कै.त्र्यंबकअप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर

  • Home
  • India
  • Udgir
  • कै.त्र्यंबकअप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर

कै.त्र्यंबकअप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर || मानव सेवा हीच ईश्वर सेवा ||

देऊळवाडी येथे कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर तर्फे आयोजित भव्य सर्व रोग निदान तपासणी शिबिर उत्साहात संपन्न...
21/03/2026

देऊळवाडी येथे कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर तर्फे आयोजित भव्य सर्व रोग निदान तपासणी शिबिर उत्साहात संपन्न 🙏

या शिबिरामध्ये तब्बल ३९२ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. जनरल मेडिसिन, ऑर्थोपेडिक (हाडांचे आजार), स्त्रीरोग, बालरोग, दंत तपासणी अशा विविध विभागांतील तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची सखोल तपासणी करण्यात आली.

रक्तदाब, शुगर, हाडांचे आजार, महिलांचे आरोग्य, लहान मुलांचे आजार तसेच दंत समस्या यांसारख्या विविध आजारांवर तपासणी करून प्रत्येक रुग्णाला योग्य मार्गदर्शन व आवश्यक औषधोपचार देण्यात आले.

गाव भागात एकाच ठिकाणी इतक्या विविध तपासण्या व उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या यशस्वी उपक्रमासाठी सर्व तज्ञ डॉक्टर, मान्यवर व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार 🙏
आपल्या पाठबळामुळेच आम्हाला समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करता येत आहे. पुढेही प्रतिष्ठानतर्फे असे उपक्रम सातत्याने राबविले जातील 👍

देऊळवाडी येथे कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर तर्फे आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न 💉🙏गाव भाग असूनही य...
21/03/2026

देऊळवाडी येथे कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर तर्फे आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न 💉🙏

गाव भाग असूनही या शिबिरात तब्बल ४९ नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले समर्पण दाखवले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे 👏

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचे मनःपूर्वक आभार 🙏
आपल्या या उदात्त योगदानामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे.

आपण दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏
भविष्यातही हा आकडा दिवसेंदिवस वाढत राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू 👍

देऊळवाडी येथे कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर तर्फे आयोजित सर्व रोग निदान तपासणी व भव्य रक्तदान शिबिर उत्सा...
21/03/2026

देऊळवाडी येथे कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर तर्फे आयोजित सर्व रोग निदान तपासणी व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न 🙏

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे मा. संतोष गुट्टे (तहसीलदार) व एकनाथ नागरगोजे (पोलीस उपनिरीक्षक) तसेच उपस्थित सर्व तज्ञ डॉक्टरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुबसप्पा त्र्यंबकआप्पा माळेवाडे व उपाध्यक्ष संजय नागनाथ राजुळे उपस्थित होते.

या उपक्रमाला गावकऱ्यांचा व पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

👉 ३९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली
👉 ४९ जणांनी रक्तदान करून समाजसेवेत मोलाचे योगदान दिले 💉

या यशस्वी उपक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, तज्ञ डॉक्टर व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार 🙏

आपल्या पाठबळामुळेच आम्हाला समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करता येत आहे. पुढेही असे उपक्रम सातत्याने राबवत राहू 👍

21/03/2026
20/03/2026

Welcome to kalparivartan, your number one source for all things Blog News. We’re dedicated to giving you the very best of Content in Marathi & Hindi, with a...

Address

Udgir
Udgir
413517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कै.त्र्यंबकअप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category