निस्वार्थ सेवा फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Yavatmal
  • निस्वार्थ सेवा फाऊंडेशन

निस्वार्थ सेवा फाऊंडेशन निस्वार्थ सेवा फाऊंडेशन
मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे
निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ

श्रीमती लीलाबाई कावलकर यांच्या स्मृति पित्यर्थ आयोजित कृतज्ञता सोहळ्यात, समाजहितासाठी कार्यरत असलेल्या निस्वार्थ सेवा फा...
28/10/2025

श्रीमती लीलाबाई कावलकर यांच्या स्मृति पित्यर्थ आयोजित कृतज्ञता सोहळ्यात, समाजहितासाठी कार्यरत असलेल्या निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेच्या स्वैच्छिक रक्तदान प्रोत्साहन व निस्वार्थ रुग्णसेवेच्या कार्याची दखल घेऊन, डॉ. विजय कावलकर सर व त्यांच्या परिवाराकडून फाऊंडेशनला रु. २१,००० चे सन्मान राशी प्रदान करण्यात आले , यावेळी फाऊंडेशन कडून परशुराम कडू, अनिकेत नवरे, चेतना ताई राऊत, अर्पित शेरेकर उपस्थित होते ✨

27/07/2025

दिनांक 26/7/25/पत्रकार भवन नवीन पेठ पुणे येथे रंग श्रावणाचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा या सोहळ्यात पुणे इथून,
चेतनाताई चंद्रकांत राऊत
महिला अध्यक्ष,
निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ
यांची निवड करण्यात आली त्यासाठी, माननीय देवेंद्र दादा कोठे सोलापूर आमदार, संत ज्ञानेश्वर मुक्ताई या चित्रपटातील मुख्य भूमिका करणारे तेजस दादा बर्वे, अभिनेते दिनदर्शक पाटलाचा गाडा माननीय प्रकाश दिडले, अभिनेते स्टार प्रवाह प्रेमाची गोष्ट माननीय दिलीप घेवंदे सर , प्रा डॉ बी एन खरात सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत रंग श्रावणाचा रंग गौरवाचा रंग हिरकणीचा हा राष्ट्रीय गौरव पुरस्कार पार पडले व त्यांनी सन्मान करून पुणे येथे बोलून हा पुरस्कार प्रदान केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार 🙏

दिनांक 26/7/25/ रोजी माननीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम  राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, सोहळा मांडूळकर नाट्यगृह पुणे येथे प...
27/07/2025

दिनांक 26/7/25/ रोजी माननीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, सोहळा मांडूळकर नाट्यगृह पुणे येथे पार पडला
त्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त राम सर मांडुरके, सहाय्यक आयुक्त महानगरपालिका, वैशालीताई मार्तंड चव्हाण, माननीय डॉक्टर नितीन जी वाघमोडे, ह भ प तुकाराम बाबा महाराज, अनिल भीमराव जाहीर तनिष्का फाउंडेशनचे अध्यक्ष, प्राजक्ता ताई मांजुलकर, अशोकराव गोरडे सर या सगळ्यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या सोहळ्यात,
चेतनाताई चंद्रकांत राऊत
महिला अध्यक्ष,
निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ
यांना,
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार,
मिळाला त्या बद्दल ताईचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई.

युनिटी फाऊंडेशन(पशुप्रेमी) बहुद्देशीय संस्था,यवतमाळ च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्तनिस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ चा सत्क...
22/06/2025

युनिटी फाऊंडेशन(पशुप्रेमी) बहुद्देशीय संस्था,यवतमाळ च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त
निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ चा सत्कार करण्यात आला

रक्तदान श्रेष्ठदान 🚑🏨      ♥️
17/06/2025

रक्तदान श्रेष्ठदान 🚑🏨

♥️

यवतमाळ जिल्ह्यात रक्ताचा भयंकर तुटवडा आहे तो काही प्रमाणात भरून निघावा व सरकारी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त म...
12/06/2025

यवतमाळ जिल्ह्यात रक्ताचा भयंकर तुटवडा आहे तो काही प्रमाणात भरून निघावा व सरकारी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना मोफत रक्त मिळावे यासाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांना सहकार्य करत आहो, त्या अनुशंगाने *दि : 14 जून 2025* रोजी *रेमंड युको डेनिम एम.आय.डी.सी.लोहारा यवतमाळ* येथे *सकाळी 10 ते 4* च्या दरम्यान समाजहीतार्थ निस्वार्थ रुग्नसेवा भावनेने केवळ रक्तासाठा नसल्याने रुग्नास उद्भवणाऱ्या गंभीर समस्याचा नायनाट करन्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन *रेमंड युको डेनिम आणि निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ* यांच्याद्वारे जागतिक रक्तदान दिना निमित्य करण्यात आले आहे. तरी आपण रक्तदान महादान करुण या समाजोपयोगी कार्यात आपला सिंहाचा वाटा नोंदवावा ही सविनय विनंती तसेच आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तिस या कार्यबद्दल सूचित व योगदानास प्रेरित करावे ही प्रांजळ आशा व सामाजिक जाणीव असलेल्या सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की रक्तदान शिबीरात सहभागी होण्यासाठी परिवारातील सदस्य, मित्र परिवार यांच्याशी संपर्क करून रक्तदात्याची नोंदणी करावी.
संपर्क :-
*चंद्रशेखर पतुरकर :- 9922904924*
*संतोष चांडक :- 9604002192-*
*भूषण वानखेडे :- 9922944787*
*सारंग ठाकरे :- 8805025663*
*जय राठोड :-7030309891*
*मयूर काळे :- 9921235815*
*निलेश कळसकर :- 8087777518*
*नितेश कोरे :- 9673399285*

जागतिक थॅलेसेमीया दिवसा निमित्ताने आज 8/5/2025 ला मा. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ यांना भेटून निस्वार्थ...
08/05/2025

जागतिक थॅलेसेमीया दिवसा निमित्ताने आज 8/5/2025 ला मा. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ यांना भेटून निस्वार्थ सेवा फाऊंडेशन च्या वतीने थॅलेसेमीया रुग्णांच्या समस्या बद्दल चर्चा करण्यात आली. या चर्चेला निस्वार्थ सेवा फाउंडेशन चे परशुराम कडू, अनिकेत नवरे उपस्थीत होते.

आज स्थानिक एम.डब्लू.पॅलेस, जाम रोड येथे, श्री प्रवीण भाऊ देशमुख ह्यांच्या संकल्पनेतून आयोजित सद्भावना सप्ताहाचे निमित्ता...
26/08/2024

आज स्थानिक एम.डब्लू.पॅलेस, जाम रोड येथे, श्री प्रवीण भाऊ देशमुख ह्यांच्या संकल्पनेतून आयोजित सद्भावना सप्ताहाचे निमित्ताने नेत्रदीपक कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केल्या बद्दल निस्वार्थ सेवा फाऊंडेशन च्या सामाजिक कार्याचा गौरव माननीय खासदार श्री. संजय देशमुख ह्यांच्या शुभ हस्ते व श्री. माणिकराव ठाकरे माजी मंत्री, श्री. वसंत पुरके, माजी मंत्री , खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, खासदार बळवंतराव वानखेडे व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला

कारगिल युद्धादरम्यान अतुलनिय शौर्य, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन जगाला घडवित जगाच्या इतिहासातील कठीण युद्धांपैकी एक असणारे ...
26/07/2024

कारगिल युद्धादरम्यान अतुलनिय शौर्य, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन जगाला घडवित जगाच्या इतिहासातील कठीण युद्धांपैकी एक असणारे युद्ध आपल्या जवानांनी जिंकले. पाकीस्तानी सैन्याचा निर्णायक पराभव झाला. या युद्धात शहीद झालेले व पराक्रम गाजविणाऱ्या जवानांना च्या निमित्ताने सॅल्यूट.

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय यवतमाळ मध्ये रुग्णसंख्या जास्त असल्यामूळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...
19/07/2024

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय यवतमाळ मध्ये रुग्णसंख्या जास्त असल्यामूळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्ण रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याच्या प्रतीक्षेत आहे. रक्त पुरवठा नसल्यामुळे कोणाची ऑपरेशन थांबली आहे.तर सिकलसेल व थालेसेमिया, गर्भवती महिला, यांनीही फार रक्ताची गरज आहे त्यामुळे २०/०७/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता *बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय* येथे *भव्य रक्तदान* शिबिराचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे असे आव्हान माननिय जिल्हाधिकारी यांनी केले आहे🙏🏻

16/04/2024

Address

Yavatmal
445001

Telephone

+917770020088

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when निस्वार्थ सेवा फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to निस्वार्थ सेवा फाऊंडेशन:

Share

Category