आर्ष विद्या समाजं

आर्ष विद्या समाजं Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आर्ष विद्या समाजं, Social service, Balaramapuram, Thiruvananthapuram.

आम्ही आर्ष विद्या समाजम या संस्थेची सेवा, शक्तीकरण आणि संरक्षण ही मोहीम समाजाच्या मुळाशी आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवि...
24/02/2026

आम्ही आर्ष विद्या समाजम या संस्थेची सेवा, शक्तीकरण आणि संरक्षण ही मोहीम समाजाच्या मुळाशी आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संवेदनशील आणि वचनबध्द कार्यकर्त्यांना आवाहन करीत आहोत.

आम्हाला दोन प्रकारचे कार्यकर्ते अपेक्षित आहेत:
▪️ पूर्ण वेळ कार्यकर्ते - जे आपले आयुष्य आणि शक्ती ह्या मोहीमेसाठी देऊ इच्छितात.
▪️ अर्ध वेळ कार्यकर्ते - जे आपले काम किंवा शिक्षण सांभाळून आपला थोडा मौल्यवान वेळ ह्या मोहीमेसाठी देऊ इच्छितात.

1️⃣ पूर्ण वेळ कार्यकर्ते -
🔸पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. अर्ध वेळ कार्यकर्त्यांचेही स्वागत आहे.
🔸 वय वर्षे १८ ते ६५ पर्यंतच्या कोणीही व्यक्ती अर्ज करू शकतात. त्यासाठी लिंगाचे बंधन नाही.
🔸अर्जदारांची आवड, ज्ञान, कौशल्य, शैक्षणिक पात्रता आणि वैचारिक क्षमता यानुसार त्यांची स्वयंसेवक, प्रशिक्षण व सेवा संयोजक, आयोजक आणि धर्मप्रचारक अशा वेगवेगळ्या कामांसाठी निवड केली जाईल.
🔸अर्जदारांच्या मुलाखती प्रत्यक्ष भेटून किंवा व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे घेण्यात येतील.

निवड झालेल्या सर्व अर्जदारांना तज्ञ प्रशिक्षकांकडून एक महिन्याचे पूर्वनियोजित प्रशिक्षण देण्यात येईल.

हे प्रशिक्षण हिंदी, इंग्रजी, मल्याळम आणि कानडी भाषेतून देण्यात येईल.
प्रशिक्षणाच्या कालावधीत रजा मिळणार नाही.

प्रशिक्षणार्थींच्या रहाण्याची, भोजनाची आणि कामानिमित्त प्रवासाची मोफत सोय करण्यात येईल.
कार्यकर्त्यांची नेमणूक प्रशिक्षणादरम्यान केलेल्या ज्ञान, कौशल्य आणि क्षमता ह्या गोष्टींच्या मूल्यमापनानुसार करण्यात येईल.

नेमणूक झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेल्या सेवेनुसार मानधन/दक्षिणा आमच्या शुभचिंतकांच्या सहकार्याने देण्यात येईल.

पूर्ण वेळ कार्यकर्त्यांसाठी पात्रतेचे मूलभूत निकष -
१. सनातन धर्म आणि भारतीय संस्क्रृतीबद्दल निष्ठा आणि सच्चेपणा असावा.
२. संस्थेच्या आयोजित कामात शिस्तबध्दपणे आणि सच्चाईने स्वतःला समर्पित करण्याची तयारी असावी.
३. कट्टर प्रामाणिकता आणि सामाजिक मूल्ये असावीत.
४. शारीरिक आणि मानसिक स्थैर्य आवश्यक आहे तसेच जगात कोठेही काम करण्याची तयारी असावी.
५. संगणक आणि फेसबुक- व्हाॅट्स ॲप -इन्स्टाग्राम यांसारख्या ऑनलाईन सुविधांची ओळख असावी.
भाषांवरील प्रभुत्व ही एक अतिरिक्त क्षमता समजली जाईल.

2️⃣ अर्ध वेळ कार्यकर्ते -
सनातन धर्मासाठी घरी राहून कार्य करू इच्छिणारे अर्ध वेळ कार्यकर्ते असतील तर त्यांचेही स्वागत आहे.

कार्यरत असणारे व्यावसायिक, सेवानिवृत्त व्यक्ती, विद्यार्थी अथवा गृहिणी जर आर्ष विद्या समाजचे काम करण्यासाठी उत्सुक असतील आणि आपला काही वेळ देऊ शकत असतील तर त्यांनाही संधी देण्यात येईल.

अर्ध वेळ कार्यकर्त्यांसाठी वयाची मर्यादा नाही. त्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि उपलब्ध वेळानुसार तसेच घरातून अथवा कामाच्या ठिकाणी असताना पूर्ण करता येईल अशीच जबाबदारी देण्यात येईल.

कार्यकर्त्यांची नियुक्ती 'आर्ष विद्या समाजम' ने आखलेल्या नियम व अटींनुसार करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी वर दिलेला फाॅर्म भरावा: https://forms.gle/kgGrCXHLireZcFv86

धर्मसेवेच्या ह्या पवित्र यज्ञात सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

आपले नम्र,
आर्ष विद्या समाजम

Address

Balaramapuram
Thiruvananthapuram
695501

Alerts

Be the first to know and let us send you an email when आर्ष विद्या समाजं posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category