23/03/2026
विटा नगरपरिषद विटा
माझी वसुंधरा अभियान 6.0
स्वच्छ सर्वेक्षण 2025
☘️🌏☘️🌏☘️🌏
आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी अलिबाग नगरपरिषद शिष्टमंडळाने विटा शहरास अभ्यास दौरा भेट दिली. यादरम्यान अलिबाग नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने विटा नगरपरिषद व नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली व येथे चालू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. यावेळी ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या कंपोस्ट खत प्रकल्प, सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प, मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प तसेच नव्याने निर्मिती सुरू असलेल्या रोटरी ड्रम कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प इत्यादी प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी विटा नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी शहरातून कचरा संकलन व वर्गीकरण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणारे बारकावे यावेळी शिष्टमंडळास सांगितले.
यावेळी शिष्टमंडळाच्या प्रमुख अलिबाग नगरपरिषद उपनगराध्यक्षा ऍड. श्रीमती मानसी म्हात्रे यांनी नगरपरिषद मार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पाची प्रशंसा केली. "कचरा मुक्त शहर, कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्याचे सोने करण्याची क्षमता निर्माण करणारे हे सेंटर महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना आदर्श उपक्रम केंद्र आहे" असे प्रतिपादन यावेळी उपनगराध्यक्षा ऍड. श्रीमती मानसी म्हात्रे यांनी केले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेमधील उपनगराध्यक्षा एड. श्रीमती मानसी म्हात्रे, एड. नीलम हजारे, एड. अश्विनी ठोसर, श्री ऋषिकेश माळी, श्री जमाल सय्यद, नगरसेवक, श्री आंब्रे, आरोग्य निरीक्षक, श्री तांबे सुपरवायझर, श्री सुमित गायकवाड सौ आर्या जाधव सहभागी झाले.
या अभ्यासदौऱ्यास विटा नगर परिषदेकडील नगराध्यक्षा श्रीमती काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष श्री अमोल बाबर, आरोग्य सभापती श्री भालचंद्र कांबळे, बांधकाम सभापती श्री श्रीकांत साळुंखे, नगरसेवक श्री संजय भिंगारदिवे, नगरसेवक श्री अविनाश शितोळे,श्री रोहित पाटील तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छ विटा सुंदर विटा*✨
विटा शहर स्वच्छतेच्या शर्यतीत नंबर वन
* .1*
Vita municipal Council
-----------------------------
ULB CODE 802893
.0
SwachhBharatMissionUrban
majhivasundhara SwabhavSwachhata SanskaarSwachhata
IWD2026
GiveToGain
WomenLedSanitation
SwachhAadat
SwachhBharat