MNS.Virar - मनसे.विरार

MNS.Virar - मनसे.विरार महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर अधिकृत

रविवार दिनांक 25/5/25 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव प्रविणदादा राऊत साहेब आणि ईतर पद अधिकारी नी उपवन कॉम्प्ल...
26/05/2025

रविवार दिनांक 25/5/25 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव प्रविणदादा राऊत साहेब आणि ईतर पद अधिकारी नी उपवन कॉम्प्लेक्स मध्ये विविध समस्या वर चर्चा करण्यासाठी भेट दिली. उपवन कॉम्प्लेक्स चे फेडरेशन पद अधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष उपशाखा अध्यक्ष आणि उपवन कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे सभासद हजर होते. त्यामध्ये उपवन कॉम्प्लेक्स मध्ये असणारे गटारांची साफसफाई बाबत महानगरपालिका चे स्वच्छता विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली काम लवकरच चालु होईल.
तसेच पावसाळ्यात पाणी साचते या विषयावर पण चर्चा करण्यात आली त्यावर काही तोडगा निघतो का हे तपासून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार 👏

विरार बोळींज महानगरपालिका रुग्णालयातून रुग्णांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी व स्वछता आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेल्या ल...
23/06/2024

विरार बोळींज महानगरपालिका रुग्णालयातून रुग्णांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी व स्वछता आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेल्या लोकांनकडून बाहेरच्या औषधीय मागणी अश्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी स्वतः उपस्थिती दर्शवून पाहणी केली. वरिष्ठ डॉ. पालवणकर यांच्याशी चर्चा करुन व रुग्णालयाच्या अंतर्गत अडचणी सुद्धा जाणून घेऊन लवकरच महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले. यावेळी मनसे विरार शहर सचिव प्रविण राऊत, विभागअध्यक्ष हेमंत पाटील, शाखाअध्यक्ष अमित मोरे, उपशाखाअध्यक्ष जितेंद्र टुकरुल व श्रीकांत कांबळे, विध्यार्थी सेनेचा आयुष शुक्ला, महाराष्ट्र सैनिक संदीप देसाई आणि प्रकाश पितळे हे उपस्थित होते.

मनसे शहर सचिव प्रविण राऊत यांच्या मदतीने MIDC येथे काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांच्या थकबाकी असलेला पगार मिळवून देण्यात...
12/02/2024

मनसे शहर सचिव प्रविण राऊत यांच्या मदतीने MIDC येथे काम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांच्या थकबाकी असलेला पगार मिळवून देण्यात यश. जय महाराष्ट्र ! 🚩

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर सचिव श्री. प्रविण राऊत साहेब यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून ग्रीन फिल्ड सोसायटीती...
11/02/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर सचिव श्री. प्रविण राऊत साहेब यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून ग्रीन फिल्ड सोसायटीतील जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी महापालिकेकडून बेंच मिळवून दिले. त्याचे लोकार्पण सोसायटी मधील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ग्रीन फिल्ड सोसायटीच्या कमिटीचे सदस्य आणि सोसायटी मधील रहिवास्यांनी मनसे शहर सचिव प्रविण राऊत यांचे आभार मानले. त्यावेळी बोळींज शाखा अध्यक्ष योगेश चाचे, विध्यार्थी सेनेचे ओमकार कदम उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोळींज मधील पद्मावती नगर येथील अनेक सोसायट्यान्या पिण्याच्या पाण्याच्या खूप समस्या होत्या अनेक...
25/01/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोळींज मधील पद्मावती नगर येथील अनेक सोसायट्यान्या पिण्याच्या पाण्याच्या खूप समस्या होत्या अनेक वर्ष कमी प्रमाणत येत असल्यामुळे त्याना रोज टँकर मागवावे लागत होते. ह्या सर्व त्रासाला कंटाळून पद्मावती नगरच्या अनेक रहिवाश्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बोळींज जनसंपर्क कार्यालयात विरार शहर सचिव प्रविण राऊत आणि उपशहर अध्यक्ष आनंद काळे यांची भेट घेतली. आज मनसेच्या शिष्ठ मंडळाने व पद्मावती मधील अनेक सोसाइटीच्या कमेटी मेंबरला सोबत घेऊन महानगरपालिका पाणी इंजिनियर बरोबर चर्चा करून मनसे स्टाईल ने समज दिली असता इंजिनियरने १० दिवसात पुर्ण पद्मावती नगर मधील पिण्याचा प्रश्न सोडवून देतो असे आश्वासन दिले.
जय महाराष्ट्र 🚩

सखाराम बाबा संकुल मधील सोसायटी च्या आतील गटाराची झाकणे कित्येक दिवस तुटक्या अवस्थेत होती वारंवार महापालिका मध्ये तक्रार ...
20/01/2024

सखाराम बाबा संकुल मधील सोसायटी च्या आतील गटाराची झाकणे कित्येक दिवस तुटक्या अवस्थेत होती वारंवार महापालिका मध्ये तक्रार करून सुद्धा ती रिपेर करत न्हवते म्हणून आम्ही सखाराम बाबा संकुल तर्फे मनसे सचिव प्रविण राऊत हयांच्या गटाराची अवस्था निदर्शनास आणून दिली व फोटो सुद्धा पाठवले त्यावेळी मनसे सचिव हयांनी महानगरपालिका मधील इंजिनियर ला सांगून तात्काळ आज लावून दिली त्याबद्दल मनसे सचिव प्रविण हयांचे विशेष आभार 🚩🚩
सखाराम बाबा संकुल सोसायटी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर बोळींज विभाग 🚩
17/01/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर बोळींज विभाग 🚩

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजननायक सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना,...
17/01/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजननायक सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विरार शहर, चंदनसार वार्ड क्र.१० विभागातील नागरिकांना मोफत कॅलेंडर वाटपाचा उपक्रम आयोजित केला असून प्रमुख पाहुणे म्हणून नालासोपारा विधानसभाध्यक्ष मा.श्री.मनोहर कदम साहेब यांच्या हस्ते कॅलेंडर चे उद्घाटन करण्यात आले. 🚩

बोळींज येथील नानबाट येथील गंधार सोसायटीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर बोळींज विभागाला कडे सोसायटी मध्ये जेष्ठ ना...
07/01/2024

बोळींज येथील नानबाट येथील गंधार सोसायटीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहर बोळींज विभागाला कडे सोसायटी मध्ये जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ कडून मिळवून देण्याची मागणी करण्यात आली होती.

आज त्या मागणीला मनसे चे विरार शहर सचिव श्री. प्रवीण राऊत साहेब हयांनी महापालिकाकडून २ बेंच मिळवून दिले मुळे त्याचे लोकार्पण गांधार सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक हस्ते करून घेतले.

ह्यावेळी शहर सचिव श्री. प्रवीण राऊत साहेब, शाखा अध्यक्षा सौ. जागृती सूर्यवंशी, श्री. योगेश चाचे, उपशाखा अध्यक्ष श्री. दिगेश शुक्ल, श्री. जितेंद्र ठुकरुल, समाजसेवक श्री. नंदकुमार खानविलकर व विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते ओमकार, तेजस, विशाल, आयुष, जतिन उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रकाशित वर्ष २०२४ ची बोळींज विभागाची दिनदर्शिका बोळींज येथिल काही दुकानांना वाटण्यात आली. त्य...
02/01/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रकाशित वर्ष २०२४ ची बोळींज विभागाची दिनदर्शिका बोळींज येथिल काही दुकानांना वाटण्यात आली. त्यावेळी मनसे बोळींज विभाग अध्यक्ष हेमंत पाटील, उपशाखा अध्यक्ष दिगेश शुक्ल आणि उपशाखा अध्यक्ष श्रीकांत कांबळे उपस्थित होते.

काल संध्याकाळी बोळींज जनसंपर्क कार्यालयात महिला आघाडी आयोजित हळदीकुंकू समारंभ करण्यासाठी व जनतेच्या सुविधेसाठी कॅम्प लाव...
02/01/2024

काल संध्याकाळी बोळींज जनसंपर्क कार्यालयात महिला आघाडी आयोजित हळदीकुंकू समारंभ करण्यासाठी व जनतेच्या सुविधेसाठी कॅम्प लावण्यासाठी चर्चा करण्यात आली. सदर प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विरार शहर सचिव श्री. प्रवीण राऊत साहेब उपस्थित होते.

Address

Virar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS.Virar - मनसे.विरार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MNS.Virar - मनसे.विरार:

Share