स्वच्छ सर्वेक्षण-नगर परिषद तुमसर

  • Home
  • India
  • Tumsar
  • स्वच्छ सर्वेक्षण-नगर परिषद तुमसर

स्वच्छ सर्वेक्षण-नगर परिषद तुमसर providing information of swachh survekshan activities to citizens of Tumsar city.

❌🚛🚫जड वाहनास प्रवेश बंदी 🚫🚛❌याद्वारे तुमसर शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे कि, शहरामध्ये वाढत्या अपघातांना...
23/01/2025

❌🚛🚫जड वाहनास प्रवेश बंदी 🚫🚛❌
याद्वारे तुमसर शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे कि, शहरामध्ये वाढत्या अपघातांना लक्षात घेता. तुमसर शहरामधील मुख्य रस्त्यावरून (कृषी उत्पन्न बाजार समिती ते नवीन बस स्थानक ते बावनकर चौक सिहोरा रोड) या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४३ के वरून सकाळी ते दुपारी वाहतूक जास्त प्रमाणात असल्याने जड वाहनास प्रवेश बंदीचा प्रस्ताव जिल्हा वाहतूक प्रशासन विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

नगर परिषद तुमसर द्वारे विधान परिषदेच्या चुनावाच्या प्रचारार्थ आज नगर परिषद प्रांगणात रांगोळी स्पर्धा व पथनाट्यचे आयोजन क...
28/10/2024

नगर परिषद तुमसर द्वारे विधान परिषदेच्या चुनावाच्या प्रचारार्थ आज नगर परिषद प्रांगणात रांगोळी स्पर्धा व पथनाट्यचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे संचालन नगर परिषद कस्तुरबा विद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रकांत भट सर यांनी केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. प्रशांत बोरकर व श्रीमती पूजा सूर्यवंशी हे होते. सदर कार्यक्रमात नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वृंद सहभागी होते. तसेचे नगर परिषद कस्तुरबा शाळेचे विद्यार्थ्यांनी छान प्रस्तुती दिली.

#नगरपरिषदतुमसर

नगर परिषद तुमसर च्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, नगर परिषद तुमसर च्या हद्दीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधर...
24/10/2024

नगर परिषद तुमसर च्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, नगर परिषद तुमसर च्या हद्दीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान 5.0 ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे त्याकरिता नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हे प्राथमिक जिम्मेदारी आहे. उघड्यावर कचरा घालू नये. नाली नाल्या, नाले, नदी, जलाशये इत्यादी जलस्त्रोता मध्ये घाण केर कचरा घालू नये. परदेशातून आयात केलेले फटाके फोडून आपले व आपल्या शेजाऱ्यांचे आरोग्य धोक्यात घालू नये. फटाक्यांनी वायू, जल आणि पर्यावरण यांचे प्रदूषण होते तसेच आपली वित्त हानी सुद्धा होते करिता त्या फटाकांच्या पैशांनी कुणा गोर गरिबांची किंवा स्वतः आपल्या परिसरातील गरजू लोकांना मदत करावी. आपल्या कडे असलेले स्वच्छ धुतलेले वापरलेले कपडे, पुस्तके, पादत्राणे(शूज, चप्पल), इलेक्ट्रोनिक वस्तू ई. वापरात नसल्यास ते साहित्य नगर परिषदेच्या RRR (reduce, reuse, recycle) सेंटर मध्ये जमा करावे. आम्ही ते साहित्य गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवू.
चला तर मग! या दिवाळीत संकल्प करूया 🌠
पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करूया!🎆
शेजारी, गरजू, उपाशी झोपणार नाही याची काळजी घेऊया!🎇
हि दिवाळी सामाजिक बांधिलकीची साजरी करूया! 🤝
#स्वच्छभारतअभियान #स्वच्छमहाराष्ट्र










@highlightस्वच्छ सर्वेक्षण-नगर परिषद तुमसरCEPT Research and Development Foundation CEPT Research and Development Foundation Swachh Bharat Mission, India Ministry of Housing and Urban Affairs Municipal council Tumsar Swachh Maharashtra Mission - Urban 🎆🎇🌠

"अत्तर उटण्याचा मंद सुगंध घेऊन आली आज दिवाळी पहाट दिवाच्या सोनेरी                                         तेजानी उजळून ज...
19/10/2024

"अत्तर उटण्याचा मंद सुगंध घेऊन आली आज दिवाळी पहाट दिवाच्या सोनेरी
तेजानी उजळून जावो वहिवाट"
दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे. चला आपण या परंपरेला बदलवूया, प्रदूषण मुक्त, पर्यावरण युक्त दिवाळी साजरी करू या !!







08/10/2024












राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर जयंती निमित्त दि.2/10/2024 नगर परिषद तुमसर daynulm  विभाग येथे " महिला सक्ष...
02/10/2024

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर जयंती निमित्त दि.2/10/2024 नगर परिषद तुमसर daynulm विभाग येथे " महिला सक्ष्मीकारण या विषयावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहा. प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम घेण्यात आले. तसेच लायन्स क्लब सदस्य श्री गणेशजी बर्वे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
Ln. सुनील पारधी, ऍड. रावलांनी, इतर सदस्य तसेच nss विध्यार्थी जनता विद्यालय , पोलीस विभाग कर्मचारी, तसेच नगर परिषद कर्मचारी वर्ग,nulm बचत गट सदस्य, समूह संसाधन व्यक्ती (crp) यांचे उपस्थिती होती.




24/09/2024

आज, दिनांक २१ सप्टेंबरला शून्य कार्बन उत्सर्जन दिवस साजरा केला जातो— निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे म्हणजे आपण तयार केलेला हरितगृह वायू वातावरणातून काढून टाकणे आणि पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे. भारताने २०७० पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने २०५० पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

#शून्य_कार्बन_उत्सर्जन_दिवस

जागतिक बांबू दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.... बांबू हि गवताची प्रजाती असून या बांबू पासून अनेक फर्निचर, ...
18/09/2024

जागतिक बांबू दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.... बांबू हि गवताची प्रजाती असून या बांबू पासून अनेक फर्निचर, औषधी, कपडे, सजावटी च्या वस्तू व कागद बनविल्या जातो बांबू पृथ्वीवरील सर्वात जलद वाढ होणारी वनस्पती असून आपण याची दर 3-5 वर्षांनी कापणी करू शकतो. करिता आपल्या शेतात, प्लॉट वर याची लागवड करू शकतो.




#झाडेलावा


नगर परिषद तुमसर द्वारे "स्वच्छता हि सेवा" अभियानांतर्गत शहरामधील नेहमी कचरा आढळणारे ठिकाण (GVP) साफ करण्यात आलेले आहेत क...
17/09/2024

नगर परिषद तुमसर द्वारे "स्वच्छता हि सेवा" अभियानांतर्गत शहरामधील नेहमी कचरा आढळणारे ठिकाण (GVP) साफ करण्यात आलेले आहेत करिता नागरिकांनी सदर ठिकाणी स्वच्छता राखणे हे आवश्यक आहे. नगर परिषदे तर्फे आवाहन आहे कि स्वच्छ झालेल्या ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छ करू नये. आपण स्वच्छता ठेवू तरच शहर स्वच्छ राहील याची जाणीव असू द्यावी.









नगर परिषद तुमसर हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि, माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत ...
13/09/2024

नगर परिषद तुमसर हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि, माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरे करावे त्यासाठी खालील प्रमाणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.









स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत सुरु असलेल्या घरोघर जाऊन घनकचरा व्यवस्थापन माहिती अभियान यशस्वी रित्या पार पा...
06/09/2024

स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत सुरु असलेल्या घरोघर जाऊन घनकचरा व्यवस्थापन माहिती अभियान यशस्वी रित्या पार पाडण्यात येत आहे करिता सर्व तुमसर नगर वासियांनी सदर माहिती प्रदान करण्याकरिता येणाऱ्या माहितीधारकास सहकार्य करावे.

Address

Tumsar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वच्छ सर्वेक्षण-नगर परिषद तुमसर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share