VillageBook,RajuraBajar,Warud,Amravati

VillageBook,RajuraBajar,Warud,Amravati ग्रामपंचायत राजुरा बाजार
पं.स. वरुड, जि. प. अमरावती

अमरावती नागपूर हायवेवर प्रवास करत असताना आपल्याला खूप मोठी एक नदी लागली त्या नदीचे नाव वर्धा असे होते त्याची माहिती खाली...
11/10/2025

अमरावती नागपूर हायवेवर प्रवास करत असताना आपल्याला खूप मोठी एक नदी लागली त्या नदीचे नाव वर्धा असे होते त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक मुख्य नदी. लांबी ४६४ किमी. मध्य प्रदेश राज्याच्या बेतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील मुलताई पठारावर ही नदी उगम पावते.

मध्यप्रदेश राज्यातून वाहत येऊन महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ती नागपूर-अमरावती, अमरावती-वर्धा, यवतमाळ-वर्धा, चंद्रपूर-यवतमाळ या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून साधारणपणे दक्षिणेस, पश्चिमेस नंतर पुन्हा दक्षिणेस व आग्‍नेयीस वाहत जाते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहराजवळ वर्धा नदीला उजवीकडून पैनगंगा नदी मिळते.

संगमानंतर वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्‍नेयीस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो.

एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.

वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते पैनगंगा नदीला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्‍नेय भाग निग्‍न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे दगडी कोळशाचे साठे विपुल प्रमाणात सापडतात.

शेती हा वर्धा खोऱ्यातील प्रमुख व्यवसाय असून भात, ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. वर्धा नदीच्या तीरावर अनेक ठिकाणी मंदिरे, स्मारके आणि मराठा-पेंढारी काळातील किल्ल्यांचे अवशेष पहावयास मिळतात.

22/02/2025
आज दिनांक २२/०२/२०२५ रोजी ग्रामपंचायत राजुरा बाजार अंतर्गतजिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राजुरा बाजार येथेप्रधानमंत्री...
22/02/2025

आज दिनांक २२/०२/२०२५ रोजी ग्रामपंचायत राजुरा बाजार अंतर्गत
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राजुरा बाजार येथे
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा ०२ अंतर्गत घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता ऑनलाइन वितरण करण्याकरिता कार्यक्रम राबविण्यात आला होता.
सदर कार्यक्रम मा. सरपंच श्री. निलेश रत्नाकरराव धुर्वे, मा. उपसरपंच श्री. मनोहर रामचंद्रजी भोंडे तसेच सर्व सदस्य गण व सर्व कर्मचारी ग्रामपंचायत, राजुरा बाजार यांचे उपस्थितीमध्ये घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना महाराष्ट्र सरकार च्या Webcast link for today's event
https://webcast.gov.in/maharashtra/rdd या लिंकवरून थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
प्रक्षेपणादरम्यान नागरिकांच्या खात्यामध्ये घरकुलचा प्रथम हप्ता वितरित करण्यात आला. प्रक्षेपणानंतर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
यामध्ये राजुरा बाजार येथील घरकुल लाभार्थ्यांनी सुद्धा मोठया संख्येने उपस्थित राहून सभा पूर्णत्वास नेण्यात योगदान दिले.
अशाप्रकारे आजची सभा यशस्वीरित्या पार पडली

02/09/2021

जाहीर आवाहन

02/09/2021

जाहीर आवाहन
ताप उद्रेक प्रतिबंधात्मक उपाययोजना
१) घरातील वापरायचे पाणीसाठे, रांजण, सिमेंटची टाकी, ड्रम इत्यादींमधील पाण्यामध्ये चामडोक आढळून आल्यास त्वरित भांडी रिकामी करून कोरडे करावे कारण डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
२) नेहमीकरिता आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा.
३) गावातील सांडपाण्याच्या नाल्या ग्रामपंचायत मार्फत उपसल्या असून पाणी वाहते केले आहे. परंतु काही ठिकाणी पावसाळ्यात काही कचरा अडकून नाल्या तुंबल्या असतील तर आपापल्या घरासमोरील नाली मोकळी करून सांडपाणी वाहते करावे.
४) तांत्रिकदृष्ट्या नालीच्या खोलगट भागात पाणी थांबत असेल ते पाणी वाहते करणे शक्य नसल्यास पाण्यावर ऑईल किंवा तेल पदार्थ घासलेट किंवा फिनाईल सोडावे.
५) गावा मध्ये आपले स्वतःचे घरासमोर किंवा परिसरात शेणखताचे उकिरडे खताचे ढीग असल्यास ते गावाबाहेर काढावेत. मोठ्या स्वरूपाचे ढीग असल्यास परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत कडे लेखी तक्रारी दिल्यास ग्रामपंचायत कडून संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल.
६) वापरायचे पाणीसाठे झाकूनच ठेवावे.
७) घरात व परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
८) सार्वजनिक विहिरीवर हातपंपावर जनावरांचे हौदा जवळ कोणीही म्हशीवर पाणी टाकणे, जनावरे धुणे, कपडे धुणे, भांडी घासणे इत्यादी प्रकार करू नये तसेच घाण करू नये.
९) जलजन्य साथरोग यांची लक्षणे किंवा तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जवळच्या दवाखान्यात जावे.

तरी शासनाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकाचा मान ठेवून दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्या गावातील सर्व नागरिकांचे व परिसरातील लोकांचे आरोग्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे हेच जाहीर आवाहन
सर्व नागरिक/ आस्थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्याकरिता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे , सॅनीटायझर वापरणे, लसीकरण करणे व तपासणी तथा अलगीकरण या पंचसूत्रीचे पालन करून स्वतः चे व गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.

02/09/2021

राजुरा बाजार येथील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यात पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथरोगांचा उद्रेक व किटकजन्य आजारांचा उद्रेक उद्भवू नये म्हणून स्वतःचे कुटुंबाचे व परिसरातील लोकांचे आरोग्याचे दृष्टीने खालील सूचनांचे पालन करून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.

१) अशुद्ध पाणी पिल्याने अनेकदा गॅस्ट्रो कॉलरा अतिसार (डायरिया), विषमज्वर इत्यादी जलजन्य आजारांचा उद्रेक होत असतो.
२) ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणारा पिण्याचे पाणीपुरवठा दैनंदिन शुद्धीकरण करून करण्यात येतो. नळ पाणी पुरवठा याद्वारे येणारे पाणी पिण्यासाठी वापरावे.
३) काही तांत्रिक कारणांमुळे नळ पाणीपुरवठा द्वारे पाणी पुरवठा न झाल्यास सार्वत्रिक विहिरी, हातपंप, खाजगी विहिरी मधून पिण्याचे पाणी पुरवठा ग्रामपंचायत कडून पाणी शुद्धीकरण करण्यात आल्याची खात्री करूनच पिण्यासाठी वापरावे.
४) घराबाहेर जाताना किंवा शेतावर जाणाऱ्या मजुरांनी पिण्याचे पाणी सोबत न्यावे. नदी, नाले, ओढे किंवा शेतातील विहीरींचे पाणी पिऊ नये.
५) नळ पाणीपुरवठा व्यतिरिक्त काही अपरिहार्य कारणाने इतर ठिकाणचे पाणी प्यायचे असल्यास ते स्वच्छ कापडाने गाळून, उकळून व थंड करूनच प्यावे.
६) पावसाळ्याच्या दिवसात आठवडी बाजारातील भाजीपाला, फळे स्वच्छ पाण्याने धुवूनच खाण्यासाठी वापरावीत त्याचप्रमाणे बाजारातील उघडे असलेले खाद्यपदार्थ उदाहरणार्थ भजे, चिवडा, जलेबी, लाडू इत्यादी खरेदी करू नये.
७) घरातील रात्रीचे शिल्लक असलेले अन्न पदार्थ दुसरे दिवशी शिळे झाल्याने खाण्यासाठी वापरू नये त्यापासून अन्न विषबाधा,(फूडपॉईजन) अपचन, पोटदुखी इत्यादी सारखे आजार उद्भवतात.
८) पिण्याचे पाणी माठ, स्टील ड्रम, गुंड, भरणे जमिनीपासून अळणी वर उंचावर ठेवून पिण्यासाठी पाणी वापरताना ओंगराळ्याचा वापर करावा.
९) महिलांनी स्वयंपाका पूर्वी हात स्वच्छ धुवावे तसेच शौचास जाऊन आल्यानंतर व जेवणापूर्वी सर्वांनी हात स्वच्छ धुवूनच जेवण करावे.
१०) ज्यांचे खाजगी विहिरी वरून इतर लोक पिण्यासाठी पाणी नेत असतील त्यांनी ग्रामपंचायत कडे ब्लिचिंग पावडर करिता अर्ज केल्यास त्यांचे विहिरीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्धीकरण करण्यात येईल.
११) गावातील नळ पाणीपुरवठा पाईपलाईन, स्टँड पोस्ट, हातपंप, सार्वजनिक विहिरी, बोरवेल आपल्या मालकीच्या असून त्यांची देखभाल व निगा राखणे आपले कर्तव्य आहे.

सर्व राजुरा बाजार येथील नागरिकांना कळविण्यात येते की, आपल्या गावात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" हा उपक्रम राबविण्यात येत ...
20/10/2020

सर्व राजुरा बाजार येथील नागरिकांना कळविण्यात येते की, आपल्या गावात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे तरी सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा.

02/05/2020
मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार १)  सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास प्रथम २०० रु. दंड  व          दुसऱ्यांदा फौजदार...
28/04/2020

मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार
१) सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास प्रथम २०० रु. दंड व
दुसऱ्यांदा फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.

२) सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास प्रथम ५०० रुपये दंड व
दुसऱ्यांदा फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.

३) दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते यांनी सोशल डीस्टेंसिंग दोन
ग्राहकांमध्ये कमीतकमी ३ फुट अंतर न राखणे, मार्किंग न केलेले
आढळून आल्यास प्रथम दुकानदारास २०००/- रुपयेव ग्राहकास
२००/- रुपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही
करण्यात येईल.

याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

ग्रामपंचायत कार्यालय राजुरा बाजार पंचायत समिती,  वरुड , जि .अमरावतीजाहीर सूचनासर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोर...
18/03/2020

ग्रामपंचायत कार्यालय राजुरा बाजार
पंचायत समिती, वरुड , जि .अमरावती

जाहीर सूचना
सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेकरिता दर गुरुवारी भरणारा राजुरा बाजार येथील आठवडी बाजार ३१ मार्च २०२० पर्यंत तसेच पुढील आदेशापर्यंत भरणार नाही तसेच बाजारात कोणीही दुकाने लावू नये.
याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी

Address

Rajura Bajar
Warud
444906

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919860606231

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,RajuraBajar,Warud,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,RajuraBajar,Warud,Amravati:

Share