्यमंत्रीपद जाणार हे कळताच समाजवाद्यांनी पाठिंबा दिलेला नामांतराचा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला आणि गोविंदभाई श्रॉफ यांना मराठवाड्यात आंदोलन करायला सांगितले. दंगल पेटवून भयभीत झालेल्या बौद्ध समाजाला धीर दिला आणि नामांतरासाठी सत्ता गेली असा देखावा केल्याने बौद्धांचा मतदार बेस तयार झाला.
८. कॉंग्रेसने दारं बंद केल्याने समाजवादी कॉंग्रेस पक्ष बनवला.
९. १९८४ ला राजीव गांधी कॉंग्रेसचे हायकमांड बनल्यावर पुन्हा कॉंग्रेस मधे परतले.
१०. कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले. ऐन वेळी नरसिंहराव यांना पाठिंबा दिला ( त्या वेळी मोसादच्या कनेक्शन उघड करण्याची धमकी त्यांनी दिली असे म्हटले जात होते).
११. सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी मुंबईत दंगल घडवली. श्रीकृष्ण आयोगाच्या म्हणण्यानुसार शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर ( कळलं ना ?) यांनी मिळून दंगल घडवली.
१२. नाईकांचे मुख्यमंत्रीपद गेल्यावर मुख्यमंत्री पदावर दावा.
१३. निवडणुकीत बौद्ध मतदान हवं म्हणून दहा फेक विद्यार्थ्यांना रिपब्लिकन एकीसाठी आमरण उपोषणाला बसवले. बाळासाहेब आंबेडकर यांची ही खेळी प्रकाश आंबेडकर यांनी उघडकीस आणली आहे.
१४. त्या वेळी कॉंग्रेस पक्ष एक वरून ३८ जागेवर गेला. देशभरात कौतुक झालं.
१५. अशात सोनिया गांधींशी वाजल्याने परदेशी जन्माचा मुद्दा घेऊन भाजपसहीत आंदोलन.
१६. प्रमोद महाजनांनी संताप झाल्याने आता आम्हाला परदेशी जन्माचा मुद्दा घेण्याची गरज उरलेली नाही असे विधान केले होते. ( संताप = ?)
१७. कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर कास्टवादी कॉंग्रेस बनवली.
१८. सहा महिन्यांनी निवडणुकांसाठी कॉंगेसशी आघाडी. परदेशी जन्माचा मुद्दा बासनात.
१९. सत्ता गेल्यावर २०१४ ला भाजपला बिनशर्त पाठिंबा.
२०. २०१८ साली भीमा कोरेगाव दंगलीत संभाजी भिडेंचा हात असे वक्तव्य. आयोगासमोर भिडेंना ओळखत नसल्याचे सांगितले.
२१. पुणे पोलिसांचा तपास सदोष, सत्तेवर येताच अधिकार्यांवर कारवाई करू असे वक्तव्य. २०१९ ला मविआ बनल्यावर त्या अधिकार्याला मुंबईचा पोलीस कमिशनर बनवण्य़ाची शिक्षा दिली.
२२. पुतण्याने पहाटेचा शपथविधी केल्यावर घर तोडलं म्हणून अश्रू ढाळले. आता माफी नाही असे विधान.
२३. लगेचच सात दिवसांनी पुतण्याला उपमुख्यमंत्रीपद देऊन जबर शिक्षा केली.

बाळासाहेब आंबेडकरांवर धरसोडीचा आरोप होत असेल तर काय चुकीचं आहे ?

Mandar Mane सरांच्या वॉल वरून

Address

Nanded
Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when sawidhan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category