Mantri Park Ganesh Utsav

Mantri Park Ganesh Utsav मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळ, वाशीम

09/09/2026

गणेशोत्सव 2026 !
भक्तीची अनुभूती, संस्कृतीची ओळख!

एक शाळा…एक उपक्रम… हजारो विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचा संस्कार!मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भाग मौजे चिवरा येथील जिल्हा ...
28/08/2026

एक शाळा…
एक उपक्रम…
हजारो विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचा संस्कार!
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भाग मौजे चिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्ययनरत शालेय विद्यार्थ्यांसाठी #शाडू_माती गणेशमूर्ती प्रशिक्षणाची #द्वितीय_कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून स्वतःच्या हातांनी श्री गणरायाची मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण प्रसिद्ध मूर्तिकार श्री सुदर्शनजी ताजनेकर व सौ पल्लवीताई सुदर्शन ताजनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना देण्यात आले.
“माझा गणपती… माझ्या हातांनी!”
या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आकार देत पर्यावरणपूरक गणराय घडविला.

🌿 शाडू मातीची मूर्ती म्हणजे निसर्गाशी मैत्री आणि पर्यावरणाशी बांधिलकी!
गणरायाची स्थापना भक्तिभावाने करताना उत्सवामुळे जलप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे हीदेखील आपली सामाजिक जबाबदारी आहे. हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा छोटासा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

👧👦 चिमुकल्या हातांनी घडलेला गणराय…
मनात रुजलेला पर्यावरण संवर्धनाचा संस्कार…
आणि भविष्यातील हरित गणेशोत्सवाची सुंदर आशा!

🏫 इतर शाळांनाही मनापासून आवाहन!

वाशिम शहर व ग्रामीण भागातील शाळा व शिक्षकांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शाडू माती, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती करावी.

आपल्या शाळेतही अशी कार्यशाळा किंवा जनजागृती उपक्रम राबविण्याची इच्छा असल्यास मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे. 🤝🌿
चला, आपल्या लहानग्यांच्या हातून पर्यावरणपूरक गणराय साकारूया आणि हरित गणेशोत्सवाची चळवळ घरोघरी पोहोचवूया!

27/08/2026

शाडूमाती गणेशमूर्ती प्रशिक्षण कार्यशाळा !
Eco friendly Ganesh murti

🙏🌱 मनःपूर्वक धन्यवाद! 🌱🙏मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम यांच्या वतीने आयोजित निःशुल्क शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळेल...
27/08/2026

🙏🌱 मनःपूर्वक धन्यवाद! 🌱🙏

मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम यांच्या वतीने आयोजित निःशुल्क शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामागे आपल्या पत्रकार बांधवांच्या समर्थ लेखणीचे आणि मोलाच्या सहकार्याचे मोठे योगदान आहे.

आमच्या आवाहनाला आपल्या वृत्तपत्रातून स्थान देत, वाशिम शहरातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पोहोचवून जनजागृती निर्माण केल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार! 📰🙏

शाडू माती म्हणजे केवळ माती नव्हे; ती निसर्गाशी नाते जोडणारी, पर्यावरण संवर्धनाची आणि भावी पिढीमध्ये संस्कार रुजविणारी एक सुंदर वाट आहे. 🌿

आपल्या लेखणीच्या माध्यमातून या विचाराला मिळालेली दिशा आणि व्यापकता यामुळेच कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

✍️ आपली लेखणी समाजजागृतीची मशाल बनून अशीच सकारात्मक परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवो!
आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🌺

🙏 मनीष घनश्यामजी मंत्री
अध्यक्ष, मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम

🚩 गणपती बाप्पा मोरया!
🌱 पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प करूया! 🌱

27/08/2026

धन्यवाद..!
Team DDSahyadri
जय महाराष्ट्र..!

Following

25/08/2026

धन्यवाद..!
Team Lokshahi Marathi
जय महाराष्ट्र..!

Following

24/08/2026

धन्यवाद..!
Team Jai Maharashtra News
जय महाराष्ट्र..!

Following

मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम च्या वतीने आयोजित निःशुल्क  #शाडू_माती गणेशमूर्ती कार्यशाळेची माहिती जनजागरण आणि आव्ह...
24/08/2026

मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम च्या वतीने आयोजित निःशुल्क #शाडू_माती गणेशमूर्ती कार्यशाळेची माहिती जनजागरण आणि आव्हानाची बातमी आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल माझ्या वाशिम शहरातील त्या सर्व पत्रकार बांधवांचे आमच्या संपूर्ण मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार!

आपल्या लेखणीच्या माध्यमातून कलेला संस्कार, श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड आणि समाजाला सकारात्मक दिशा मिळाली. समाजहिताच्या प्रत्येक उपक्रमाला आपल्या लेखणीची अशीच समर्थ साथ लाभो!
आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🌺

मनीष घनश्यामजी मंत्री
अध्यक्ष, मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम

🙏 भक्तीच्या स्पर्शाने, संस्कारांच्या मातीने आणि बालमनाच्या प्रेमाने साकारलेले बाप्पा… शाडूमती कार्यशाळेतील ५००+ विद्यार्...
24/08/2026

🙏 भक्तीच्या स्पर्शाने, संस्कारांच्या मातीने आणि बालमनाच्या प्रेमाने साकारलेले बाप्पा… शाडूमती कार्यशाळेतील ५००+ विद्यार्थ्यांच्या सहभागाची ही अविस्मरणीय भक्तिमय झलक! 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया!

23/08/2026

🌱🙏 शाडूमाती कार्यशाळा — एक सुंदर, पर्यावरणपूरक पाऊल! 🙏🌱

मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित शाडूमाती गणपती कार्यशाळेला ५००+ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला! ❤️

या कार्यशाळेत आपल्या चिमुकल्या कलाकारांनी स्वतःच्या हातांनी शाडूमातीचे गणपती बाप्पांचे सुंदर मूर्तीस्वरूप घडवले. 🪔✨

ही कार्यशाळा म्हणजे भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम! 🪔
ही केवळ मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नव्हती…
तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि तो प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा एक छोटासा पण महत्त्वपूर्ण प्रयत्न होता. 🌿

आजच्या या छोट्या हातांनी उद्याच्या निसर्गस्नेही समाजाची पायाभरणी केली! 💚

निसर्ग जपूया… संस्कृती जपूया! 🌱

#शाडूमातीकार्यशाळा
Eco friendly Ganpati murti Ganesh Utsav students social responsibility kids awareness ganesh murti decoration Ganpati mandap

Address

Mantri Park Square, Mantri Park
Washim
444505

Opening Hours

Monday 9am - 11:45pm
Tuesday 9am - 11:45pm
Wednesday 9am - 11:45pm
Thursday 9am - 11:45pm
Friday 9am - 11:45pm
Saturday 9am - 11:45pm
Sunday 9am - 11:45pm

Telephone

+919422861698

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mantri Park Ganesh Utsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share