DeoWashim

DeoWashim Deputy District Election Officer Washim

मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी आज नवी दिल्लीत...
30/07/2025

मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे शिवसेनेच्या ४ सदस्यीय शिष्टमंडळासोबत, ज्याचे नेतृत्व श्री. उदय सामंत यांनी केले, चर्चा केली आणि त्यांच्याकडून सूचना स्वीकारल्या.
सविस्तर वाचा : eci.gov.in/eci-backend/pu…

मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी आज नवी दिल्लीत...
30/07/2025

मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे शिवसेनेच्या ४ सदस्यीय शिष्टमंडळासोबत, ज्याचे नेतृत्व श्री. उदय सामंत यांनी केले, चर्चा केली आणि त्यांच्याकडून सूचना स्वीकारल्या.
सविस्तर वाचा : eci.gov.in/eci-backend/pu…

Required Notices about Income Tax Department
17/10/2024

Required Notices about Income Tax Department

25/04/2024

मा. सुश्री. बुवणेश्वरी एस, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, वाशीम यांनी दि.२६/०४/२०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुक मतदानाकरिता जिल्ह्यातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी महिला मतदार व युवा मतदारांना प्राधान्याने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच दि. २६/०४/२०२४ रोजी जिल्ह्यामध्ये जवळपास 250 लग्नसोहळा पार पडणार आहे. त्या नव विवाहित जोडप्यांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात येत आहेत.

#आम्हीवाशिमकर #मतदानकरणार #100%voting

24/04/2024

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी व्हिडीओ च्या माध्यमातून केले मतदान करण्याचे मतदारांना आवाहन *मतदान दि.२६/०४/२०२४* #आम्हीवाशिमकरमतदानकरणार

जिल्हयात मतदार जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची  बुवनेश्वरी एस.जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद...
23/04/2024

जिल्हयात मतदार जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची
बुवनेश्वरी एस.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद

जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन

वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात मतदान जनजागृती आणि जिल्हा प्रशासनाची तयारी या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या, शुक्रवारी 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून शांततेत मतदान पार पडेल या उद्देशाने जिल्हा प्रशासन काम करीत आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या मतदारही मतदानापासून वंचित राहणार नाही या उद्देशाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे.
आपला वाशिम जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत मागे आहे. गेल्या निवडणुकीत ही टक्केवारी फक्त 60 टक्के होती. मात्र यावेळी ही टक्केवारी 75 टक्क्यापर्यंत नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्हा प्रशासनाला प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. प्रसारमाध्यमांनी मतदानविषयी जनजागृती करण्यास तसेच प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील नवमतदार आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. तरुण पिढीतील युवक युवतींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी आकर्षण वाढविण्याकरिता वेगवेगळ्या थीमवर रिल्सची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यामुळे नवीन पिढीमध्येही या लोकशाही उत्सवाच्या अनुषंगाने जागरूकता निर्माण होईल. असेही श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या.
प्रशासनाकडून प्रत्येक गाव, तांडा, वस्ती आणि शहरातील विविध भागांमध्ये मतदार जनजागृती विषयक कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये कलापथकांकडून पथनाट्य, एलईडी व्हॅनच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिडिओ तसेच नगरपरिषदेच्या घंटागाडीच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी जनजागृतीपर बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीपत्रके लावून जनजागृती करण्यात येत आहे. याचबरोबर प्रसार माध्यमांना वेगवेगळया प्रकारचे व्हिडिओज, रील यांचेही वापर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात गृह मतदान पूर्णत्वास येत आहे. वाशिम कारंजा आणि रिसोड या तिन्ही ठिकाणी 90 टक्केच्या वर गृह मतदान करून घेण्यात आले असून यामध्ये दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले आणि या सुविधेच्या उपलब्धतेमुळे आनंद व्यक्त केला आहे. 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी आणि शेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या. मतदारांना आपले मतदान केंद्र व मतदान क्रमांक जाणून घेण्यासाठी त्या-त्या मतदारसंघाच्या दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यास मतदारांना त्यांचे बूथ क्रमांक आणि मतदान क्रमांक सांगण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राची गुगल मॅपवर लोकेशन दाखवण्यात येत आहे. तरी सर्व मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर केंद्रांवर जाऊन मतदान करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वर एस. यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेस मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
*******

मतदान जनजागृती एलईडी रथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभवाशिम,दि.२२ (जिमाका) जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक...
23/04/2024

मतदान जनजागृती एलईडी रथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

वाशिम,दि.२२ (जिमाका) जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान जनजागृतीसाठी एलईडी रथ तयार करण्यात आले आहे. या एलईडी रथाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव, जिल्हा माहिती अधिकारी यासीरोद्दीन काझी, नायब तहसीलदार सतीष काळे, सहाय्यक नोडल अधिकारी राजेश काळे, गुलाम यसदाणी आदींची उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्याचे मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील महिला आणि नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच इतर मतदारांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याच्या अनुषंगाने रील्स आणि सेल्फी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही वापर करण्यात येत आहे.

वाशिमकरांनी या लोकशाही उत्सवाचे जल्लोषात स्वागत करून आपल्या आपल्या अधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणास सहकारी करावे असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.

या एलईडी रथाद्वारे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाचे व्हिडिओ, निवडणूक विभागाने तयार केलेल्या ये पुढे मतदान कर हे गीत तसेच वोटर हेल्प या ॲप्लिकेशनला कसे हाताळावे याबाबत प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी टाळ वाजवी, सिईओंच्या हाती खंजिरीमतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी !मानवी साखळी तथा रॅली उत्साहातवा...
23/04/2024

जिल्हाधिकारी टाळ वाजवी, सिईओंच्या हाती खंजिरी
मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी !

मानवी साखळी तथा रॅली उत्साहात

वाशिम,दि.२३ (जिमाका) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या *मताधिकार जाणीव जागृती करीता मानवी साखळी तथा रॅलीचे आयोजन* करण्यात आले होते.
या रॅलीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव,स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी निलेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्थानिक लोककलावंतांनी मतदार जनजागृती गीत गाऊन जनजागृती केली. रॅलीमध्ये बाकलीवाल शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थीनींसह महसूल विभाग, जिल्हा परिषद , नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  ॲपcVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाहीआचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर आपण त्यांना रोखू शकतो.प्...
23/04/2024

ॲप

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर आपण त्यांना रोखू शकतो.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

App डाउनलोड करण्यासाठी क्यू.आर कोड स्कॅन करा

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

ॲप

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर आपण त्यांना रोखू शकतो.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

App डाउनलोड करण्यासाठी क्यू.आर कोड स्कॅन करा

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

23/04/2024

उत्सव निवडणुकीचा मतदान जनजागृती जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम अंतर्गत एनसीसी विद्यार्थी

**मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी!मतदानाला जाऊ मतदानाला जाऊ*

23/04/2024

*जिल्हाधिकारी टाळ वाजवी सिईओंच्या हाती खंजिरी,*
**मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी!मतदानाला जाऊ मतदानाला जाऊ*

वाशिम जिल्हाधिकारी मा. श्रीमती बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. वैभव वाघमारे यांच्या आदेशान्वये Sveep Activity अंतर्गत दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या *मताधिकार जाणीव जागृती करीता मानवी साखळी तथा रॅलीचे आयोजन* करण्यात आले होते.
यामध्ये स्थानिक लोककलावंतांनी गीतं गाऊन जनजागृती केली. रॅलीमध्ये बाकलीवाल शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थीनींसह महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Address

Old Kata Road District Collector Office Washim
Washim
444505

Opening Hours

Monday 9:45am - 5:45pm
Tuesday 9:45am - 5:45pm
Wednesday 9:45am - 5:45pm
Thursday 9:45am - 5:45pm
Friday 9:45am - 5:45pm
Saturday 9:45am - 5:45pm

Telephone

072522 32852

Alerts

Be the first to know and let us send you an email when DeoWashim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DeoWashim:

Share