मनसे वरळी अधिकृत

मनसे वरळी अधिकृत महाराष्ट्र धर्म वाढवावा!

19/03/2026

आपणा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

19/03/2026
16/03/2026

देशावर महाराष्ट्रावर मराठीवर आणि विशेषतः *“मा.श्री.राज साहेबांवर”* प्रेम करणारा आमचा एक *“मुस्लिम भाऊ”*!!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग सचिव प्रथमेश जामदार यांनी लोअर परळ परिसरात मनसे सभासद नोंदणी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला भिवंडी वरून आलेल्या *श्री मोहम्मद अखिल अहमद शहा* यांनी साहेबांबद्दल व्यक्त केलेलं भावना नक्की ऐका !!!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लोअर परळ स्टेशन परिसरात मनसे सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. या...
16/03/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लोअर परळ स्टेशन परिसरात मनसे सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला अनेक नागरीक,विद्यार्थी, तरुण व तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना एका नव्या जोमाने पुढे जात आहे, या प्रक्रियेत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा.
अयजोक- प्रथमेश जामदार व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वरळी विधानसभा!!

आपला नम्र
श्री. संजय जामदार
उपाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य)

10/03/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सुरु झालेल्या सदस्य नोंदणीत आज रायगडावर राज साहेबांनी पहिला फॉर्म भरत, सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. उद्यापासून महाराष्ट्रभर सर्वत्र नोंदणी सुरु होईल.

ा_वर्धापनदिन #महाराष्ट्रसैनिक #निष्ठावंत

08/03/2026

उद्या दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ठिक ८ वाजता, *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन सोहळा, किल्ले रायगड* येथे होणाऱ्या ह्या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी मुंबईहून निघाले असता, मनसेचे उपाध्यक्ष *श्री.संजयभाई जामदार,श्री.बंटीभाई म्हशिलकर,श्री. अरविंदजी गावडे* हे तमाम मनसेच्या पदाधिकाऱ्यांना व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करीत आहेत की सर्वांनी ह्या *ऐतिहासिक सोहळ्याचे* साक्षीदार व्हावे. यावेळी उपस्थित मनसेचे उपाध्यक्ष *श्री.श्रीधरजी जगताप* व महाराष्ट्र सैनिक *श्री.शैलेशजी* उपस्थित होते.

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र, आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी मा...
08/03/2026

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,

आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच.
अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत.

आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.

सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत !

प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा.
तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.

बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच !

स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !

धन्यवाद !

आपला नम्र

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळी विधानसभा-१९९दिवस दुसरा- मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे मराठी भाषाचे पुस्तक प्रदर्शन...
01/03/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळी विधानसभा-१९९
दिवस दुसरा- मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे मराठी भाषाचे पुस्तक प्रदर्शनी व विक्री उपक्रम !!
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी! एवढ्या जगात माय मानतो मराठी... !!!

Abhanga Repost सोबतचा हा अनुभव केवळ एक क्षण नव्हता, तर एक सुंदर आठवण बनून राहिला 🙏✨अभंगाच्या स्वरांनी मन शांत झालं आणि श...
01/03/2026

Abhanga Repost सोबतचा हा अनुभव केवळ एक क्षण नव्हता, तर एक सुंदर आठवण बनून राहिला 🙏✨
अभंगाच्या स्वरांनी मन शांत झालं आणि श्रद्धेने हृदय भरून आलं.
संगीतातून भक्ती अनुभवण्याचा हा अविस्मरणीय प्रवास.

मुंबई,धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड वरील मेलोडी रोड विरोधात आंदोलन केलेल्या महाराष्ट्र सैनिकांची मनसे नेते यु...
19/02/2026

मुंबई,धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड वरील मेलोडी रोड विरोधात आंदोलन केलेल्या महाराष्ट्र सैनिकांची मनसे नेते युवराज श्री अमित राज साहेब ठाकरे यांनी भेट घेतली व सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले यावेळेस असेच मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी सदैव सतर्क रहाल अशा भावना व्यक्त केल्या !!!
- मनसे वरळी अधिकृत.

19/02/2026

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा.

#छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती #महाराष्ट्र

Address

Worli

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे वरळी अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share