Vasai Virar Municipal Corporation

Vasai Virar Municipal Corporation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vasai Virar Municipal Corporation, Government Organization, virar east, Virar.

वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित २८७ वा वसई विजयोत्सव दिन कार्यक्रमा निमित्त सर्वांसाठी खुली किल्ले बांधणी स्पर्धा स्पर...
03/05/2025

वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित २८७ वा वसई विजयोत्सव दिन कार्यक्रमा निमित्त सर्वांसाठी खुली किल्ले बांधणी स्पर्धा
स्पर्धेचे विषय- पालघर जिल्हातील गडकिल्ले
नाव नोंदणी अंतिम दिनांक- ७ मे २०२५
(किल्ला तयार करणेकामीचा कालावधी (७ मे, ते ९ मे, दुपार पर्यंत)
ठिकाण- नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वसई किल्ला, वसई गाव.
संपर्क समन्वयक- श्रीदत्त राऊत.9764316678
भुषण वर्तक 8655171073
नाव नोंदणीकरिता खालील गुगुल लिंक चा वापर करा, अथवा वर नमूद क्रमांकावर आपली माहीती शेअर करा. https://forms.gle/j2XCG7VePjcoGNkh7

वृक्ष तोड ना-हरकत दाखला वृक्ष छाटनी परवानगी, वृक्ष तोड परवानगी बाबतचे दाखले आता ऑनलाईन उपलब्ध  अर्ज करण्यासाठी लिंक:- ht...
03/05/2025

वृक्ष तोड ना-हरकत दाखला वृक्ष छाटनी परवानगी, वृक्ष तोड परवानगी बाबतचे दाखले आता ऑनलाईन उपलब्ध अर्ज करण्यासाठी लिंक:- https://rtsvvmc.in/tree/

वसई विरार महानगरपालिका मुख्यालयात “ महाराष्ट्र दिन” साजराआज दि.१ मे, २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच ...
01/05/2025

वसई विरार महानगरपालिका मुख्यालयात “ महाराष्ट्र दिन” साजरा

आज दि.१ मे, २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे “महाराष्ट्र दिन” साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले #महाराष्ट्रदिन

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना आणि कष्टकरी कामगार बांधवांना हार्दिक शुभेच्छा ! #महारा...
01/05/2025

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना आणि कष्टकरी कामगार बांधवांना हार्दिक शुभेच्छा !

#महाराष्ट्रदिन

काल दिनांक 30/4/2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती व महात्मा बसवेश्वर ज...
01/05/2025

काल दिनांक 30/4/2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती (अक्षय तृतीया ) (तिथीनुसार) साजरी करण्यात आली.

29/04/2025

२८७ वा वसई विजयोत्सव दिना निमित्तवसई विरार शहर महापालिकाआयोजित ♦️*वसई किल्ला अभ्यास सफर♦️ ( *सर्वांकरीता विनामुल्य* )रविवार दिनांक ११ मे २०२५वेळ : सकाळी ७.३० ते दुपारी १मार्गदर्शक: श्री श्रीदत्त राऊत -इतिहास अभ्यासकसहभाग नोंदणी करीता लिंक -📝📝*https://forms.gle/xY9kNkqvmjD2gFP57* 👍 अथवा खाली नमुद केलेल्या संपर्क क्रमांकावर आपले पूर्ण नाव व परिचय पाठवून व्हाट्सउप नोंदणी करावी : किल्ले वसई मोहिम परिवार ९७६४३१६६७८ 🚌 नोंदणी प्रवेश सुरू झालेला आहे 👍 👨‍👩‍👧‍👦 चला तर मग, आपला वसईचा किल्ला मनसोक्त अभ्यासू !!

28/04/2025
आज दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयात मा. आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार (भा.प्र...
28/04/2025

आज दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयात मा. आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेळेत आणि प्रभावी सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करत सेवा हक्क शपथ घेतली. या शपथविधीमध्ये नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार करण्यात आला. त्या वेळी महानगरपलिका मुख्य कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन ही करण्यात आले. सदर कार्यकमात मा. आमदार श्री विलास तरे , अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे , मा. उपायुक्त सौ. अर्चना दिवे , मा. उपायुक्त श्री. सुभाष जाधव, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते .

25/04/2025

Our City, Our Pride - Vasai Fort

Fort Bassein is a 500-year Portuguese Fort near Vasai-Virar, amidst a quaint landscape, protected by the sea from three sides. It was at its prime for two centuries under the Portuguese rule, and later, under the Marathas.

During the late 17th and early 18th centuries, after a long struggle with the Mughal Empire, the Maratha Confederacy came to dominate the region. In 1737 the then Peshwa Baji Rao I sent his brother, Chimaji Appa, to take the Bassein Fort from the Portuguese.

Many arches have survived, and facades have been preserved. You can notice the carved stones. The three churches inside the complex, too, are recognizable. Their architecture is similar to the Portuguese churches of the 17th century.

Today, the fort is known as a spot for heritage walk and movie shoots, and to spend a day away from Mumbai. It is a landmark of national significance and it is being restored under the direction of the Archaeological Survey of India.

वसई - विरार शहर महानगरपालिकाक्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित२८७ वा वसई, विजयोत्सवशनिवार १० मे,२०२५ ते सोमवार १२ मे, २०२५...
25/04/2025

वसई - विरार शहर महानगरपालिका

क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित

२८७ वा वसई, विजयोत्सव

शनिवार १० मे,२०२५ ते सोमवार १२ मे, २०२५

स्थळ- जंजिरे वसई किल्ला, वसई गाव.

वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.२२ एप्रिल या “वसुंधरा दिनाचे” औचित्य साधून मा.श्री.अनिलकुमार पवार,आयुक्त मा...
24/04/2025

वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.२२ एप्रिल या “वसुंधरा दिनाचे” औचित्य साधून मा.श्री.अनिलकुमार पवार,आयुक्त मार्गदर्शनाखाली दि.२२ एप्रिल २०२५ ते दि.३० एप्रिल २०२५ या कालावधीत “वसुंधरा सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.

या सप्ताहाची सुरुवात दि.२२ एप्रिल रोजी जागतिक “वसुंधरा दिना” निमित्त प्रभाग समिती “ई” कार्यक्षेत्रातील “चक्रेश्वर तलाव”, नालासोपारा (प.) या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मा. आमदार श्री. राजन नाईक, मा.आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, उप-आयुक्त श्री. अजित मुठे, सहा. आयुक्त श्रीमती अश्विनी मोरे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, राजकीय पक्षांचे व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक सहभाग घेवून तलाव व परिसर स्वच्छ केला. “माझी वसुंधरा” शपथ घेण्यात आली. तसेच स्वच्छतेची महती सांगणारे पथनाट्य सादर केले गेले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दुतांचा सत्कार करण्यात आला. मा. आमदार श्री. राजन नाईक यांनी महानगरपालिकेच्या मोहिमेचे कौतुक केले याप्रसंगी मा. आयुक्त महोदयांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले तसेच महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत असलेबाबत माहिती दिली.

दि.२३ एप्रिल २०२५ रोजी प्रभाग समिती “आय” कार्यक्षेत्रातील ‘पापडी तलाव’ येथे तसेच प्रभाग समिती “ई” कार्यक्षेत्रातील शूर्पारक बौद्धस्तूपाजवळील तलाव (बावखळ) व प्रभाग समिती ‘ए’ कार्यक्षेत्रातील करमाळे तलाव (बावखळ) येथे वसई विरार भागातील वैशिष्ट असलेल्या बावखळीची स्वच्छता केली. प्रभाग समिती “आय” ‘पापडी तलाव’ येथील स्वच्छता मोहिमेत मा. आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडीत, मा.उप-आयुक्त श्री. अजित मुठे, मा.सहा. आयुक्त श्रीमती अलका खैरे, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, राजकीय पक्षांचे व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक यांनी परिसर स्वच्छ केला. यावेळी माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली. स्वच्छतेची महतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दुतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मा.आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडीत यांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रभाग समिती ‘ए’ व ‘ई’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेवेळी सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनल काळे, सहाय्यक आयुक्त कु. अश्विनी मोरे तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Address

Virar East
Virar
401305

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasai Virar Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vasai Virar Municipal Corporation:

Share