मा.रोहित दादा पवार विचार मंच.

  • Home
  • India
  • Wardha
  • मा.रोहित दादा पवार विचार मंच.

मा.रोहित दादा पवार विचार मंच. Are they the same as you do something for the community, for the purpose of strengthening the future of the children of farmers and farm laborers.

आपण या समाजातील लोक या समाजासाठी शेतकरी शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या मजबूत भविष्यासाठी आदरनीय पवार साहेब यांच्या धोरना नुसार आम्ही विदर्भातील सुशिक्षित भूमीपुत्रांनी चालू केलेला हा भव्यदिव्य प्रोजेक्ट आतापर्यन्त 2500 भूमीपुत्रांनी सहभाग घेतलेला आहे, राज्याचे भविष्य मा रोहित दादा पवार यांच्या विचार यात्रेत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता आपापले व्यवसाय सांभाळून..जय हिंद �

मा दत्ता भाऊ मेघे हें दानशूर नेते म्हणून विदर्भात प्रसिद्ध असं व्यक्तीमत्व त्यांच निधन म्हणजे सर्व सामान्य, गोर गरीब लोक...
22/03/2026

मा दत्ता भाऊ मेघे हें दानशूर नेते म्हणून विदर्भात प्रसिद्ध असं व्यक्तीमत्व त्यांच निधन म्हणजे सर्व सामान्य, गोर गरीब लोकांच हक्काचा आधार जो आज आपण गमावलाय.

आपल्या वर्धेच्या मातीत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि सचोटीने, कष्टाने कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःचे अस्तित्व तयार करून लाखो लोकांना रोजगार मिळवून दिला अश्या या धरती पुत्राला अखेरचे विनम्र अभिवादन 💐

विस्थापितांचा आधारवड कोसळला🙏💐

ज्येष्ठ नेते आणि मा. खा. दत्ता मेघे (८९) यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. मेघे साहेब यांच्या निधनाने प्रामुख्याने विदर्भातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं पर्व काळाच्या पडद्याआड गेलं. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना!

Rohit Rajendra PawarDevendra FadnavisSupriya SuleNitin GadkariEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेरोहितदादा पवार यांना सुर...
18/02/2026

Rohit Rajendra Pawar
Devendra Fadnavis
Supriya Sule
Nitin Gadkari
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
रोहितदादा पवार यांना सुरक्षा दिलीच पाहिजे..
काहीही होऊ शकते सध्याच वातावरण बघता....

18/02/2026
10/02/2026

अवश्य बघा मा रोहित दादा पवार यांची पत्रकार परिषद.

अजितदादा यांचा घातपात.... रोहित दादा पवार यांची मागणी...

दादा....भावपुर्ण श्रद्धांजली...एकच वादा.... अजितदादा...https://www.facebook.com/share/1N1dsdvHkx/
28/01/2026

दादा....
भावपुर्ण श्रद्धांजली...

एकच वादा.... अजितदादा...

https://www.facebook.com/share/1N1dsdvHkx/

माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.

अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.

१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.

प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.

अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.

राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.

मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.

राज ठाकरे ।

Keep up good work..Abhay Mahalley Supriya Sule   Rohit Rajendra Pawar
06/01/2026

Keep up good work..
Abhay Mahalley Supriya Sule Rohit Rajendra Pawar

जय भीम 🇮🇳
01/01/2026

जय भीम 🇮🇳

‘भीमा कोरेगाव शौर्य दिन’
हा शौर्य, संघर्ष आणि आत्मसन्मानाच्या इतिहासाची साक्ष देणारा तेजस्वी दिवस!
या ऐतिहासिक विजयाने समता, न्याय आणि स्वाभिमानाची ज्योत अधिक प्रखरपणे उजळली.

या महान लढ्यात हुतात्मा झालेल्या सर्व शूर वीरांना विनम्र अभिवादन!

#शौर्यदिन #भीमाकोरेगाव

धन्यवाद 🙏
29/09/2025

धन्यवाद 🙏

माझ्या आणि पत्नी सौ. कुंतीच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि सामान्य माणसांनी फोनवर आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. काहीजणांनी वेगवेगळ्या भागात पूरग्रस्तांना आपापल्यापद्धतीने मदत करून माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने विशेष आणि आनंददायी केला. आपल्या या शुभेच्छा मला काम करण्यासाठी वर्षभर ऊर्जा देत राहतील. आपल्या या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल मी आपल्या सर्वांचा सदैव ऋणी आहे!

Highlights of the celebration held at the party office in Mumbai after the victory in the Loksabha elections.... #तुतारी...
04/06/2024

Highlights of the celebration held at the party office in Mumbai after the victory in the Loksabha elections....

#तुतारी
#साहेब

Address

Main Road Wardha
Wardha
442001

Telephone

+918983192820

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा.रोहित दादा पवार विचार मंच. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मा.रोहित दादा पवार विचार मंच.:

Share

Category