Collector Thane

Collector Thane जिल्हाधिकारी कार्यालय-ठाणे , महाराष्ट्र शासन Official Page of Collector Office-Thane, Maharashtra

उंबरमाळीतून पाणंद रस्ता सुरु; शेतकऱ्यांना मिळणार समाधानदहा दिवसात रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात    CMOMaharashtra Distric...
28/05/2026

उंबरमाळीतून पाणंद रस्ता सुरु; शेतकऱ्यांना मिळणार समाधान

दहा दिवसात रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

CMOMaharashtra District Information Office Thane

जनगणनेसाठी पथक सह्याद्रीच्या पायथ्याशीमुरबाड तालुक्यातील दुर्गम वस्त्यांची नोंदणी सुरू     CMOMaharashtra Census India 2...
28/05/2026

जनगणनेसाठी पथक सह्याद्रीच्या पायथ्याशी

मुरबाड तालुक्यातील दुर्गम वस्त्यांची नोंदणी सुरू

CMOMaharashtra Census India 2027 District Information Office Thane

मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळविशेष सखोल पुनरीक्ष...
20/05/2026

मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

ठाणे दि.20 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील मतदार संख्या, मतदान केंद्रांची रचना आणि आगामी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या ठाणे जिल्ह्यात एकूण मतदार संख्या ७४ लाख ७२ हजार २७० इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३९ लाख ५६ हजार ५८६ तर महिला मतदारांची संख्या ३५ लाख १४ हजार २१८ एवढी आहे. याशिवाय जिल्ह्यात १ हजार ४६६ इतर मतदार, १ हजार १६ अनिवासी भारतीय (NRI) मतदार, २ लाख ५ हजार ३२९ तरुण मतदार (वय १८-१९), ४० हजार ८२ दिव्यांग मतदार आणि ५२ हजार २२० ज्येष्ठ नागरिक (वय ८५ वर्षांपेक्षा जास्त) मतदारांची नोंद आहे. जिल्ह्याचा सरासरी जेंडर रेशिओ ८८८ इतका असून, १४६-ओवळा माजिवडा हा ५ लाख ७२ हजार ९५८ मतदारांसह जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे, तर सर्वात कमी मतदार १४१-उल्हासनगर मतदारसंघात असून तेथे २ लाख ९४ हजार ३१४ मतदार आहेत.
मतदान केंद्रांच्या रचनेबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ६ हजार ८९४ मूळ मतदान केंद्र आहेत. मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी नियोजित करण्यात आली असून, यामध्ये २ हजार २६७ पदनिर्देशित ठिकाणी ६ हजार ८९४ मूळ मतदान केंद्रांची व्यवस्था असेल. या रचनेत पक्क्या इमारतीमधील मतदान केंद्रांची संख्या ४ हजार ६७० असून, १ हजार २३१ केंद्र पार्टिशनमध्ये, ४०४ केंद्र मंडपामध्ये, ३३७ केंद्र सोसायट्यांमध्ये आणि २५२ केंद्र झोपडपट्टी बहुल भागात म्हणजेच स्लम क्लस्टरमध्ये उभारली जाणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ५१८ मतदान केंद्र १३९-मुरबाड मतदारसंघात असून, सर्वात कमी २६० मतदान केंद्र १४१-उल्हासनगर मतदारसंघात आहेत.
आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या मोहिमेची पूर्वतयारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक छपाईचे काम २० जून ते २९ जून २०२६ या कालावधीत पूर्ण केले जाईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. या घरभेटी दरम्यान प्रत्येक मतदाराला 'एन्यूमरेशन फॉर्म'च्या दोन प्रती दिल्या जातील, ज्यातील एक प्रत मतदाराची किंवा कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी घेऊन बीएलओमार्फत संकलित केली जाईल आणि दुसरी प्रत पोचपावती म्हणून मतदाराला दिली जाईल.
प्रशासकीय प्रक्रियेनुसार २९ जुलै २०२६ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले जाईल आणि ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांना आपल्या दावे व हरकती ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दाखल करता येतील, तर या सर्व दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ठाणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या मतदारांची माहिती पूर्वीच्या डेटाबेसशी किंवा सन २००२ च्या मतदार यादीशी जुळणार नाही, त्यांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत सुनावणीची नोटीस दिली जाईल आणि अशा मतदारांना त्यांच्या जन्माच्या वर्षाच्या वर्गवारीनुसार (उदा. १ जुलै १९८७ पूर्वी, किंवा त्यानंतरचे कालखंड) आवश्यक असणारे अधिकृत दस्तऐवज जसे की जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि पात्र मतदारांनी या प्रक्रियेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

CMOMaharashtra District Information Office Thane

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर अभियानांतर्गत कल्याण तालुक्यातील मौजे खडवली, मंडळ नडगाव येथे आमदार क...
15/05/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर अभियानांतर्गत कल्याण तालुक्यातील मौजे खडवली, मंडळ नडगाव येथे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आमदार महोदयांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यात आले.

#महाराजस्व

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यां...
14/05/2026

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी वरूणकुमार सहारे, तहसिलदार संदीप थोरात, प्रदीप कुडाळ, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे, ऋषिकेश कुलकर्णी व इतर कर्मचारी यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन...
13/05/2026

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026

बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन

बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार -आमदार किसन कथोरे

ठाणे,दि.13(जिमाका):ऑलिम्‍पिक खेळांना प्रोत्‍साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा ही ऐतिहासिक ठरणार सांगून शहरात इनडोअर स्‍टेडियम उभे करणार असल्‍याचे घोषणा आमदार किसन कथोरे यांनी आज येथे केली.
क्रीडामय वातावरणात शासनाच्‍या राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित या स्‍पर्धेला आजपासून दिमाखदार सुरूवात झाली. हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर रंगलेल्‍या स्‍पर्धेचे आमदार किसन कथोरे यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन करण्यात आले.
यावेळी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्‍या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे, जिल्‍हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यधिकारी मारूती गायकवाड, नगरसेवक किरण भोईर, माजी नगराध्यक्षा राजेंद्र घोरपडे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे संजय नाईक, निलेश जगताप व राज्‍य व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.
बदलापूरमधील व्‍हॉलीबॉल स्‍पर्धा ही ऐतिहासिक होईल असे सांगून श्रीमती रूचिता घोरपडे पुढे म्‍हणाल्‍या की, बदलापूर जिमखाना हे शहराचे वैभव आहे. शहरातील ५ क्रीडांगणे खेळाडूंसाठी उपलब्ध असून भविष्यात यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होतील.
बदलापूरमधील स्‍पर्धा ही राष्ट्रीय स्‍तरावरील स्‍पर्धा असल्‍याचे वातावरण दिसून येत आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळातही करीअर होऊ शकते, असे जिल्‍हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
खेळाडूंच्‍या मिरवणूकीने बदलापूरमधील राज्‍य व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा प्रारंभ झाला. यानंतर स्‍पर्धेचे शानदार उद्‌घाटन बदलापूर जिमखाना मैदानावरील भव्‍य मैदानात करण्यात आली. शाहीर नंदेश उमप यांच्‍या सांस्‍कृतिक मेजवानीसह जिम्‍नॉस्‍टिक्‍सची चित्तथरारक प्रात्‍यक्षिके उद्‌घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
१३ ते १७ मे २०२६ कालावधीत होणाऱ्या या स्‍पर्धेसाठी राज्‍यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगणार आहे. स्‍पर्धेतील विजेत्‍यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे. ८ विभागातील ३८४ खेळाडू, ३२ मार्गदर्शक, ३२ व्‍यवस्‍थापक, एकूण ४४८ जणांचे पथक सहभागी झाले आहे.स्‍पर्धेत कोल्‍हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई व नाशिक या संघात चुरशीच्‍या लढती सुरू झाल्‍या आहेत. १८ व २१ वर्षांखालील युवकांचा व्‍हॉलीबॉलचा थरार प्रथमच बदलापूरमध्ये पहाण्यास मिळणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांनी मानले.

सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ...
13/05/2026

सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'चे अधिकृत बोधचिन्ह...

'छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026' साठी बदलापूर सज्‍जबुधवारी भव्‍य उद्‌घाटन, राज्‍यभरातील ३८...
12/05/2026

'छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026' साठी बदलापूर सज्‍ज

बुधवारी भव्‍य उद्‌घाटन, राज्‍यभरातील ३८४ खेळाडूंचा सहभाग; २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे, १३ ते १७ मे कालावधीत रंगणार थरार

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष...
11/05/2026

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

ठाणे,दि.11 (जिमाका):- आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सतर्क राहून समन्वयाने पूर्वतयारी करावी. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा चोख असावा आणि आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदतीसाठी 'आपदा मित्रां'ची संख्या वाढवावी, असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक २०२६' समिती सभागृहात संपन्न झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे ऑडिट करावे. जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा. राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सून काळात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन प्रमुख घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपरची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
डॉ.पांचाळ यांनी आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची गतिशीलता तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घ्यावी. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषध साठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत अशा सूचना देवून आपत्ती निवारणासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अनुदान उपलब्ध करून दिले जाईल,असे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी दरडप्रवण गावे, पूरप्रवण क्षेत्रे, नदीतील गाळ काढणे, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा आणि शोध-बचाव साहित्याची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती दिली. सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना आपापल्या स्तरावर नियंत्रण कक्ष (Control Rooms) तातडीने स्थापन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
0000000

Address

Court Naka
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share