25/09/2024
C/P
शिवसैनिक मित्रांनो,
तुम्ही फेसबुक, व्हाटसअप किंवा सोशल मिडीयातील इतर प्लॅटफॉर्म्सवर ग्रुप्स किंवा पेज चालवत असाल, तर ही सूचना तुमच्यासाठी आहे.
आपली लढाई ही महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. त्यामुळे केवळ आपलं चिन्ह लोकांपर्यंत न पोहचल्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होऊ शकतं.
लोकसभा निवडणूक होऊन आता तीन महिने झालेत. आपण जे गेली दोन वर्षे मशाल चिन्ह वापरत होतो, ते ऐन निवडणूकीच्या तोंडावर बदललं. तरीही मिळालेल्या कमी वेळात आपण जीवाचं रान करुन ते चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. राजकीय पक्षाच्या आयुष्यात नाव आणि चिन्हांना प्रचंड महत्व असतं, कारण आपली ओळखच मुळात तितकीच असते.
तर सांगण्यामागचा उद्देश हा की लोकसभेपूर्वी जे मशाल चिन्ह आपण सर्वत्र वापरत होतो ते कालबाह्य झाले आहे, लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने जे चिन्ह आपल्याला दिलं होतं, तेच पुढे कायम राहणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला विनम्र विनंती आहे की, अजूनही जे शिवसैनिक जुने चिन्ह त्यांच्या गाड्या, सोशल मिडीया, बॅनरवर लावत आहेत त्यांना कळकळीने नवीन चिन्ह लावायला सांगितलं पाहिजे.
लोकसभेला आपण किमान ५ जागांवर मागे पडलो, मुंबईतली एक जागा केवळ ४८ मतांनी हरलो. विचार करा ह्यात चिन्हाचा किती मोठा रोल असू शकेल?
सर्वसाधारण माणसाला शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे धनुष्यबाण हे मनात बिंबलेलं आहे. साहजिकच गद्दारांनी बाळासाहेबांचा फोटो वापरुन धनुष्यबाण लोकांना दाखवला आणि खरंच त्यामुळे मतदान झाले.
आपलं चिन्ह जर आपण व्यवस्थितरित्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहचवलं तर आपल्याला ह्या पुढल्या लढाईत अत्यंत मोलाचं आणि अधिकचं मतदान होऊ शकेल.
आतापासून ह्या आठवड्यापर्यंत आपलं काम एकच असेल, ते म्हणजे आपलं मशाल चिन्ह सर्वत्र दिसेल.
सूचनाः नवीन मशाल चिन्हाची फाईल ह्या मेसेजसोबत जोडत आहे.