College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Latur

  • Home
  • India
  • Udgir
  • College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Latur

College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Latur This page is run by Dr.S.R.Avhad, Assist. Prof. & I/C Media Cell, COVAS, Udgir.

Official page of the College of Veterinary and Animal Sciences, Udgir, which is a constituent college of Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur.

B.V.Sc & A.H. Admission Notification 2024-25
25/06/2024

B.V.Sc & A.H. Admission Notification 2024-25

Media coverage of Third Pashusakhi Training at COVAS, Udgir. College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Lat...
26/02/2024

Media coverage of Third Pashusakhi Training at COVAS, Udgir. College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. LaturNandkumar GaikwadNarendra KhodeSharad AvhadGanesh GadegaonkarVilas Dongre
------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

Media coverage of Third Pashusakhi Training at COVAS, Udgir. Anil BhikaneNandkumar GaikwadNarendra KhodeSharad Avhad  Co...
23/02/2024

Media coverage of Third Pashusakhi Training at COVAS, Udgir. Anil BhikaneNandkumar GaikwadNarendra KhodeSharad Avhad College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Latur.
------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

उद्यमिता आणि संघटनेतून पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे सहज शक्य – मा. कुलगुरू डॉ. नितीन पाटील-------------------------------...
20/02/2024

उद्यमिता आणि संघटनेतून पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे सहज शक्य – मा. कुलगुरू डॉ. नितीन पाटील
-------------------------------------------------------------------------

महिलांचे पशुसंवर्धनातील योगदान वादातीत आहे. कौटुंबिक जबाबदारीसह पशुपालनातील बहुतांश कार्ये महिला करीत असतात. मात्र त्यांच्या योगदानाला कायम दुय्यम महत्त्व दिले जाते. बहुतांश वित्तीय, विपणन आणि विस्तार सेवेपासून त्या अलिप्त राहतात. ग्रामीण महिला शेळीपालन सहज करू शकतात. त्यांना बचत गट, उत्पादक कंपनी अशा माध्यमातून संघटित करणे आणि त्यांच्यात उद्यमिता रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले. ते आज उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात माविम पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमात पशुसखीसोबत संवाद साधताना बोलत होते. यावेळी मंचावर माफसुचे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड, मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बी. आर. खरटमोल, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. आर. पाटील, प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख आणि प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे उपस्थित होते. कुलगुरू महोदय डॉ. नितीन पाटील आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, पशुसंवर्धनात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब वाढविणे हे एक विस्तार यंत्रणेपुढील मोठे आव्हान आहे. शास्त्रीय पद्धतीचा अवलंब वाढण्यासाठी महिलांचा विस्तार उपक्रमात सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी प्रकट केले. महिला शेळीपालन सहज करू शकतात. त्यांच्यात उद्यमिता रुजवून आणि बचत गट, उत्पादक कंपन्या सारख्या माध्यमातून त्यांना संघटीत केले तर पशुपालनासाठी लागणारी साधन सामग्री खरेदी, विविध सेवांची उपलब्धता, आणि त्यांच्या उत्पादनाचे विपणन सहज आणि अधिक लाभदायक होऊ शकते असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रसंगी संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांनी नांदेड जिल्ह्यातून प्रशिक्षणासाठी आलेल्या पशुसखींना उद्देशून केलेल्या मार्गदर्शनात म्हटले की, शेळीपालनाचे हे प्रशिक्षण आपणासाठी एक सुवर्णसंधी समजून त्यातून अधिकाधिक ज्ञान आणि कौशल्य अर्जित करण्याचा प्रयत्न करावा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी पशुसखीची प्रशिक्षणे अधिकाधिक प्रभावीपणे आयोजन समिती राबवित असल्याचा विश्वास प्रकट केला. याप्रसंगी "शेळीपालन" आणि "मूरघास निर्मिती तंत्र" याविषयावरील दोन पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र खोडे यांनी तर सूत्रसंचलन प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. शरद आव्हाड यांनी केले.
प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख यांनी पशुसखी प्रशिक्षण आणि प्रस्तुत प्रकल्पाची महिला सक्षमीकरणामध्ये असलेली भूमिका विशद केली. कार्यक्रमास डॉ. अशोककुमार देवंगरे, डॉ. गणेश गादेगावकर, डॉ. गोपाल भारकड, आदि समवेत पशुवैद्यकीय, मत्स्यविज्ञान आणि दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता डॉ. राम कुलकर्णी प्रशिक्षण सह-समन्वयक यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. Anil BhikaneNandkumar GaikwadCollege of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. LaturNarendra Khode

------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

आर्थिक उन्नतीसह महिला सक्षमीकरण शेळीपालनातून शक्य - प्रा.डॉ. अनिल भिकाने------------------------------------------------...
20/02/2024

आर्थिक उन्नतीसह महिला सक्षमीकरण शेळीपालनातून शक्य - प्रा.डॉ. अनिल भिकाने
--------------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी पशुपालनाने आपली उपयोगीता सिद्ध केलेली आहे. ग्रामीण भागात शेळीपालन व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक उन्नती होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक तथा प्रकल्प प्रमुख डॉ. अनिल भिकाने यांनी केले. व्यासपीठावर अध्यक्षीय स्थानी मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड हे होते. माफसू, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘महाराष्ट्रातील शेळी व कुक्कुटपालन करणा-या महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी पशुसखी व प्रशिक्षक महिलांचा क्षमता विकास’ या प्रकल्पाअंतर्गत दि.१५ ते २४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे पशुसखींसाठी ‘शेळीपालन’ या विषयावर दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल भिकाने यांनी पशुसखींचे पशुसंवर्धनातील योगदान आणि अपेक्षित भूमिका यावर उपस्थित पशुसखींना मार्गदर्शन केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की प्रशिक्षण खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी पशुसखींचे सहयोग आणि समर्पन आवश्यक आहे. जेणेकरून शेळीपालन विषयी अधिकाधिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात होईल.
उद्घाटन कार्यक्रमास मुंबई येथून महिला आर्थिक विकास महामंडळाचे उप-व्यवस्थापक श्री.अमृत इंगळे आणि परभणी येथून प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख आभासी पद्धतीने उपस्थित होते. प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेन्द्र खोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि प्रकल्प व प्रशिक्षणाबाबत उपस्थित पशुसखींना अवगत केले. प्रकल्प समन्वयक डॉ.धनंजय देशमुख आणि श्री. अमृत इंगळे यांनी प्रसंगी दूरस्थ पद्धतीने पशुसखींना समयोचित मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. शरद आव्हाड, प्रशिक्षण सह-समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. संदीप ढेंगे यांनी केले. यावेळी डॉ.राम कुलकर्णी प्रशिक्षण सह-समन्वयक, डॉ. मत्स्यगंधा पाटील, वसतीगृह नायक यांचेसमवेत इतर प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Anil BhikaneNandkumar GaikwadCollege of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. LaturNarendra KhodeMafsu Dee

------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

Winners of the Cricket and Badminton match between staff vs students were felicitated at the auspicious hands of Associa...
20/02/2024

Winners of the Cricket and Badminton match between staff vs students were felicitated at the auspicious hands of Associate Dean Dr.N.Z.Gaikwad Sir on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti on 19th February 2024 at COVAS, College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Latur. Dr. G.M. Gadegaonkar, Captain of the Staff team, and Dr.N.V.Khode & Dr.S.R.Avhad received trophies for cricket and badminton respectively.

------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने SWEEP अंतर्गत दिनांक 15/12/2023 रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत आपल्या महा...
20/02/2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने SWEEP अंतर्गत दिनांक 15/12/2023 रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थी कार्तिक ज्ञानेश्वर दराडे ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे त्याबद्दल त्याचा दिनांक 25/1/2024 म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिन या दिवशी सकाळी 11 वाजता शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील सभागृहात माननीय उपविभागीय अधिकारी उदगीर व तहसीलदार उदगीर यांच्या हस्ते सत्कार आणि बक्षीस समारंभ होणार आहे

तत्पूर्वी, आपल्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. एन झेड गायकवाड सर यांच्या हस्ते कार्तिक दराडे याचा आज सत्कार करण्यात आला.

प्रथम वर्षातील विद्यार्थी असून उपविभागीय अधिकारी आयोजित अशा मोठ्या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश मिळवणे हे कौतुकास्पद तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे त्याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांकडून कार्तिकचे कौतुक केले जात आहे.

------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

XI Convocation Notification
12/01/2024

XI Convocation Notification

पशुसखींची कौशल्यवृद्धी ग्रामीण विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावेल - प्रा.डॉ.अनिल भिकाने Anil BhikaneNandkumar GaikwadMafs...
04/01/2024

पशुसखींची कौशल्यवृद्धी ग्रामीण विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावेल - प्रा.डॉ.अनिल भिकाने Anil BhikaneNandkumar GaikwadMafsu Dee
-------------------------------------------------------------------
शेळी व कुक्कुट पालन क्षेत्रातील पशुसखींची कौशल्यवृद्धी ग्रामीण विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावेल असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक प्रा.डॉ.अनिल भिकाने यांनी केले. ते जागतिक बँक अर्थसहाय्यीत - मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने – ‘शेळी व कुक्कुट पालन सुधारणेसाठी पशुसखींचे कौशल्य विकास कार्यक्रम’ या प्रकल्पाअंतर्गत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे पशुसखी महिलांसाठी ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावरील पहिल्या १५ दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ऑनलाईन पद्धतीने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. अशोक कुमार देवंगरे होते. यावेळी व्यासपीठावर प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे, तर ऑनलाईन पद्धतीने डॉ. सारिपूत लांडगे, प्रकल्प समन्वयक, विस्तार संचालनालय, नागपूर व पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथून डॉ. निलेश खलाटे उपस्थित होते.
प्रा.डॉ.अनिल भिकाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागाच्या विकासात पशुसखी शेळी व कुक्कुट पालनाच्या माध्यमातून महत्वाची भूमिका निभावतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच माफसू करत असलेल्या विस्तार कार्याबाबत माहिती दिली. स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत राज्य शासनाशी झालेल्या करारानुसार विद्यापिठाच्या वतीने या वर्षात २७५ महिलांना तर पूढील वर्षभरात ७०० पशुसखीना प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रकल्पा अंतर्गत पहिले प्रशिक्षण घेण्याचा मान उदगीर पशुवैदयकीय महाविद्यालयाने मिळवला त्याबद्दल सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड व प्रशिक्षण समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे यांचे विशेष अभिनंदन केले. ग्रामीण भागात शेळीपालन व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक उन्नती साधने शक्य असल्याचे प्रतिपादन प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. अशोक कुमार देवंगरे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये केले. तसेच पशुसखीना भावी वाटचाळीस शुभेच्छा दिल्या. डॉ. निलेश खलाटे यांनी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. तसेच पशुसखीनकडून ग्रामीण भागात अपेक्षित असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत कोकाटे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.
समारोपीय कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते पशुसखीस प्रमाणपत्र, प्रशिक्षण किट व प्रशिक्षण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शरद आव्हाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी केले. यावेळी डॉ. गंगाप्रकाश चन्ना, प्रशिक्षण सह-समन्वयक, डॉ. गणेश गादेगांवकर, डॉ.विलास डोंगरे, मोठ्या प्रमाणात शिक्षक्वर्गीय अधिकारी, पदव्युत्तरचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या सयुंक्त विद्यमाने नांदेड ...
21/12/2023

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या सयुंक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील १०५ पशुपालकांसाठी १ दिवसीय प्रशिक्षण शिबिराची चलचित्रे Dated: 21/12/2023
------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

Media coverage of various events.------------------Dr. Sharad AvhadI/C Media Cell
21/12/2023

Media coverage of various events.

------------------
Dr. Sharad Avhad
I/C Media Cell

Address

Kaulkhed Road, Nideban, Dist. Latur
Udgir
413517

Alerts

Be the first to know and let us send you an email when College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to College of Veterinary and Animal Sciences, Udgir, Dist. Latur:

Share