Hasmukh Gehlot

Hasmukh Gehlot I strongly believe that Every next level of your life will demand a different version of U.

भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन. 🙏शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचे माध्यम मानणाऱ्या त...
05/09/2026

भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन. 🙏

शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचे माध्यम मानणाऱ्या त्यांच्या विचारांचा गौरव म्हणून साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
#राधाकृष्णनजयंती

गोविंदा आला रे!दहीहंडीच्या उत्साहात आणि गोपाळकाल्याच्या पारंपरिक चवीत श्रीकृष्णाच्या गोकुळातील बालपणाच्या आठवणी जिवंत हो...
05/09/2026

गोविंदा आला रे!

दहीहंडीच्या उत्साहात आणि गोपाळकाल्याच्या पारंपरिक चवीत श्रीकृष्णाच्या गोकुळातील बालपणाच्या आठवणी जिवंत होतात. काळ बदलला, उत्सवाचे स्वरूप बदलले मात्र या परंपरेशी जोडलेला आनंद आजही तितकाच मनापासून अनुभवला जातो.

दहीहंडी व गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

#दहीहंडी #गोपाळकाला #कृष्णजन्माष्टमी

आज सौ. डिंपल विनोद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला झोन व ना-फेरीवाला झोन, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, आगामी गणेशो...
04/09/2026

आज सौ. डिंपल विनोद मेहता यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला झोन व ना-फेरीवाला झोन, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, आगामी गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानगी प्रक्रिया, स्वीकृत सदस्य निवड तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता भाड्याने देण्याबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीत फेरीवाला व ना-फेरीवाला झोनचा प्रभागनिहाय आढावा, फेरीवाल्यांच्या यादीतील आवश्यक बदल तसेच अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची सद्यस्थिती व प्रलंबित कारवाईचा आढावा घेण्यात आला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडप परवानगी प्रक्रियेतील अडचणी दूर करून प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढणे आणि एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

स्वीकृत सदस्य निवडीसाठी आवश्यक पात्रता व निकष निश्चित करणे तसेच महानगरपालिकेच्या मालमत्तांचा योग्य व पारदर्शक वापर करून मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.

सदर बैठकीस मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, मा. आयुक्त श्री. राधाबिनोद शर्मा, प्रभाग समिती सभापती सौ. वर्षा भानुषाली, सौ. सुनिता जैन, श्री. मदनसिंह, श्री. संजय थेराडे, श्री. दिनेश जैन, श्री. प्रशांत दळवी तसेच मा. अतिरिक्त आयुक्त श्री. संभाजी पानपट्टे, उपायुक्त श्री. स्वप्निल सावंत, सर्व प्रभाग अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या कामकाजात अधिक प्रभावीपणा व पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत सातत्याने कार्यरत राहू.

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥नंदलाल श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा हा मंगल दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि सका...
04/09/2026

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

नंदलाल श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा हा मंगल दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि सकारात्मकता घेऊन येवो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#जन्माष्टमी #श्रीकृष्ण

निसर्गासाठी एक पाऊल, हरित मिरा-भाईंदरसाठी एक संकल्प!मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्ष समितीच्या वतीने प्र...
02/09/2026

निसर्गासाठी एक पाऊल, हरित मिरा-भाईंदरसाठी एक संकल्प!

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्ष समितीच्या वतीने प्रभाग समिती क्रमांक ४ अंतर्गत आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल, सेवन इलेव्हन स्कूलजवळ आयोजित ‘वन महोत्सव’ व वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होत वृक्षारोपण केले.

वृक्षारोपण हा केवळ एक उपक्रम न राहता, आपल्या शहराच्या भविष्यासाठीची चळवळ बनली पाहिजे. वाढत्या शहरीकरणासोबत मिरा-भाईंदरचा हरित परिसरही समृद्ध ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

या कार्यक्रमास मा. महापौर सौ. डिंपल विनोद मेहता, मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, प्रभाग समिती क्रमांक ४ चे सभापती श्री. संजय थेराडे, रौप्य महोत्सवी वर्ष समितीच्या अध्यक्षा सौ. शानू गोहिल, अतिरिक्त आयुक्त श्री. संभाजी पानपट्टे, उद्यान अधीक्षक श्री. नागेश वीरकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, शालेय विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज लावलेले प्रत्येक झाड उद्याच्या मिरा-भाईंदरला अधिक हिरवे, निरोगी आणि सुंदर बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. चला, वृक्षसंवर्धनाची ही जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारूया.
#वनमहोत्सव #वृक्षारोपण #वृक्षसंवर्धन #हरितमिराभाईंदर #पर्यावरणसंवर्धन

जन्मदिन की अनंत शुभकामनाएँ..! 🌺
29/08/2026

जन्मदिन की अनंत शुभकामनाएँ..! 🌺

पद्मभूषण मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन. 🙏त्यांच्या स्मरणार्थ साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन ...
29/08/2026

पद्मभूषण मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन. 🙏

त्यांच्या स्मरणार्थ साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन हा देशातील खेळाडू आणि क्रीडा प्रतिभांचा सन्मान करण्याचा दिवस आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने कुटुंबातील नाती अधिक जपली जावीत, संवाद वाढावा आणि प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण राहावे, हीच सद...
28/08/2026

रक्षाबंधनाच्या निमित्ताने कुटुंबातील नाती अधिक जपली जावीत, संवाद वाढावा आणि प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण राहावे, हीच सदिच्छा.

सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
#रक्षाबंधन #रक्षाबंधनाच्या_शुभेच्छा

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏समुद्राला आपला सखा मानून त्याच्यावर जीवन आणि उपजीविका अवलंबून असलेल्या कोळी बांधवां...
27/08/2026

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

समुद्राला आपला सखा मानून त्याच्यावर जीवन आणि उपजीविका अवलंबून असलेल्या कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा श्रद्धा आणि परंपरेचा विशेष सण आहे.
या मंगलदिनी सर्व कोळी बांधवांना सुख, समृद्धी, सुरक्षितता आणि भरभराटीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#नारळीपौर्णिमा #कोळीबांधव #कोळीसमाज #महाराष्ट्र #हार्दिकशुभेच्छा

Address

Thane
401105

Telephone

+919833436161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hasmukh Gehlot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share