Parag Pingle

Parag Pingle Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parag Pingle, Yavatmal.

दिग्रस तालुक्यात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट...
11/04/2026

दिग्रस तालुक्यात मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, लोकसभा संपर्कप्रमुख प्रीती बंड तसेच शिवसेना पश्चिम विदर्भ सह-संपर्क प्रमुख पराग पिंगळे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि BLA-1 यांच्याशी थेट संवाद साधून मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व, अचूकता आणि सजगतेची गरज अधोरेखित केली. बैठकीत ज्येष्ठ मार्गदर्शक जीवन पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा कालींदा पवार, युवा सेना लोकसभा अध्यक्ष विशाल गनात्रा, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश पवार, तालुकाप्रमुख उत्तम ठावकर यांच्यासह सर्व नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी काटेकोरपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

आज अमरावती येथे पश्चिम विदर्भ स्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ह्या प्रसंगी पश्चिम विदर्भ समन्वयक व सह स...
04/04/2026

आज अमरावती येथे पश्चिम विदर्भ स्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ह्या प्रसंगी पश्चिम विदर्भ समन्वयक व सह संपर्क प्रमुख नात्याने उपस्थित राहिलो.
ह्या प्रसंगी मा. ना. प्रतापराव जाधव – केंद्रीय आमदार किशोर आप्पा पाटील लोकसभा संपर्क प्रमुख,राज्यमंत्री,मा. श्री शशिकांत जाधव,
मा. श्री राजन साळवी – माजी आमदार,
मा. श्री संजय रायमूलकर– माजी आमदार,
मा. श्री गोपिकिशन बाजोरिया – माजी आमदार,मा. श्री नारायणराव गव्हाणकर – माजी आमदार,मा. श्री शशिकांत खेडेकर– माजी आमदार,मा. श्री ज्ञानेश्वर धाने पाटील – माजी आमदार,श्रीमती प्रीतीताई बंड, यवतमाळ वाशीम लोकसभा संपर्क प्रमुख तसेच पश्चिम विदर्भातील जिल्हा प्रमुख,संपर्क प्रमुख,तालुका प्रमुख,शहर प्रमुख,महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩श्रीरामाचे परमभक्त, शक्ती, भक्ती आणि सेवाभाव यांचे प्रतीक असलेल्या बजरंगबलींच्या क...
01/04/2026

🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

श्रीरामाचे परमभक्त, शक्ती, भक्ती आणि सेवाभाव यांचे प्रतीक असलेल्या बजरंगबलींच्या कृपेने आपल्या जीवनात धैर्य, यश आणि सकारात्मक ऊर्जा लाभो.

आपल्या प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद, योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा आणि मनःशांती प्रभू हनुमानांच्या आशीर्वादाने सदैव मिळो.

🙏 जय हनुमान! 🙏
🚩 जय श्रीराम! 🚩

🙏 मनःपूर्वक आभार!उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व तसेच राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...
31/03/2026

🙏 मनःपूर्वक आभार!

उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व तसेच राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. संजय राठोड साहेब यांच्या शिफारशीने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. पश्चिम विदर्भ विभागाच्या सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून, तसेच मा. एकनाथ शिंदे साहेब आणि मा. संजय राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन, याची खात्री देतो.

तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून, पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत नेण्याचा आणि संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने पश्चिम विदर्भात शिवसेनेचा झेंडा अधिक उंच नेऊ, हा विश्वास आहे. 🚩

धन्यवाद! 🙏

🎶 “राम राम हम बोलेंगे…” 🎶मनात राम, ओठांवर राम नाम…✨ हे गाणं ऐका आणि रामभक्तीत तल्लीन व्हा✨ एक ऊर्जा देणारा अनुभव📲 पूर्ण ...
25/03/2026

🎶 “राम राम हम बोलेंगे…” 🎶
मनात राम, ओठांवर राम नाम…
✨ हे गाणं ऐका आणि रामभक्तीत तल्लीन व्हा
✨ एक ऊर्जा देणारा अनुभव
📲 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇

https://youtu.be/Pvgn1UXBHUs?si=m9Y971upzq-o0ukE

🔁 आवडलं तर नक्की शेअर करा आणि राम नामाचा प्रसार करा
🚩 जय श्रीराम 🚩

आज सुपनाथ मंगल कार्यालय, घाटंजी येथे शिवसेना घाटंजीच्या वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.ह्या प्रसंग...
20/03/2026

आज सुपनाथ मंगल कार्यालय, घाटंजी येथे शिवसेना घाटंजीच्या वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.ह्या प्रसंगी अभिषेक पाटील ठाकरे व आशिष लोणकर ह्यांचे सोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवकांनी ना संजय राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सर्वांचे स्वागत करत, त्यांच्या या निर्णयामुळे घाटंजीमधे पक्ष अधिक बळकट होईल, असा ना संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला.ह्या प्रसंगी सलीमभाई खेतांनी,पराग पिंगळे,हरिहर लिंगनवार,राजुदास जाधव,विष्णू उकंडे, सुरेश चिंचोळकर,संजय हातगावकर,साजिद शेख, दीपक कोकास, आशिष कुळसंगे, स्नेहल भाकरे, विशाल गणात्रा,आकाश राठोड,निलेश चव्हाण,महेश पवार,प्रद्युमन जवळेकर यांचेसह शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते

https://youtu.be/ld5fva_9yyk?si=RI0VdfHM2XTnP4fy🎵 नवीन जोशपूर्ण रणगीत – “जगेगा हिंदू तोही विश्व जगेगा”हिंदू संस्कृती, धर...
13/03/2026

https://youtu.be/ld5fva_9yyk?si=RI0VdfHM2XTnP4fy

🎵 नवीन जोशपूर्ण रणगीत – “जगेगा हिंदू तोही विश्व जगेगा”

हिंदू संस्कृती, धर्म, शौर्य आणि एकतेचा संदेश देणारे हे जोशपूर्ण रणगीत.
ढोल-ताशांच्या तालावर प्रेरणा देणाऱ्या ह्या गीताचे माध्यमातून समाजात जागृती आणि स्वाभिमान निर्माण करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न.

✍️ गीतकार: पराग पिंगळे

नक्की ऐका आणि आपला अभिप्राय द्या.
जय श्रीराम 🚩 | हर हर महादेव 🔱

Enjoy the videos and music that you love, upload original content and share it all with friends, family and the world on YouTube.

06/03/2026
Eknath Shinde साहेबांवर "अनाथांचा नाथ" या गाण्यातील ओळी —"संकटात पाय रोवूनी, एकला उभा ठाकतो" — आज अक्षरशः सार्थ ठरल्या.द...
03/03/2026

Eknath Shinde साहेबांवर "अनाथांचा नाथ" या गाण्यातील ओळी —
"संकटात पाय रोवूनी, एकला उभा ठाकतो" — आज अक्षरशः सार्थ ठरल्या.

दुबईमध्ये अडकलेल्या यवतमाळच्या ५ कुटुंबियांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. ही केवळ मदत नाही, तर खरी माणुसकी आहे.

या विशेष विमानातून महाराष्ट्रातील तब्बल १६४ प्रवासी, जे दुबई येथे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विमाने रद्द झाल्याने अडकले होते, त्यांनाही सुरक्षितपणे परत आणण्यात आले.

प्रवासी सुखरूपपणे बंगलोर येथे पोहोचले असून पुढे त्यांना मुंबईला आणले जात आहे.आताच आमचे मित्र बाळासाहेब दौलतकर ह्यांनी ही माहिती दिली. नागपूरच्या प्रवाशांसाठी मुंबई–नागपूर विमान तिकिटांचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

संकटाच्या काळात लोकांसाठी धावून जाणारा नेता म्हणजेच खरा नेता!
हीच खरी नेतृत्वाची ओळख — निर्णयक्षमता, जबाबदारी आणि माणुसकी.
#माणुसकी #नेतृत्व

प्रिय मित्र पवनभाऊ अराठे,तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, यश आणि समाधानाने भरलेला असो.नवीन वर्षात नवीन संधी, नवीन ...
01/03/2026

प्रिय मित्र पवनभाऊ अराठे,
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, यश आणि समाधानाने भरलेला असो.
नवीन वर्षात नवीन संधी, नवीन उंची आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा!
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि आयुष्य सुख-समृद्धीने उजळून निघो.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Address

Yavatmal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parag Pingle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share