जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ

  • Home
  • India
  • Yavatmal
  • जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ

जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ District Information Office (DIO), Yavatmal

📍यवतमाळ l IPL नव्हे आता शेतकऱ्यांचा FGLशेतकरी गटांसाठी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा✅ 10 जूनपासून स्पर्धेला सुरुवात✅ 15 ऑगस...
29/05/2026

📍यवतमाळ l IPL नव्हे आता शेतकऱ्यांचा FGL

शेतकरी गटांसाठी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा

✅ 10 जूनपासून स्पर्धेला सुरुवात
✅ 15 ऑगस्ट रोजी विजेत्यांचा गौरव

जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी जिल्ह्यात आगळीवेगळी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी गटांच्या सदस्यांना करावयाच्या कामांचे चार स्तर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्तरामध्ये चार ते पाच लघु कृती अथवा अ‍ॅक्टिव्हिटी देण्यात येणार असून त्या यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना गुणांकन दिले जाईल.

स्पर्धेदरम्यान करण्यात आलेल्या सर्व कृतींचे व्हिडिओ चित्रण, छायाचित्रे तसेच नोंदवही ठेवणे सहभागी सदस्यांसाठी आवश्यक राहणार आहे. चारही स्तर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना आंतरराज्य, राज्य व जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे.
विजयाचे चार स्तर

या फार्मर ग्रुप लिग स्पर्धेत चार टप्पे किंवा स्तरानुसार गुणांकन केले जाणार आहे. त्यामध्ये मृदा व बीज व्यवस्थापन, पीक पद्धती व शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा व कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार व तंत्रज्ञान वापर या चार टप्प्यानुसार गुणांकन दिले केले जाणार आहे.

टप्पेनिहाय गुणांकन

त्यानुसार पहिल्या टप्प्यात मृदा व बीज व्यवस्थापन अंतर्गत माती नमुने तपासणी, बियाणे उगवण चाचणी, बीज प्रक्रिया, शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खतासाठी (प्रती शेतकरी) प्रत्येकी एक गुण मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात पीक पद्धती व शेती तंत्रज्ञान अंतर्गत बीबीएफ व टोकन यंत्र वापर, सापळा पिके, आंतरपीकांसाठी (प्रति एकर) प्रत्येकी एक गुण दिले जातील. तिसऱ्या टप्प्यातील भाग एक मध्ये जैविक निविष्ठा निर्मिती अंतर्गत वनस्पतीजन्य कीटकनाशके, जीवामृत, घनजीवामृत निर्मितीसाठीएक गुण तर बायोडायनॅमिक कंपोस्ट निर्मिती करणाऱ्यांना दोन गुण दिले जातील. तसेच भाग दोनमध्ये प्रत्यक्ष कीड रोग नियंत्रण अंतर्गत हुमा अळी नियंत्रण मोहीम, ट्रायकोकार्ड व फेरोमन ट्रॅप्स, चिकट सापळे, पक्षी थांबे या घटकासाठी प्रत्येकी एक गुण मिळणार आहे. चौथा टप्पा हा महत्त्वाचा असून त्यामध्ये प्रसार क्षमता बांधणी व नेतृत्व अंतर्गत शेतीशाळा सहभागासाठी एक गुण, जलतारा शेत शोषखड्डा निर्मितीसाठी दोन गुण तर शिवार फेरी, कार्यशाळा, गावाबाहेर मार्गदर्शन करणाऱ्यांना प्रती कार्यक्रमाचे ५ गुण मिळणार आहे.

१० गुणांचा मेगा बोनस

या फार्मर ग्रुप लिग स्पर्धेतील चौथ्या टप्प्यात महाविस्तार ॲपचा वापर करणाऱ्या तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व यशोगाथांचा प्रसार करणाऱ्या शेतकरी गटांना १० गुणांचा मेगा बोनस मिळणार आहे.

नोंदणी कशी करायची ?

या स्पर्धेसाठी नोंदणी 26 मे पासून ते 10 जूनपर्यंत गुगल फॉर्मद्वारे आणि गावाचे सहायक कृषी अधिकारी यांच्याकडे करता येणार आहे. शेतकरी गटांना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScl6D6zS6otJRv2niDek7Svb-tSSWU722iwqku237Vz2lhJBg/viewform?usp=header या गुगल फॉर्ममधील माहिती भरून नोंदणी करता येणार आहे.

सहभागाचे निकष

या स्पर्धेतील निकषानुसार प्रत्येक गावातून किमान एक शेतकरी गट अनिवार्य आहे. एका गटामध्ये किमान १० ते २० सदस्य असावेत.

कोट

जिल्ह्यातील शेतकरी हा प्रगतिशील असून, शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती पद्धतीत सुधारणा करत आहे. जिल्ह्यात प्रथमच यवतमाळ फार्मर ग्रुप लीग राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकरी गट म्हणून आधुनिक तंत्रज्ञान, पिकांचे योग्य व कमीत कमी खर्चात व्यवस्थापन आणि समूह शेती यासाठी स्पर्धा घेऊन, अशा शेतकऱ्यांचा व गटांचा योग्य सन्मान करण्यात येईल. जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या स्परधेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

📍 #यवतमाळ l स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्...
28/05/2026

📍 #यवतमाळ l स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार देशपांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन केले.

📍यवतमाळ l आज जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा ...
27/05/2026

📍यवतमाळ l आज जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांची पाहणी करून इंधन पुरवठा व साठा व्यवस्थेचा आढावा घेतला. यामध्ये दर्डा नगर येथील जैस्वाल पेट्रोल पंप तसेच पांढरकवडा रोडवरील धनगंगा पेट्रोल पंप येथे भेट देऊन त्यांनी तपासणी केली.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप कार्यालयातील नोंदवही, वर्षनिहाय इंधन पुरवठ्याची माहिती, संबंधित दस्तावेज तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी केली. इंधन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, सीसीटीव्हीचा डेटा सुरक्षित ठेवावा तसेच इंधन साठ्याबाबतची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालकांना दिल्या.

या पाहणीवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच संबंधित पेट्रोल पंप चालक उपस्थित होते.

📍ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर  : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बिगर व अंशतः अन...
27/05/2026

📍ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार ८ जून २०२६ पर्यंत आरक्षणाची सोडत काढण्याकरीता विशेष ग्रामसभेची सूचना देणे, १२ जून २०२६ पर्यंत विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढणे (अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला), १७ जून २०२६ पर्यंत प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, १९ जून २०२६ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी हा १९ ते २५ जून २०२६ असणार आहे. ३ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, ८ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, १० जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देणे असा हा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केला आहे.

तसेच राज्य निवडणूक आयोगाने बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट ग्रामपंचायतींच्या सर्व निवडणुकांमध्ये "ग्रामपंचायत (बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रात असलेल्या) सार्वत्रिक निवडणूक (आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे) आदेश, २०२६" या सुधारित आदेशाचे पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिले आहे.

0000

शेतकऱ्यांना स्वत:च्या ट्रॅक्टरसह ४० लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल !जिल्हाधिकारी विकास मीना यांचे पेट्रोल पंप चालकांना आ...
26/05/2026

शेतकऱ्यांना स्वत:च्या ट्रॅक्टरसह ४० लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल !

जिल्हाधिकारी विकास मीना यांचे पेट्रोल पंप चालकांना आदेश

26/05/2026

यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वे प्रकल्पातील जिल्ह्यातल्या तरोडास्थित सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उद्घाटन !

वृत्त : जिल्हा प्रतिनिधी दूरदर्शन (सह्याद्री)

26/05/2026

📍 यवतमाळ l स्वाधार योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 30 मेपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 30 मेपर्यंत ऑनलाईन अर्जाताल त्रृटी पूर्ण करुन त्याची प्रत कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

तसेच जे विद्यार्थी कागदपत्राची पुर्तता करणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अर्ज करता येणार नाही व तो स्वाधार योजनेपासुन वंचित राहील, असे आयुक्तालय समाज कल्याण पुणे यांनी कळविले आहे. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सर्व कागदपत्रासह अपलोड करुन 30 मेपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतू त्याची प्रत अद्याप कार्यालयात सादर केली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत अर्ज सादर न केल्यास व या योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील. तसेच निर्धारीत मुदतीत त्रुटी पुर्तता न केल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना स्वतःच्या वाहनासह ४० लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल !> जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी> शेत मशागतीसा...
26/05/2026

शेतकऱ्यांना स्वतःच्या वाहनासह ४० लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल !

> जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी
> शेत मशागतीसाठी शेतकऱ्यांना दिलासा
> पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध

खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरु असून त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह ४० लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालक व मालकांना दिले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा आहे. परंतु समाज माध्यमांवर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत. या परिस्थितीच्या अनुषंगाने व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेचं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोल सारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शेतीच्या कामकाजासाठी डिझेलची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करता पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत उपाययोजना करणे आवश्यक होते.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालक यांनी शेतकऱ्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल हे केवळ इंधनाच्या टाकीतच वितरित करावे, तसेच शेतकऱ्यांनी स्वतःचे वाहन पुर्णपणे भरुन त्यांचे वाहनासोबत (ट्रॅक्टर) त्यांचे वाहनाचे आरसी बुक सादर केल्यास त्याची पडताळणी करून त्यांना सोबतच ४० लिटरची एक कॅन डिझेल चा पुरवठा पेट्रोल पंप धारकानी करावा. कोणत्याही परिस्थितीत शेतीचे वाहन हजर नसताना पेट्रोल, डिझेल खुले उदा. कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री किंवा पुरवठा करण्यात येऊ नये.

> सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवा

रात्रीचे वेळी कॅनमध्ये डिझेल, पेट्रोलची विक्री होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी तसेच तसेच सीसीटीव्ही रिपोर्ट ४० दिवसापर्यंत जतन करुन तपासणी वेळी उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच संबंधित तालुक्यातील निरीक्षण अधिकारी यांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे किंवा कसे याची शहानिशा करुन तसा अहवाल सादर करावा, असे आदेशित केले आहे.

> अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्राधान्य

रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा.

> साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी पेट्रोल पंपांची तपासणी करा

पेट्रोल व डिझेल यांची साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही तसेच अतिरिक्त दराने पेट्रोल व डिझेलची विक्री होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. तहसीलदार यांनी पथक गठीत करुन त्यांच्या तालुक्यातील पेट्रोल पंपांची तपासणी करून प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करावा. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.

> > इंधनाचा साठा करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका

नागरिकांनी अनावश्यक गरजेपेक्षा जास्त इंधन भरून साठा करू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदेशात दिल्या आहेत.

या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक, चालक व व्यवस्थापक यांची राहणार आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहील, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

📍 यवतमाळ l तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ; यवतमाळ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे सुविधा केंद्र सुरूमहाराष्...
25/05/2026

📍 यवतमाळ l तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ; यवतमाळ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे सुविधा केंद्र सुरू

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ मधील तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून, विद्यार्थ्यांना २० मे ते २२ जून या दरम्यान ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता आणि प्रवेश अर्ज शुल्क इत्यादी बाबींची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत दहावीनंतर पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल, तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना योग्य ती मदत व्हावी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष अर्ज भरू शकतात, तसेच त्यांच्या विविध समस्यांचे आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी या केंद्रामधून मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय, विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीसाठी प्रत्यक्ष पडताळणी आणि ऑनलाईन पडताळणी असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर हा अर्ज संबंधित सुविधा केंद्राकडे पाठविला जाईल, आणि ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावरच अर्ज निश्चित केला जाईल. जाहीर झालेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार २४ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रवर्गानुसार जात किंवा जमात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठीचे (इडब्य्लूएस) प्रमाणपत्र, दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, सैन्य दलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अल्पसंख्याक प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (टी.सी.) ही आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. तरी या प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रप्रमुख यू. एम. शिरभाते यांच्याशी संपर्क साधावा, तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळचे प्राचार्य ए. पी. मटाले यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे युवा संवाद उपक्रमांतर्गत नालंदा ॲकॅडमी, वर्धा येथील अनुप कुमार यांनी स्पर्धा प...
25/05/2026

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे युवा संवाद उपक्रमांतर्गत नालंदा ॲकॅडमी, वर्धा येथील अनुप कुमार यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले.


📍 यवतमाळ l पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव आमंत्रित> नामांकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल> ३१ जुलैपर्यंत मुदत देशा...
25/05/2026

📍 यवतमाळ l पद्म पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव आमंत्रित
> नामांकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल
> ३१ जुलैपर्यंत मुदत

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जाणारे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पद्म पुरस्कारांसाठी केंद्र शासनामार्फत नामांकन प्रस्ताव अथवा शिफारस मागविण्यात आले आहेत.

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. या संदर्भातील अधिनियम व नियम केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २७ मार्च २०२६ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे अवलोकन करुन नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यानुसार पात्र व शिफारस करण्यायोग्य व्यक्तींचे प्रस्ताव किंवा शिफारस दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अंतिम मुदतीनंतर कोणतेही नामांकन अथवा शिफारस स्वीकारली जाणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे.

Address

तहसिल कार्यालयाजवळ, दगडी इमारत, नागपूर रोड
Yavatmal
445201

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share