ERO 78 Yavatmal

ERO 78 Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ERO 78 Yavatmal, Government Organization, Yavatmal.

आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी मतदार दिवस वसंतराव नाईक शासकिय कृषी आणि  जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ व अन्न तंत्रज...
25/01/2025

आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी मतदार दिवस वसंतराव नाईक शासकिय कृषी आणि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय माने, सहा. अधिष्ठाता, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत उंबरकर मा. उपजिल्हाधिकारी यवतमाळ तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी यवतमाळ आणि प्राध्यापक अंजली गारवाल सहा. अधिष्ठाता वसंतराव नाईक शासकीय कृषी व जैव तंत्रज्ञान महाविद्यालय आयोजक गोपाळ देशपांडे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यवतमाळ, डॉ. योगेश देशमुख तहसिलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यवतमाळ, राजेश कहारे नायब तहसीलदार निवडणूक, मोहसीन संगणक परिचालक निवडणूक विभाग या सर्वांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात आला.

यवतमाळ -  दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 78 यवतमाळ विधानसभा मतदार संघा अंतर्गत SVEEP च्या अनुषंगाने मतदान जनजागृती करण्याच्या...
08/04/2024

यवतमाळ - दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 78 यवतमाळ विधानसभा मतदार संघा अंतर्गत SVEEP च्या अनुषंगाने मतदान जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथून स्केटिंग व सायकल रॅली काढण्यात आली.

यवतमाळ -  दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 78 यवतमाळ विधानसभा मतदार संघा अंतर्गत SVEEP च्या अनुषंगाने मतदान जनजागृती करण्याच्या...
08/04/2024

यवतमाळ - दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 78 यवतमाळ विधानसभा मतदार संघा अंतर्गत SVEEP च्या अनुषंगाने मतदान जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथून स्केटिंग व सायकल रॅली काढण्यात आली.त्याची काही क्षणचित्रे..👆

08/04/2024

यवतमाळ - दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 78 यवतमाळ विधानसभा मतदार संघा अंतर्गत SVEEP च्या अनुषंगाने मतदान जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथून स्केटिंग व सायकल रॅली काढण्यात आली.त्याची काही क्षणचित्रे..👆

31/03/2024
मा. डॉ . पंकज आशिया यांनी सामान्य जनतेला मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरिता आव्हान करुण लोकशाही बद्दल अवगत केले.
31/03/2024

मा. डॉ . पंकज आशिया यांनी सामान्य जनतेला मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरिता आव्हान करुण लोकशाही बद्दल अवगत केले.

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाहीआचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.प्रत्ये...
31/03/2024

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

आतापर्यंत ७९००० हून अधिक तक्रारींची नोंद झाली असून, ९९% पेक्षा जास्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे आणि सुमारे ८९% तक्रारी निर्धारित १०० मिनिटांत निकाली निघाल्या आहेत.

App डाउनलोड करण्यासाठी क्यू. आर कोड स्कॅन करा

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

ॲप

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

आतापर्यंत ७९००० हून अधिक तक्रारींची नोंद झाली असून, ९९% पेक्षा जास्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे आणि सुमारे ८९% तक्रारी निर्धारित १०० मिनिटांत निकाली निघाल्या आहेत.

App डाउनलोड करण्यासाठी क्यू. आर कोड स्कॅन करा

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

30/03/2024

मतदान आपला अधिकार आणि कर्तव्य सुध्दा डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी यवतमाळ यवतमाळ (वार्ता.) दि.३०/०३/२०२४

नेहरु स्टेडीयम यवतमाळ येथे प्रशासनाचे वतीने मतदान जागृती कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणुन बोलताना जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यवतमाळ यांनी लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान टक्केवारी वाढविण्याबाबत आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवत मार्गदर्शन करीतांना मतदान आपला अधिकारच नाही तर कर्तव्य सुध्दा आहे. व हे कर्तव्य दिनांक २६ एप्रिल, २०२४ रोजी सर्व मतदारांनी पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले.
यवतमाळ शहरातील २० शाळातील सुमारे २५०० विद्यार्थी-विद्यार्थीनी या कार्यक्रमातंर्गत अखंड भारताचा नकाशा मानवी साखळी निर्माण करुन मतदान जनजागृती केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गोपाळ देशपांडे उपविभागीय अधिकारी, यवतमाळ तथा सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी कडुन संकल्प पत्र भरुन घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी आई वडीलांचा संकल्प म्हणुन मतदानाच्या दिवशी नक्की मतदानाला जाऊ तसेच परिवारातील सर्व मतदार आणि शेजारी व मित्र परिवार यांना मतदाना करीता प्रोत्साहीत करुन मतदान करुन घेणार असे संकल्प पत्राव्दारे वचन घेणार आहे.
प्राध्यापक डॉ. राहुल एकबोटे, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ यांनी मतदान जनजागृती अभियान अंतर्गत जागो जागो राष्ट्र कार्य हित मतदार.. असे सुंदर शिर्ष गीत सादर केले त्यांचा मा. जिल्हाधिकारी महोदयांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री राऊत सर यांनी केले तर आभार डॉ. योगेश देशमुख, तहसिलदार यवतमाळ यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता श्री. विजयकुमार सरनाईक • मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ, श्री. किशोर गोळे, गटविकास अधिकारी यवतमाळ, पपु पाटील भोयर, गट शिक्षणाधिकारी यवतमाळ, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

30/03/2024

यवतमाळ नेहरू कवायत मैदान येथे मानवी साखळी करून भारताचा नकाशा तयार करण्यात आले.

30/03/2024

नेहुरू कवायात मैदान यवतमाळ येथे आज दि. ३०-०३-२०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता मानवी साखळी मतदान जागृती साठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये यवतमाळ शहरातील सर्व शाळांचे एकूण २००० विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून भारताचा नकाशा तयार केला.
मा. डॉ . पंकज आशिया यांनी सामान्य जनतेला मतदानाच्या दिवशी मतदान कार्नायाकरिता आव्हान करुण लोकशाही बद्दल अवगत केले.
या प्रसंगी मा. डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ, गोपाल देशपांडे, उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ व डॉ. योगेश देशमुख, तहसीलदार यवतमाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

मतदान जनजागृती वर गीत चे प्रक्षेपण करण्यात आले.

Address

Yavatmal
445001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 78 Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share