शिवसेना वाई,खंडाळा,महाबळेश्वर

  • Home
  • India
  • Wai
  • शिवसेना वाई,खंडाळा,महाबळेश्वर

शिवसेना वाई,खंडाळा,महाबळेश्वर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिवसेना वाई,खंडाळा,महाबळेश्वर, Political Party, Wai.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी..!श्री.आकाश अशोक भोसले रा. शिरगाव ता. वाई जि.सातारा यांच्या  वर होणाऱ्या खर्चासाठी मुख्यमंत्री...
05/09/2025

मुख्यमंत्री सहाय्यता निधी..!

श्री.आकाश अशोक भोसले रा. शिरगाव ता. वाई जि.सातारा यांच्या वर होणाऱ्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी 1,00,000 रु. मदत मिळवून दिली.

शिवसेना सदैव
आपल्यासाठी 🚩

16/05/2025
06/05/2025
 #पुणे शहरातील  #कसबा_पेठ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज आपल्या असंख...
11/03/2025

#पुणे शहरातील #कसबा_पेठ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून आता जगाला 'हू ईज धंगेकर'.. हे कळल्याशिवाय राहणार नाही अशा शुभेच्छा दिल्या.

रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय नेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी आपल्या कामातून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. २५ वर्ष ते नगरसेवक होते, त्यापैकी १० वर्ष ते शिवसेनेचे नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने पुन्हा एकदा त्यांना स्वगृही आल्याचे समाधान मिळेल. तसेच त्यांच्या कामाची पद्धत आणि दांडगा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील असे यासमयी नमूद केले. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहतो त्यामुळे तुमच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहीन असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

तसेच काल मुंबईत घेतलेल्या निर्धार मेळाव्यात कुणीतरी बाळासाहेबांच्या नकली आवाजातला व्हिडिओ दाखवला. बाळासाहेबांच्या जुन्या रेकॉर्ड्स जपून ठेवल्या आहेत असे ते सांगतात. पण नकली लोक नकलीच कामे करणार, याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते असे यावेळी निक्षून सांगितले.

याप्रसंगी शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल, माजी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेनेचे किरण साळी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


Shivsena - शिवसेना Ravindra Dhangekar - रविंद्र धंगेकर Dr. Neelam Gorhe Uday Ravindra Samant Sharad Sonawane - शरद सोनवणे Prakash Surve - प्रकाश सुर्वे Murji Patel Rajan Salvi

Address

Wai
412803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना वाई,खंडाळा,महाबळेश्वर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share