Anti-Spitting Movement, Kolhapur

  • Home
  • Anti-Spitting Movement, Kolhapur

Anti-Spitting Movement, Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anti-Spitting Movement, Kolhapur, Social service, .

असे शहाणपण कधी येणार?
17/11/2025

असे शहाणपण कधी येणार?

स्वप्न सत्यात उतरणार कधी? प्रशासन जागे होणार कधी ❓
02/11/2025

स्वप्न सत्यात उतरणार कधी? प्रशासन जागे होणार कधी ❓

⚡कोल्हापूरचा उडता पंजाब करायचा नाय ❌
24/07/2025

⚡कोल्हापूरचा उडता पंजाब करायचा नाय ❌

काका, मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही 🤧
24/02/2025

काका, मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही 🤧

https://youtu.be/0RnIECyYwBs?si=8VBl_gGeSXZ-1OQb
23/02/2025

https://youtu.be/0RnIECyYwBs?si=8VBl_gGeSXZ-1OQb

थुंकीमुक्त कोल्हापूरची शपथ घेऊन संत गाडगेबाबांना अभिवादन, राधाबाई शिंदे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेत....

23/02/2025

संत गाडगे बाबांचे विचार आचरणात आणूया, आपले कोल्हापूर स्वच्छ आणि निरोगी ठेवूया! 🙏
आजची शपथ आणि प्रबोधन फेरी..
🤗फेरी दरम्यान सकाळ सकाळी हातावर तंबाखू मळणारे, तोंडात माव्या गुटख्याची गोळी ठेवणारे थुंकीवीर महिलांचा आवेश पाहून चांगलेच चपापले होते हे विशेष ❗

*⭐थुंकी मुक्त कोल्हापूरची शपथ घेऊन संत गाडगेबाबांना अभिवादन*"राधाबाई शिंदे शाळेतील शिक्षीकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.."...
23/02/2025

*⭐थुंकी मुक्त कोल्हापूरची शपथ घेऊन संत गाडगेबाबांना अभिवादन*
"राधाबाई शिंदे शाळेतील शिक्षीकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.."

आयुष्यभर स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळीने,शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या राजारामपुरीतील माऊली पुतळ्याजवळ थुंकीमुक्त व निरोगी कोल्हापूरची शपथ घेऊन फेरीद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले.
मुलांना जबाबदार नागरिक बनवण्यात शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते. असे आदर्श शिक्षक मुलांना लाभले तर पुढील पिढी व्यसनमुक्त व घरासोबतच परिसर स्वच्छते विषयी जागरूक असणारी असेल . असे कौतुकास्पद उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांनी काढले.
उघड्यावर थुंकल्यामुळे रोगराई पसरते तसेच सार्वजनिक मालमत्ता उध्वस्त होते. असे असूनही अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही अशी खंत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
उपक्रमात सार्वजनिक स्वच्छते विषयीच्या फलकासोबत "थुंकणारा नवरा नको ग बाई," "काका मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही "असे छोट्या मुलांच्या हातातील संवेदनशील संदेश नागरिकांना विचार करायला भाग पाडत होते.
उपक्रमाचे संयोजन निना जोशी व दीपा शिपुरकर यांनी केले. विजय धर्माधिकारी, डॉ. देवेंद्र रासकर, अभिजीत गुरव, ललित गांधी, कपिल मुळे, ललिता गांधी, मोहन सातपुते यांनी परिश्रम घेतले. उपक्रमास तात्या गोवावाला,डॉ. मकरंद ऐतवडे , अभिजीत जाधव,अश्विनी माने , अल्लाउद्दीन बागवान, संघसेन जगतकर तसेच राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल च्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक वर्गाच्या शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

🔅थोर समाज सुधारक आणि स्वच्छता प्रसारक संत गाडगेबाबा यांची  23 फेब्रुवारीला जयंती!!या औचित्त्यावर आपण स्वस्थ बसून चालणार ...
21/02/2025

🔅थोर समाज सुधारक आणि स्वच्छता प्रसारक संत गाडगेबाबा यांची 23 फेब्रुवारीला जयंती!!

या औचित्त्यावर आपण स्वस्थ बसून चालणार नाही!

रोगराई पसरवत मोकाट सुटलेल्या थुंकीचंदाना प्रबोधन रुपी धडे द्यायचे आहेत, समाजाला परिसर स्वच्छतेची जाण तसेच प्रशासनाला आपल्या कर्तव्याची जाग आणायची आहे.

🌱कौतुकाची बाब अशी की हे ध्येय साकार करण्यासाठी मुलांना घडविणाऱ्या कोल्हापूरच्या राधाबाई शिंदे शाळेतील शिक्षिका चळवळीला समर्थ साथ देणार आहेत.
आपणही जबाबदार नागरिक म्हणून यालच!

तेव्हा आपलं कोल्हापूर स्वच्छ आणि आरोग्यदायी करण्याची शपथ घेऊन या थोर संताला विनम्र अभिवादन करूया🙏

वेळ: 23 फेब्रुवारी 2025,सकाळी आठ वाजता
स्थळ:
माऊली पुतळा, राजारामपुरी तेरावी गल्ली कोल्हापूर

तेव्हा,भेटूच!
▪️
थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळ

कधी यायची जाग??
10/02/2025

कधी यायची जाग??

सार्वजनिक आरोग्य जपायचे असेल तर थुंकीचंदांची गुर्मी उतरवलीच पाहिजे ❗
06/02/2025

सार्वजनिक आरोग्य जपायचे असेल तर थुंकीचंदांची गुर्मी उतरवलीच पाहिजे ❗

कोल्हापूरकरांनो जागरूक नागरिक बना ❗
04/02/2025

कोल्हापूरकरांनो जागरूक नागरिक बना ❗

कोल्हापूरकरांनी बघायची भूमिका बंद करून चांगल्या गोष्टीला साथ द्यावी.. Kolhapuri Karbhar (कोल्हापुरी...

थुंकीमुक्त चळवळीच्या कार्यकर्त्यांनी घडवली अद्दल❗ गुंड थुंकी चंदाने मागितली माफी..
04/02/2025

थुंकीमुक्त चळवळीच्या कार्यकर्त्यांनी घडवली अद्दल❗ गुंड थुंकी चंदाने मागितली माफी..

S News is a Marathi-language News Channel based in Kolhapur, Maharashtra. S News covers all important Breaking news, the latest top stories, politics, spirit...

Address


416002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anti-Spitting Movement, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share