14/05/2026
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, #धर्मवीर #छत्रपती_संभाजी_महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर संस्कृतसह अनेक भाषांचे गाढे अभ्यासक, दूरदृष्टीचे राज्यकर्ते आणि स्वाभिमानी नेतृत्वाचे जाज्वल्य उदाहरण होते. असह्य छळ, यातना आणि संकटांसमोरही त्यांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या अद्वितीय बलिदानाने महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर प्रेरणा निर्माण केली आहे..
त्यांचे बलिदान हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णपान असून, स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेले त्यांचे योगदान युगानुयुगे स्मरणात राहील..