जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

  • Home
  • India
  • Washim
  • जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम GOVERNMENT OFFICE

05/06/2026

महाराष्ट्रातील दुर्मिळ #हस्तलिखिते, प्राचीन ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे संवर्धन व जतन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी हस्तलिखित सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी ही समिती गठितकरण्यात आली आहे. यामुळे हस्तलिखितांच्या संवर्धनाला चालना मिळाल्यास भावी पिढ्यांसाठी अमूल्य ऐतिहासिक ठेवा सुरक्षित राहण्यास मदत होणार असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अंतर्गत ग्रंथालयांमध्ये जतन करण्यात येणाऱ्या जुन्या व दुर्मिळ पुस्तकांसह हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने समिती स्थापन केली असून समितीच्या अध्यक्षपदी ग्रंथालय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे.

या समितीमध्ये पद्मश्री डॉ. अच्युत पालव, संशोधक तेजस्विनी सचिन पाठक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे डॉ. श्रीनंद लक्ष्मण बापट, इतिहासतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित तसेच डेक्कन कॉलेजचे प्रा. अभिजित दांडेकर अशा तज्ज्ञांचा समावेश आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी (हस्तलिखित विभाग) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. विविध क्षेत्रांतील हस्तलिखित केलेले जुनी व दुर्मिळ पुस्तके, नियतकालिके व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची आणि इतर कागदपत्रे शासनास मिळवून देण्यासाठी समिती काम करेल. समितीच्या प्रतिवर्षी किमान दोन बैठका अध्यक्षांच्या अनुमतीने घेण्यात येतील.

05/06/2026

महाराष्ट्र शासनाच्या #ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल लायब्ररी ग्रँट मॅनेजमेंट सिस्टिम (एलजीएमएस) या ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या १४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक ग्रंथालयांना वार्षिक अहवाल तसेच लेखापरीक्षण अहवाल एलजीएमएस प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार चालू वर्षासाठी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया ३० जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

राज्यातील सर्व सहायक ग्रंथालय संचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तसेच शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रंथालयांना आवश्यक मार्गदर्शन करून वार्षिक अहवाल अचूक व वेळेत सादर होतील यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

📢 महत्त्वाची सूचनाआदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्दमहाराष्ट्र विधान परिषदेच...
05/06/2026

📢 महत्त्वाची सूचना

आदर्श आचारसंहितेमुळे जून महिन्यात विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन रद्द

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या वार्षिक निवडणूक-२०२६ साठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे जून २०२६ महिन्यात आयोजित करण्यात येणारा विभागीय लोकशाही दिन तसेच महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १८ मे २०२६ पासून संबंधित निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. शासनाच्या नियमानुसार आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रात संबंधित स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करता येत नाही.

नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

#महत्त्वाची_सूचना #लोकशाहीदिन #महिलालोकशाहीदिन #आदर्शआचारसंहिता

🏫 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू 📚इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी तसेच पदवी, पदविका आणि...
05/06/2026

🏫 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू 📚

इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी तसेच पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

📍 स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, तुळजापूर (ता. मंगरूळपीर)

विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा :

🍛 मोफत भोजन व निवास व्यवस्था
📖 सुसज्ज ग्रंथालय
📝 स्वतंत्र वाचन कक्ष
💪 आधुनिक जिम
🎯 स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
🌳 स्वच्छ व निसर्गरम्य परिसर

आरक्षणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

💻 ऑनलाइन अर्जासाठी :
https://hmas.mahait.org

📞 अधिक माहितीसाठी :
पी. आर. गिरी
मो. ८७८८२९५६६८

उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

🌾 जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लिग स्पर्धा अभियानात उत्स्फूर्त सहभाग 🌾कृषी विभाग व आत्मा, वाशिम यांच्या सं...
05/06/2026

🌾 जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लिग स्पर्धा अभियानात उत्स्फूर्त सहभाग 🌾

कृषी विभाग व आत्मा, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या फार्मर ग्रुप लिग (एफजीएल) २०२६ या अभिनव स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७६८ शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला आहे.

📌 तालुकानिहाय सहभाग :
🔹 रिसोड – १४८
🔹 वाशिम – १३५
🔹 मानोरा – १३१
🔹 कारंजा – १२८
🔹 मालेगाव – ११५
🔹 मंगरुळपीर – १११

या स्पर्धेद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, नैसर्गिक शेती, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, जलसंधारण, पीक संरक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार केला जाणार आहे. तसेच "खेती बचाओ अभियान" प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांमध्ये सामूहिक कृती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याला चालना दिली जाणार आहे.

🌱 संघटित शेतकरी, समृद्ध शेती आणि शाश्वत विकास हेच या अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम कृषी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

#शेतकरी_गट #नैसर्गिक_शेती #कृषीविकास

🌍 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ 🌱जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर...
05/06/2026

🌍 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ 🌱

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प दिला.

🌳 किमान पाच वृक्षांची लागवड व संगोपन
💧 पाणी संवर्धन
⚡ विजेचा काटकसरीने वापर
🚲 पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब
🌿 सेंद्रिय खतांचा वापर व परसबाग विकास

हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे.

"हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी आजच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प करूया!" 🌎💚

#माझीवसुंधरा #जागतिकपर्यावरणदिन

💧 जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा 💧जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेख...
05/06/2026

💧 जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा 💧

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जल व स्वच्छता मिशनची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत जल जीवन मिशन, नळपाणी पुरवठा योजना तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

✅ जिल्ह्यातील सुमारे ७४० पाणीपुरवठा योजनांपैकी ४४० योजना पूर्ण
✅ सुमारे २.०२ लाख घरांना कार्यक्षम घरगुती नळजोडणी उपलब्ध
✅ जिल्ह्याची जल जीवन मिशन अंतर्गत प्रगती सुमारे ९२ टक्के
✅ हर घर जल उपक्रमांतर्गत सुमारे १५० गावे घोषित
✅ सामुदायिक स्वच्छता संकुलांची सुमारे ३०० कामे पूर्ण
✅ सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची प्रगती सुमारे ८४ टक्के

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियमित स्थळभेटी घेऊन कामांची गुणवत्ता तपासण्याचे, प्रगतीचा सातत्याने आढावा घेण्याचे तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित आहेत की नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले.

"प्रत्येक योजना वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे." — जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

05/06/2026

राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार #बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी #कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता #महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात तब्बल २ लाख प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ३ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ६६ हजार ७५० क्विंटल सोयाबीन तसेच ३५ हजार ५०० क्विंटल भूईमूग बियाण्यांचा समावेश असून इतर खरीप पिकांची बियाणेदेखील महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन ‘बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते’ या शीर्षकाअंतर्गत अर्ज करावेत. अर्ज प्रक्रियेसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

#खरीपहंगाम

05/06/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन कालावधीस मुदतवाढ
शासन परिपत्रक 👉 :https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202606041135574320.pdf

#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान
#महाराष्ट्रशासन
#शासनपरिपत्रक

विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न आणि तंत्रज्ञानसज्ज मानव संसाधनाची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. ...
04/06/2026

विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न आणि तंत्रज्ञानसज्ज मानव संसाधनाची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ( #एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या नवतंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, या बदलांना सामोरे जाण्यासाठी युवकांना आधुनिक कौशल्ये देणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित वाय४डी (युथ फॉर डेव्हलपमेंट) ‘इंडिया @ २०४७ – पॉवर ऑफ स्किल अँड एज्युकेशन’ कार्यक्रमात सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, युथ फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष प्रफुल निकम यांच्यासह विविध उद्योग समूहांचे प्रमुख उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. देशातील २५ कोटी नागरिक अतिदारिद्र्यातून बाहेर आले असून पायाभूत सुविधा, निवास, स्वच्छता आणि उपजीविकेच्या संधींमुळे सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टासाठी कौशल्य विकासाला विशेष महत्त्व असल्याचे सांगून त्यांनी युवकांच्या लोकसंख्यात्मक लाभाचे रूपांतर आर्थिक शक्तीत करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विविध उद्योग समूहांच्या सामंजस्य करारांच्या कार्यामुळे झालेल्या परिणाम अहवालांचे प्रकाशन करण्यात आले. समाजपरिवर्तनाच्या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व उद्योग समूहांचे तसेच वाय४डी संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.

#विकसितभारत
#कृत्रिमबुद्धिमत्ता

Address

District Information Office
Washim
444505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम:

Share