13/06/2025
विकसित कृषि संकल्प अभियान
Day15 Hingoli
*विकसित कृषी संकल्प अभियानाचा समारोप*
केंद्रीय कृषिमंत्री माननीय शिवराज सिंह चव्हाण यांचे संकल्पनेतून संपूर्ण भारतात विकसित कृषी संकल्प अभियान दिनांक 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीमध्ये राबवण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात कृषिविज्ञान केंद्र तोंडापुर द्वारे प्रमुख डॉ पी पी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
जिल्ह्यातील सदर अभियानाचा समारोप कळमनुरी तालुक्यातील मौजे धानोरा, ढोलक्याची वाडी व वाई या गावात कृषी ज्ञानाचा जागर करून करण्यात आला.
सदर गावांमधील शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. कृषी विद्यान केंद्र तोंडापूर येथील शास्त्रज्ञ श्री. अनिल ओळंबे यांनी हळद लागवडी बद्दल मार्गदर्शन केले. हळद बेणे प्रक्रिया, लागवड पद्धती तसेच हळदीवर येणारे महत्त्वाचे रोग व कीड यांची माहिती दिली. डॉ अतुल मुराई यांनी केवीके चे कार्य ,उधिष्ट्य व केंद्रत ऊपलब्ध जैविक निविस्था ची माहिती दिली .
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केवळ शेती करून भागणार नाही तर पशुपालन, शेळीपालन, कोंबडी पालन यासारखा शेतीपूरक जोडधंदा करावा लागेल तरच शेती फायद्याची होईल असे मत डॉ. एस. व्ही. लोंढे सहयोगी प्राध्यापक पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी यांनी व्यक्त केले.
श्री जाधव के. एम. तालुका कृषी अधिकारी, कळमनुरी यांनी सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या अनुषंगाने बीज प्रक्रिया, बेड वरील सोयाबीन लागवड, सोयाबीनचे महत्त्वाचे वाण व सोयाबीन उगवण क्षमता तपासून पेरणी करण्याबद्दल माहिती दिली तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऍग्री स्टॅक - शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास
डॉ. सुरजित मंडल (वरिष्ठ शास्त्रज्ञ, CCRI, नागपूर)
डॉ. थिरुगनवेल (वरिष्ठ शास्त्रज्ञ, CCRI, नागपूर)
श्री. अनिल ओळंबे (विषय विशेषज्ञ - उद्यानविद्या, KVK हिंगोली)
डॉ. अतुल मुराई (विषय विशेषज्ञ - कृषि विस्तार, KVK हिंगोली)
डॉ एस व्ही लोंढे
सहयोगी प्राध्यापक
पशुविज्ञान महाविद्यालय परभणी
हजर होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष हनवते , गुलाबराव सूर्यवंशी , मंडळ कृषी अधिकारी श्री नितीन घुगे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री हरण डी. एन. रमेश पोहनकर व निखिल राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.