VillageBook,Washim

VillageBook,Washim WASHIM Created just a few years ago, Washim district is already making its presence felt. It has gre Government Organization

22/09/2025
20/09/2025

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना

17/09/2025

मंत्रालय प्रवेश नोंदणीसाठी आता रांगा नाही.. केवळ एका क्लिकवर मंत्रालयात प्रवेश निश्चित..वेळ वाचवा डिजीप्रवेश ॲप सोबत... Digi Pravesh ॲप डाउनलोड करा आणि सहज, सोपा प्रवेश मिळवा.. अगदी काही क्षणात मंत्रालयात..

17/09/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ

Narendra Modi Devendra Fadnavis
#ग्रामविकास

17/09/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना'चा शुभारंभ

स्थळ : किनगाव, तालुका फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
दि. १७ सप्टेंबर २०२५, सकाळी १० वाजता

16/09/2025

लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

· तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडा ; नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार

· जिल्हा प्रशासन सज्ज

वाशिम, दि. १६ सप्टेंबर (जिमाका) : महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध उपक्रम राबवून तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सेवा पंधरवडयातील उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.



सेवा पंधरवडया निमित्त लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम महसूल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने महसूल व वने विभागामार्फत १७ ते २२ सप्टेंबर, २३ ते २७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर अशा तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. सेवा पंधरवडा दरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची अंमलबजावणी करीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.



पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत गावांच्या पाणंद किंवा शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करणे व त्यांना क्रमांक देण्याचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. यासोबतच नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद घेण्याचे आणि शेतरस्त्यांच्या सीमांकन व रस्त्यांविषयीच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सीमांकन व रस्ता अदालतांचे आयोजन करण्यात येणार आहे.



दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमांतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून घर देण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे. व इतर घरकुल लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे.



पंधरवडयाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्याला नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे उद्दिष्टय देण्यात आले आहे. याअंतर्गत जनसंवाद/ आदिसेतू अभियान राबवून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत मंडळस्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ अंतर्गत पारीत आदेशांची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.



७/१२ अद्यावतीकरण, जिवंत ७/१२ मोहिम टप्पा १ व २ अंतर्गत वारसाहक्क नोंदी अद्यावत करणे, पोटखराब क्षेत्र नोंदी व महिला वारस नोंदी अद्यावत करणे. प्रलंबित न्यायालयीन व अर्ध न्यायिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्राप्त प्रकरणांची मंडळ स्तरावर चौकशी करणे, स्थळ पहाणी करुन अहवाल अंतिम करणे व प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी संवाद उपक्रमाची अंमलबजावणी मंडळस्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामुळे जमीन व्यवहार पारदर्शक होतील आणि‍ नागरिकांना तात्काळ माहिती व सेवा मिळणार आहे.

आपल्या जिल्ह्याला अधिक सुसज्ज आणि सेवाभिमुख बनवूया ! ‘सेवा पंधरवडा’ दरम्यान नागरिकांची मते, सूचना आणि सहभाग महत्त्वाचा आहे. रस्ते, घरं, शेतकरी समस्या किंवा इतर तक्रारी असतील, तर त्यांनी खुलेपणाने नोंद करून प्रशासनास कळवा. आपल्या सहभागानेच बदल शक्य आहे‌. “सेवा पंधरवाडा” हा शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. सर्वांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*****

13/09/2025
13/09/2025
12/09/2025

नागरिक केंद्रीत 'आपले सरकार २.०' पोर्टल कार्यान्वित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'इज ऑफ लिव्हिंग' सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

03/09/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जिल्हा स्तरीय कार्यशाळेस मार्गदर्शन करताना मा. पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे साहेब...

आज “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” वाशिम जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस मा. पालकमंत...
03/09/2025

आज “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” वाशिम जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस मा. पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी ऑनलाईन सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र/राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक गतिमानकारकरित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी याकरिता चालु वर्षापासुन प्रथमतःच "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावा-गावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे आणि गावाला आत्मनिर्भर करणे हा आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व गावांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन मा. महोदयांनी केले.

Address

जिल्हा परिषद, काटा रोड
Washim
४४४५०५

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

07252232152

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Washim:

Share