माण-खटाव दुष्काळ हटाव.

  • Home
  • India
  • Vaduj
  • माण-खटाव दुष्काळ हटाव.

माण-खटाव दुष्काळ हटाव. माण खटाव दुष्काळ हटाव

माहिती - चैतन्य जोशी
10/09/2023

माहिती - चैतन्य जोशी

29/06/2020

खटाव, तासगांव सारख्या दुष्काळी भागांची
वेदावती गंगा आपली येरळामाईचे सुंदर दृश्य

⛳शिवजयंती २०१७⛳१५-१९ फेब्रुवारी शिवसप्ताह*व्याख्यान*१५ फेब्रुवारी- सायं.ठीक ६ वाजता*स्वराज्याचे उपेक्षित छत्रपती राजाराम...
14/02/2017

⛳शिवजयंती २०१७⛳
१५-१९ फेब्रुवारी शिवसप्ताह

*व्याख्यान*
१५ फेब्रुवारी- सायं.ठीक ६ वाजता
*स्वराज्याचे उपेक्षित छत्रपती राजाराम महाराज*
व्याख्याते- *केतन पुरी*

*रक्तदान*
१६ फेब्रुवारी सकाळी ९ ते ४
कै. जयसिंगराव गोडसे कॉम्प्लेक्स एस.टी स्टॅण्डसमोर वडूज

*व्याख्यान*
१६ फेब्रुवारी-सायं.६ वाजता
*ऐसा राजा होणे नाही*
व्याख्याते- *दुर्गमहर्षी प्रमोदजी मांडे*

*व्याख्यान*
१७ फेब्रुवारी-सायंकाळी ठीक ५:३०
*क्षात्रतेज शंभूराजे आणि महाराणी येसूबाई*
व्याख्याते- *राहुल सुधाकर कराळे*
*सांस्कृतिक कार्यक्रम*

१७ फेब्रुवारी सायंकाळी ठीक ७ वाजता
सहभाग- *वडूजमधील सर्व विद्यालये*

*व्याख्यान*
१८ फेब्रुवारी सायंकाळी ठीक ६ वाजता
*हिंदनृपती शाहू महाराज जीवनगाथा*
व्याख्याते- *अजय विरसेंन जाधवराव*

*१९ फेब्रुवारी*
सकाळी ८ वाजता शिवज्योतीचे किल्ले अजिंक्यतारा वरून आगमन
सकाळी १० वाजता *भव्य मोटर सायकल रॅली*

सायंकाळी ठीक ४:३० महाराजांच्या प्रतिमेची वडुज शहरातून हलगी,मल्लखांब, ढोल यांच्या गजरात भव्य मिरवणूक

#व्याख्यानाचे_स्थळ
काँग्रेस कमिटी मैदान,
एस.टी स्टॅन्ड शेजारी
वडूज

संयोजक- *बॉक्सर ग्रुप* *वडुज*
*सर्व शिव-शंभू पाईक*
#घरोघरी_शिवजयंती

नवीन वर्षाचे स्वागत फक्त दारू पिऊन नंगानाच करणे हा काही नियम आहे का ?पण हाच पायंडा मोडून एक नवीन संकल्प सिद्धेश्वर कुरोल...
30/12/2016

नवीन वर्षाचे स्वागत फक्त दारू पिऊन नंगानाच करणे हा काही नियम आहे का ?
पण हाच पायंडा मोडून एक नवीन संकल्प सिद्धेश्वर कुरोली येथील सारथी सामाजिक संस्थेने केला
मागीलवर्षी ऊसतोड कामगारांच्या मुलांना शालेयउपयोगी वस्तु पाटी ,पेन्सील बॉक्स, अंकलिपी इ. भेट दिली .
तेव्हा त्या चिमुरड्यांच्या चेह-यावरचा आनंद हा कोणत्याही आनंदापेक्षा मोठा न्हवता

उन, वारा,पाउस याचा विचार न करता पोटाची खळगी भरण्यासाठी आपले घर,दार,गाव सोडुन
अपरिचित भागात जाऊन कष्टप्रद आयुष्य जगतात
अशा यातना सहन करणाऱ्या उसतोड कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणाची आवड निर्मान व्हावी
व सामान्य मुलांप्रमाणेच त्यांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न......

या तरुणांसोबत काम करण्यास किंवा यांना मदत करण्यास इच्छुक असाल तर
आमच्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधा :-
७०८३९०२२५५, ९९२२१०३३२०, ९८७०३३३३८२

सारथी सामाजिक विकास संस्था
रजि.नं. :- महाराष्ट्र / १५४२० / सातारा
सिद्धेश्वर कुरोली , तालुका :- खटाव , जिल्हा :- सातारा
-
-

👬👬आता माणूसकीची भिंत वडूज मध्येही👬👬"ज्याच्याकडे" 'जास्त आहे त्याने द्यावे,नसेल त्याने घेऊन जावे"हि संकल्पना आता वडुजमध्य...
16/12/2016

👬👬आता माणूसकीची भिंत वडूज मध्येही👬👬

"ज्याच्याकडे" 'जास्त आहे त्याने द्यावे,
नसेल त्याने घेऊन जावे"
हि संकल्पना आता वडुजमध्ये ही गरजूं पर्यन्त पोहचणार..

काही दिवसांपूर्वी राजस्थान येथे एका संवेदनशील माणसाने एक अद्भुत प्रयोग सुरु केला
" नेकी की दीवार " जे जे आपणाकडे निरुपयोगी परुंतु सुस्थित आहे
ज्या वस्तुच्या देण्याने कोणाची तरी गरज भागणार आहे
ती वस्तु एका भिंतीवर लटकायची ज्याला गरज आहे तो घेऊन जाईल
आणि उभी राहील माणुसकीची अद्भुत भिंत .

आपली समाजासाठी असलेली सामाजिक बांधिलकी,आणि समाजासाठी असलेलं देणं,
आणि त्यासाठी काही चांगले सामाजिक कार्य करणे बंधनकारक आहे असे समजून,
खूप उपक्रम राबवले आणि त्यातूनच काही चांगल्या कल्पना ही सुचू लागल्या आणि
जन्म झाला एका नव्या संकल्पनेचा
जन्म झाला 👬"माणूसकीच्या भिंतीचा."

ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या कड़े असलेले👚👕👖👔👗👘👠👟👞👢🌂
कपडे,स्वेटर्स,कानटोप्या,हातमोझे,चादरी,ब्लैंकेट, चपला ,बूट ,
खासकरुण लहान मुलांची खेळणी आणि कपडे ,गरम कपडे आपण मानुसकीच्या भिंतीला लटकावीत
आणि ज्यांना हवी आहेत त्यांनी घेवून जावीत.
"चॅरिटी अर्थात पूण्यकर्म सहज ही होवू शकते"

खरोखर कुड कुडणाऱ्या आणि जीवघेण्या थंडित, रखरखात्या उन्हात आज ही
काही अभागी लोक जीवन व्यथित करत आहेत त्यांची "वेदना वाटून घेवू आणि सहवेदनेचा नवा अध्याय सुरु करू "
या कार्यात सडळ हाताने मदत करा.

या कार्यात स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्या
आपल्याकडे वेळ नसेल पण आपल्याकडे कपडे आहेत
तर खालील नंबर वर कॉल करून सांगा कपडे जमा करून घेतले जातील

गणेश गोडसे-पाटील ९८२२८३७२८६
निलेश गोडसे-९८८१३६४६७९
विजय गोडसे- ७७४५०६९००५
विक्रम पाटील-९८८११६५२५४
अशोक फडतरे ७५८८५६१२२०
परेश मदने- ९८८१८७०८१९
-
-

दुष्काळी खटाव तालुक्यातील तरुणांच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ !सिद्धेश्वर कुरोली येथील सारथी सामाजिक विकास संस्था च्या ...
18/06/2016

दुष्काळी खटाव तालुक्यातील तरुणांच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ !
सिद्धेश्वर कुरोली येथील सारथी सामाजिक विकास संस्था च्या प्रयत्नांना यश !!

सध्याची तरुणपिढी म्हणजे बाई-बाटली-जुगार-विडी
अशी एक समजूत खोटी ठरवत कुरोलीतील
सामाजिक भान असणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केली
आणि विविध सामाजिक उपक्रमांतून गावाचे चित्र बदलयला आता सुरुवात होतेय.

जलसंधारण ही काळाची असलेली गरज ओळखून आणि दुष्काळावर मात करण्याच्या हेतूने
सारथी सामाजिक विकास संस्थेने कुरोली येथील पाझर तलावातील
गाळ काढण्याच्या व खोलीकरणाच्या कामास थिसेनकृप कंपनी आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरूवात केली

१७ दिवसाच्या कालावधीत १६० फूट * ६०० फूट क्षेत्रातील सुमारे
५७०० ट्राॅली गाळ ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आला
तज्ञांच्या अंदाजानुसार सुमारे २ कोटी २२ लाख लीटर पाण्याची साठवण क्षमता
या कामामुळे वाढली.

गेले तीन दिवस पडत असलेल्या सुरुवातीच्या पावसाने याची
प्रचिती दाखवून दिली, खोलीकरण केलेल्या क्षेत्रात पाणी साठ्यास
सुरूवात झाली असून भविष्यात होणाऱ्या पावसातून निश्चित
पाणीसाठ्यात वाढ होऊन दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल

थोडक्यात सारथीच्या खारीच्या वाट्यासमान झालेल्या प्रयत्नांवर निसर्ग सुद्धा मेहरबान झाला आहे असंच म्हणावं लागेल .

तरीही संस्थेतर्फे समस्त सातारकर आणि मराठी जणांना जाहीर आवाहन करतो की,

भविष्यासाठी आणि गावाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या या तरुण वर्गाला म्हणजेच सारथी सामाजिक विकास संस्थेला
खाली दिलेल्या बँक खात्यावर आर्थिक मदत करून आपणही या कामाला हातभार लावावा आणि खारीचा वाट उचलावा…

bank of maharashtra
account no. 60228261479
IFSC code :MAHB0001845
MICR code : 415014519
branch code :- 001845

अधिक माहितीकरिता संपर्क :-
७०८३९०२२५५, ९८५०४४७३२१, ९५५२९७७७०८

सारथी सामाजिक विकास संस्था
( नातं समाजकारणाचं आपुलकीचं माणुसकीचं )
रजि.नं. :- महाराष्ट्र / १५४२० / सातारा
page :- www.fb.com/sarthissvs
सिद्धेश्वर कुरोली- खटाव-सातारा
-
-

*!! श्री जानुबाईदेवी यात्रेनिमित्त !!*"मुंबई प्रतिष्ठाण" मुंबईकर ग्रामस्थ जायगांव यांच्यावतीने*मौजे जायगांव* ता. खटाव जि...
13/05/2016

*!! श्री जानुबाईदेवी यात्रेनिमित्त !!*
"मुंबई प्रतिष्ठाण" मुंबईकर ग्रामस्थ जायगांव यांच्यावतीने

*मौजे जायगांव* ता. खटाव जि. सातारा येथे
*सोमवार दि. २३ मे २०१६ रात्री ८:३० वा*

*.......भव्य रेकाॅर्ड डांस स्पर्धा.......*

*स्थळ : ग्रामपंचायत पटागंण*

*🎁 बक्षिस 🎁 बक्षिस 🎁*

*मोठा गट (१२ वर्षावरील)*

प्रथम पारितोषिक- ११,००१ व चषक 🏆
द्वितीय पारितोषिक- ७,००१ व चषक 🏆
तृतीय पारितोषिक- ५,००१ व चषक 🏆
चतुर्थ पारितोषिक- ३,००१ व चषक 🏆

( प्रवेश फ़ी - २००/- )

*छोटा गट (१२ वर्षाखालील)*

प्रथम पारितोषिक- ५,००१ व चषक 🏆
द्वितीय पारितोषिक- ३,००१ व चषक 🏆
तृतीय पारितोषिक- २,००१ व चषक 🏆
चतुर्थ पारितोषिक- १,००१ व चषक 🏆

( प्रवेश फ़ी - १००/- )

*उत्तेजनार्थ बक्षिसे*

*-: संपर्क

अवधूत - ७०४५०७७०४५
विजय - ९८६७९३१६३५
विक्की - ८३०८३०१५७५
नवनाथ - ९३७२४४५६२२

खटाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
12/05/2016

खटाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

किल्ले वारुगड दर्शन ११-११-२०१५दिवाळी सर्वांच्या घरी मग महाराष्ट्राच्या घरी का नाही?किल्ले हे महाराष्ट्राचे आश्रयस्थान आह...
09/11/2015

किल्ले वारुगड दर्शन ११-११-२०१५
दिवाळी सर्वांच्या घरी मग महाराष्ट्राच्या घरी का नाही?
किल्ले हे महाराष्ट्राचे आश्रयस्थान आहेत.
चला दिवाळीचा उत्सव किल्ले वारुगडवर साजरा करूयात.
चला इतिहास आठवूयात, इतिहास घडवुयात.

किल्ले वारुगड दर्शन वर्ष ४ थे, चला दीपोत्सव करुया वारूगडावर
कार्यक्रम रुपरेषा
१)मंगळवार दि. १०-११-२०१५ रात्री किल्ले वारुगड वर
मुक्कामी इतिहास तज्ञां बरोबर चर्चा व तयारी...
मुख्य मार्गदर्शक व पाहुणे .
-डॉ. सचिन जोशी-(राज्य गडकिल्ले संवर्धन समिती )
प्रा. विनायक खोत सर-(अध्यक्ष जॅक समिती )
प्रा. राजेंद्र देशमुख - (रयत शिक्षण संस्था सातारा)

२)बुधवार दि. ११-११-२०१५ पहाटे ५ ते ७ रांगोळी दीपोत्सव .
संयोजन-शिवराज्य परिवार फलटण.
शिवराष्ट्र दुर्गसंवर्धक संघ, कोरेगाव
* सकाळी ७ ते ८ चहा नाश्ता *

३)सकाळी ८ ते १० जेष्ठ गडसंवर्धकांचे आणि ईतिहास
तज्ञांचे मार्गदर्शन, दुर्गवाचन संवर्धन मार्गदर्शन.

४)सकाळी ९ ते १० दुर्गपुजन आणि ध्वजारोहण.
डॉ. सचिन जोशी - (किल्ले संवर्धन शासनाचे धोरण.)
प्रा. विनायक खोत-(दुर्गवाचन, गडसंवर्धन)
प्रा.राजेंद्र देशमुख - (सातारा मधील किल्ल्यांचा इतिहास)

६)माचीवर श्रीभैरवनाथ मंदिर भोजन व्यवस्था.

७)आभार प्रदर्शन. असा असेल.
कृपया जे शिव दुर्गप्रेमी रात्री मुक्कामी येणार असतील त्यांनी ९/११ किंवा १०/११
सकाळी पर्यंत खालील नंबर वर संपर्क साधून पुर्व नोंदणी करावी.. .
व्यवस्था करणे सोईचे होईल.

संपर्क- ९२२६५ ६६१९९ किंवा ८६००५ ३६७५६, ९९७५५ २०३४०..

सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते.
या पूर्व-पश्चिम धावणार्‍या रांगेतच ठाण मांडून वारूगड आपली मान उंचावून बसलेला आहे.
भणाणनार्‍या वार्‍याशीच हितगुज करणार्‍या वारूगड वारूवरच स्वार झालेला आहे.
फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने ही रांग जाते.

वारूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे.
एक मार्ग दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड, आणि पुसेगाव - कुळकजाई - श्रीपालवण - वारुगड असाही आहे.
या मार्गाने श्रीपालवण माथ्यावरील पवनचक्की प्रकल्प पाहता येतो आता रस्त्यांची अवस्था ठीक आहे.
बहुतांश डांबरीकरन झालेले आहे.

वारूगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-जाधववाडा असा आहे.
या मार्गावरही एस.टी.ची सोय आहे. अन्यथा गिरवी पर्यंत येऊन तेथून चार कि.मी. चालत वारूगडाचा पायथा गाठता येतो.

वारूगडाच्या पायथ्यापासून दीड तासात चढाई करून आपण वारूगडाच्या दरवाजामध्ये पोहोचतो.
गोमुखी बांधणीच्या दरवाजाच्या कमानी पडलेल्या असून बाहेरील बुरूज मात्र शाबूत आहेत.
या माचीच्या पूर्वेकडील कड्याला सलग तटबंदी बांधून हा भाग संरक्षीत केलेला आहे.
या माचीच्या वरच्या भागात वारूगडाचा छोटासा पण आकर्षक दिसणारा बालेकिल्ला आहे.
या बालेकिल्ल्याच्या तटबंदीपासून खालच्या माचीपर्यंत एक भिंत बांधून काढलेले आहे.
या भिंतीमुळे दोन भाग झालेले आहेत.

भिंतीच्या पलिकडे उंच झाडांमध्ये पाण्याचे टाके आहे. हे टाके नव्यानेच उत्तमपैकी बांधून काढले असून
खाली उतरण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहे. याच्या पलिकडे छोटेसे मंदिर आहे.
मंदिरामध्ये तांदळा असून दारात नंदी, नागराज इत्यादी शिल्पे पडलेली आहे.

वारूगडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट नेमकी कशी होती, हे मात्र कळायला आज काही मार्ग नाही.
बालेकिल्ल्यावरून जी भिंत खालपर्यंत बांधलेली आहे, ती ही जमिनदोस्त होत चालली आहे.
त्या भिंतीवरूनच एक पायवाट बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रूळलेली आहे.
या वाटेने आपण दहा मिनिटांमध्ये वर पोहोचतो. तटाच्या खाली नष्ट झालेला दरवाजा आहे.
तेथपर्यंत आपण भिंतीवरून येऊ शकतो. म्हणजे पूर्वी या भिंतीच्या कडेनेच वर चढण्याचा मार्ग असावा.

म्हणूनच येथे दरवाजा बांधलेला दिसतो. भिंतीच्या अवशेषाखाली हा मार्ग बुजला असल्याचे लक्षात येते.
येथून पाच मिनिटात आपण गडाच्या नष्ट झालेल्या दारात पोहोचतो. दोन्ही बुरूजांना तडे गेलेले आहेत.
अतिशय छोटासा परिसर माथ्यावर आहे. चारही बाजुला कडे असल्यामुळे सावधगिरीने हिंडावे लागते.
माथ्यावर जुन्या मंदिराचे अवशेष, काळकोठडी, खोल अशी पाणी नसलेली विहीर आहे.
एक मोठ्या आकारचे धान्य दळायचे दगडी 'जाते' ही पडलेले आहे.
तटबंदीमध्ये एक शौचकुपही आपल्याला दिसतो. माथ्यावरून ताथवडा किल्ला दिसतो.

स्वच्छ वातावरण असल्यास येथून पुरंदर आणि वज्रगड ही किल्ल्याची जोडगोळीही दिसते.
महादेव रांगेतील शिखर शिंगणापूरचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते.
लोणंद-बारामती-फलटण ते नातेपुते इतका विस्तृत प्रदेश दिसतो.
दिवसापेक्षा रात्री येथून दिसणारा नजारा काही औरच आहे. गावोगावच्या दिसणार्‍या दिव्यांचे पुंजके पाहून
गावे ओळखण्याची गंमत वारूगडाव्यतिरिक्त इतरत्र मिळणे मुश्किलच.

आल्यामार्गाने पुन्ही भिंतीवरून उतरून आपण खालच्या माचीत येतो.
माचीच्या पूर्व भागात आता नव्याने जिर्णोद्धार केलेले मंदिर आहे.
अतिशय कलात्मक दृष्टी ठेवून मंदिराचे रंगकाम केले आहे.
हे भैरवनाथाचे मंदिर असून भाविक परिसरामधून येत असतात.
पार पुण्या -मुंबईपासून अनेकांची वारी येथे असतं .
दररोज परळ (मुंबई) हूनही येथे मंदिरापर्यंत एस.टी. बस मुक्कामी येते.

येथे मुक्कामाची तसेच जेवणाची उत्तम सोय होऊ शकते.
येथे मुक्काम केल्यास सकाळी एस.टी.ने अथवा पुन्हा डोंगर उतरून गिरवी मार्गे फलटण गाठता येते.
डोंगर भटक्यांसाठी अजून एक स्थळ येथून चालत जाण्यासारखे आहे.
बाजूच्या डोंगरावर चढून श्रीपलवण गाव गाठायचे.
श्रीपालवण पठारावर भव्य पवनचक्की प्रकल्प झाला आहे.
त्याचा आनंद घेत तेथून खाली उतरून सीतामाईचा दरा हे निसर्गरम्य ठिकाण पहाता येईल.
अर्थात त्यासाठी तीन ते साडेतीन तासांची पयपिट आवश्यक आहे. स्वताचे वाहन असेल तर उत्तमच.
संपर्क - ९२२६५ ६६१९९-

www.mandeshi.in
www.varugad.blogspot.com

!! भावपुर्ण श्रद्धांजली !!माण-खटाव मधील राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते व माजी आमदार सदाशिव पोळ (तात्या) यांचे दुःखद निधन...ईश...
30/09/2015

!! भावपुर्ण श्रद्धांजली !!

माण-खटाव मधील राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते
व माजी आमदार सदाशिव पोळ (तात्या) यांचे दुःखद निधन...

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती देवो..

Address

Vaduj
415506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माण-खटाव दुष्काळ हटाव. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share