आपले ठाणे - Aaple Thane

आपले ठाणे - Aaple Thane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपले ठाणे - Aaple Thane, Public & Government Service, THANE, Thane.

लोकमान्य नगर इथे मुलांनी तयार केली सुवर्ण दुर्ग ची प्रतिकृती.
31/10/2022

लोकमान्य नगर इथे मुलांनी तयार केली सुवर्ण दुर्ग ची प्रतिकृती.

24/04/2021
Check this if anybody required.
12/04/2021

Check this if anybody required.

गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी येथे संपर्क साधावा
10/04/2021

गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी येथे संपर्क साधावा

Pls attach photos of Original Demand form for Remdicivir with Dr signature and on Hospitals letterhead Patients positive...
10/04/2021

Pls attach photos of
Original Demand form for Remdicivir with Dr signature and on Hospitals letterhead
Patients positive report

हॅास्पिटलच्या लेटरहेडवर डॅाक्टरांनी साईन केलेल रेमडीसिवर च Prescription
पेशंट चा पॅाझिटिव रिपोर्ट

*आज २८ डिसेंबर.**आज जेष्ठ अभिनेते डेव्हिड यांचा स्मृतिदिन.*जन्म. २४ जून १९०९ ठाणे. डेव्हिड हे एक बेने इस्रायली ज्यू होते...
28/12/2020

*आज २८ डिसेंबर.*
*आज जेष्ठ अभिनेते डेव्हिड यांचा स्मृतिदिन.*
जन्म. २४ जून १९०९ ठाणे.
डेव्हिड हे एक बेने इस्रायली ज्यू होते हे अनेकांना माहीत नसावे. त्यांचे पूर्ण नाव डेव्हिड अब्राहम चेऊलकर! चार दशके हिंदी चित्रपटसृष्टीत एक उत्तम चरित्र अभिनेते अशी ओळख असणारे डेव्हिड यांनी मुंबई विद्यापीठातून १९३० साली बी.ए झाल्यावर डेव्हिड यांनी पुढची सहा वर्षे नोकरी मिळवण्यासाठी धडपड केली. नोकरी मिळाली नाही, पण या काळात त्यांनी वकिलीची परीक्षा दिली. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सिनेमा स्टुडिओमध्ये किरकोळ काम करणाऱ्या नायमपल्ली यांच्याशी डेव्हिड यांची मत्री जमली. त्याच्या ओळखीमुळे १९३७ साली डेव्हिडना ‘जम्बो’ या चित्रपटात काही किरकोळ भूमिका मिळाली. १९४१ साली प्रदर्शित झालेला ‘नया संसार’ हा खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट. डेव्हिड यांनी एकूण एकशे दहा चित्रपटांत भूमिका केल्या. त्या बहुतेक चरित्र अभिनेत्याच्या. बूटपॉलिश (१९५४), चुपके चुपके (१९७५), सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८), गोलमाल (१९७९), बातों बातों में (१९७९), खूबसूरत (१९८०) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या नाटय़- सांस्कृतिक संस्थेशी निगडित असलेल्या डेव्हिड यांनी के. ए. अब्बास यांच्या ‘शहर और सपना’, ‘चार दिल चार राहें’ आदी चित्रपटांतूनही कामे केली. १९५९ ते १९७५ या काळात उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. अनेक महत्त्वाच्या पुरस्कार वितरण, प्रकाशन, उद्घाटनाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले. डेव्हिड क्रीडाप्रेमी होते, त्यामुळे ऑलिम्पिक खेळाडूंसह भारतीय समूहात त्यांचीही निवड एकदा झाली होती. त्यांच्या अभिनयगुणांसाठी भारत सरकारने १९६९ साली ‘पद्मश्री’ने त्यांचा बहुमान केला.
डेव्हिड यांचे टोरांटो येथे २८ डिसेंबर १९८१ रोजी निधन झाले.
* #संजीववेलणकर पुणे.*

01/12/2020

मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर (84) यांचं आज निधन झाले आहे. ओम शांती!

26/11/2020

मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २००८ रोजी नर्स अंजली कुलथे यांची ड्युटी 'अँटीनेटल वॉर्ड'मध्ये होती. प्रसूती होण्यापूर्वी काही तास आधी गर्भवती महिलांना जिथे दाखल केले जाते, तो हा वॉर्ड होता. त्या वेळी त्या कक्षामध्ये वीस गर्भवती महिला दाखल होत्या. या सर्व वीस महिलांची प्रसूती पुढील काही तासांमध्ये होणे अपेक्षित होते. या सर्व महिलांकडे योग्य लक्ष पुरविण्याची जबाबदारी नर्स अंजली यांची होती. त्याचवेळी पहिल्या मजल्यावर असलेल्या या वॉर्डमध्ये असलेल्या अंजली कुलथे यांनी हॉस्पिटलमध्ये काहीतरी गदारोळ झाल्यासारखे वाटले. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्या खिडकीतून डोकावल्या असता, हॉस्पिटलच्या दोन चौकीदारांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले.
त्याचबरोबर हातामध्ये बंदुका घेतलेले दोन तरुणही त्यांना हॉस्पिटलच्या वरच्या मजल्याकडे येताना दिसले. हे तरुण दुसरे तिसरे कोणीही नसून, अजमल आमिर कसाब आणि अबू इस्माईल हे दोन अतिरेकी होते.
क्षणार्धात सर्व प्रकार अंजलीच्या लक्षात आला. या तरुणांना अँटीनेटल विभागामध्ये येण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने अंजलीने या विभागाकडे येणारे दरवाजे बंद करून घेतले. एव्हाना हे दोघे अतिरेकी झपाट्याने वरच्या मजल्याकडे धावत येत होते. त्यातील एका अतिरेक्याने अँटीनेटल विभागाच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यातील एक गोळी विभागातील एका आयाच्या हाताला चाटून गेल्याने ती जखमी झाली. आता मात्र वेळ घालवून उपयोग नव्हता. जर सर्व गर्भवती महिला आणि त्यांना होणाऱ्या अपत्यांचे प्राण वाचवायचे असतील तर काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते हे अंजलीने जाणले. सर्व गर्भवती महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या परिवारजनांना अंजलीने विभागाजवळच्या पँट्रीमध्ये हलविले.
तूर्तास तरी ही सर्व मंडळी सुरक्षित असल्याने अंजली विभागामध्ये परत आली. तेथे येऊन पोहोचलेल्या डॉक्टरांना घडल्या प्रकारची माहिती देत त्वरित पोलिसांना या बाबत सूचना देण्यास तिने सांगितले. त्यानंतर अंजली जखमी आयाला घेऊन कॅज्युअल्टी विभागात गेली आणि इथे त्या नर्सच्या जखमी हाताचे ड्रेसिंग केले. त्यावेळी रात्रीच्या दहाचा सुमार होता.
एव्हाना कामा हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेल्या पोलिसांना हॉस्पिटलच्या आत सहजासहजी प्रवेश मिळू नये यासाठी पोलिसांच्या दिशेने दोघा अतिरेक्यांनी हँड ग्रेनेड्स फेकण्यास सुरुवात केली. होणाऱ्या प्रत्येक धमाक्याबरोबर हॉस्पिटलची इमारतही हादरत होती. आणि त्याचवेळी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या आत, हॉस्पिटलचे कर्मचारी रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये हलवीत होते. हॉस्पिटलच्या आतमध्ये असलेल्या अतिरेक्यांनी अनेक डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवत बंदुकांच्या फैरी झाडणे सुरूच ठेवले होते. इतक्यात अंजलीसोबतच्या एका महिला रुग्णाला प्रसुतीच्या कळा सुरु झाल्या. आता मात्र खरोखरच मोठा बाका प्रसंग होता. महिलेची प्रसूती कोणत्याही वेळी होणार होती. तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास तिला आणि तिच्या पोटातील बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे अंजली आणि तिच्या सोबतच्या काही डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला लेबर रूममध्ये नेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मजल्यावरील एका लेबर रूममध्ये केवळ एका ट्यूब लाईटच्या प्रकाशामध्ये अंजली, काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी मिळून या गर्भारशी महिलेची सुखरूप सुटका केली.
कामा हॉस्पिटलमधे मृत्यूने थैमान घातले असतानाच एकीकडे मात्र अंजली, आणि तिच्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांनी काहीही करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचा जणू विडाच उचलला होता. यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही हे लोक मागेपुढे पहात नव्हते. सर्व रुग्णांसाठी मानवी ढाल बनून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी हे सर्वच जण चोख पार पाडत होते. रुग्णांचा थांगपत्ता अतिरेक्यांना लागू नये यासाठी या कर्मचाऱ्यांनी विविध विभागांमधले दिवे बंद करून टाकले, या विभागांकडे येणारे दरवाजे बंद केले, आणि शक्य तितक्या रुग्णांना वॉशरूम्स पासून पँट्री पर्यंत जमेल तितक्या ठिकाणी दडवून ठेवले. गोळीबाराचा आवाज, एक तासाभराचा अवधी उलटून गेल्यानंतरही शांत होत नव्हता. त्यावरून अतिरेकी अजूनही हॉस्पिटलमधेच असल्याचे समजून येत होते. त्यानंतर मात्र काही काळानंतर गोळीबाराचे आवाज थांबले. कसाब आणि खान या दोघांनी हॉस्पिटलमधून पलायन केले, पण जाण्यापूर्वी त्यांनी केलेल्या गोळीबारामुळे आणि फेकलेल्या हँड ग्रेनेड्समुले अनेक पोलीसकर्मी आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी जबर जखमी झाले होते. अनेकांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमधील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आणण्यात बारा तासांचा कालावधी उलटून गेला होता.
हळू हळू सर्व परिस्थिती जरी पूर्वपदावर आली असली, तरी त्यावेळी अंजली आणि तिच्यासमवेत हॉस्पिटलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आजही त्या भीषण रात्रीच्या आठवणी ताज्या आहेत. त्यांनी अनुभवलेल्या विलक्षण परिस्थतीच्या आणि गोळीबाराच्या आठवणींमुळे पुढे किती तरी काळ हे लोक अतिशय अस्वस्थ होत असत. अनेकांनी तर आपली रात्रीची शांत झोपही गमावली होती. त्या पायी अनेकांना सायकोलॉजिकल काउन्सेलरची मदतही घ्यावी लागली होती. या घटनेनंतर अंजली आणि इतर काही कर्मचारी काही काळ मानसिक दृष्ट्या अतिशय अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्यावर जास्त कामाचा दबाव पडणार नाही याची काळजी प्रत्येकजण घेत होता. सर्वांची मनस्थिती पूर्वपदावर येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला.
सुमारे महिन्याभराचा काळ उलटून गेल्यानंतर अंजलीला आर्थर रोड कारागृहामध्ये येण्यास सांगितले गेले. दहशतवादी हल्ले झाले, त्यावेळी कामा रुग्णालयामध्ये अंधाधुंद गोळीबार करीत असलेल्या अतिरेक्यांपैकी एकाची, म्हणजेच कसाबची ओळख पटविण्यासाठी तिला बोलाविले गेले होते. मुंबईमध्ये दाखल झालेल्या अतिरेक्यांपैकी केवळ कसाबच पोलिसांच्या तावडीत जिंवत सापडला होता. त्याची ओळख पटविण्यासाठी अंजलीला बोलावणे आले, आणि एका क्षणात तिच्या डोळ्यांसमोर ती काळरात्र पुन्हा एकदा उभी राहिली. कसाबची ओळख पटवून कामा हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांपैकी तो एक असल्याची साक्ष अंजलीला द्यायची होती. तिच्या मनावर असह्य दडपण होते. पण पोलिसांनी तिची समजूत काढून तिला साक्ष देण्यास राजी केले. अंजलीने कसाबला ओळखले, त्यावेळी कसाबच्या चेहऱ्यावर केवळ कुत्सित हसू होते. कसाबच्या चेहऱ्यावरले बेदरकार भाव पाहून अंजलीच्या मनामध्ये चीड उत्पन्न झालीच, पण त्याही पेक्षा जास्त तिचे मन, तिच्या आणि तिच्या परिवाराच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी व्याकूळ होत होते.
अखेरीस परिवाराचा विरोध असतानाही, कसाब विरोधात साक्ष देण्यास अंजली कोर्टात उभी राहिली. आपल्या गणवेशामध्ये उपस्थित असलेल्या अंजलीने अतिशय आत्मविश्वासाने, कोणत्याही दडपणाला बळी न पडता कसाबविरुद्ध साक्ष दिली. साक्ष संपवून जेव्हा अंजली कोर्टाच्या बाहेर आली, तेव्हा तिच्या धाडसाचे कौतुक अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील तिला 'सॅल्युट' करून केले
FORWARDED AS RECEIVED

25/11/2020

मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येने ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे का?

20/11/2020

ठाणे जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहणार.

19/11/2020

भारतीय वायू सेनेचा पाक व्याप्त काश्मिर मध्ये अजून एक सर्जिकल स्ट्राईक!

*गवळदेव*नरभक्षक बनली म्हणून ज्या ‘अवनी’ वाघिणीला प्रशासन गोळ्या घालून ठार मारते. त्याच महाराष्ट्रात वाघांना देवता मानून ...
19/11/2020

*गवळदेव*

नरभक्षक बनली म्हणून ज्या ‘अवनी’ वाघिणीला प्रशासन गोळ्या घालून ठार मारते. त्याच महाराष्ट्रात वाघांना देवता मानून त्यांची पूजा करण्याची प्रथा आजही मोठ्या उत्साहात जोपासली जात आहे. सिंधुदुर्गातील शेतकरी भात कापणीच्या सुरुवातीला निसर्गाबरोबर वाघाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करतात. सिंधुदुर्गच्या मातीत ही प्रथा ‘गवळदेव’ स्नेहभोजन म्हणून प्रसिद्ध आहे. कोकणात भात कापणी झाली की शेतकरी, गुराख्यानां वेध लागतात ते ‘गवळदेव’चे. गावाचा सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणारा व पर्यावरण पूरक जीवनाचे शिक्षण देणारे हे आगळेवेगळे स्नेहभोजनच म्हणावे लागेल. भगवान श्री कृष्णाने ही परंपरा सुरू केल्याचे सांगितले जाते. आज घरोघरी गुरांची संख्या फार कमी होत असली तरी मालवणसह सिंधुदुर्गात ही ‘गवळदेव’ परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जात आहे. वाडी- वस्ती लगत जंगलात, डोंगराळ भागात पाणवठयाच्या ठिकाणी हा उत्सव प्रामुख्याने होतो. सर्व गुराखी, शेतकरी,लहान थोर मंडळी गवळदेवाच्या स्थानची साफ़सफाई करतात. तुळशी वृंदावनाची डागडुजी केली जाते. तेथील देव देवतांची पूजा अर्चा केली जाते. मातीचा वाघोबा तयार केला जातो व त्याची पूजा केली जाते. नंतर डाळ, भात,भाजी, खीर असे जेवण तयार करून तेथील देवदेवता, गवळदेव, वाघोबा, यांना नेवैद्य दाखविला जातो. नंतर सर्व गुराखी, शेतकरी, लहान मुले एकत्र केळीच्या पानावर जेवण घेऊन एकत्र बसून सामूहिक वनभोजनाचा आस्वाद घेतात व आनंद लुटतात.निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. म्हणूनच कुठलेही काम, व्यवसाय निसर्गपूरक असावा अशी शिकवण भारतीय संस्कृती देते. भारतातील सर्व उत्सव प्रथा-परंपरा हे पर्यावरण स्नेही आहेत. पाण्यात राहून माशाशी वैर करणे उचित नव्हे तसेच जंगलात वावरायचं, तर जंगली प्राण्यांशी वैर पत्करून कसं चालेल…? जंगलात चरणारी गाई- गुरे व गुराख्याचे जंगली पशूं पासून संरक्षण व्हावे, यासाठी निसर्ग देवतेला व जंगलाच्या वाघाला साकडं घालण्याचा गवळदेव हा कार्यक्रम. आम्ही तुझ्या जंगल भागात येत नाही. तू ही आमच्या पाळीव जनावरांचे संरक्षण कर त्यांच्यावर हल्ला करू नको. असे साकडे जणू वाघाला या निमित्ताने घातले जाते. सगळ्या गुराढोरांचे रोगराई व हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी व धनधान्य, दुग्धजन्यउत्पादनाच्या बरकती साठी देवाकडे साकडे घातले जाते तेथील देवतेचा कैल घेतला जातो. प्रतिकात्मक वाघाची पिटाई (पळवून लावत) करून या कार्येक्रमाची सांगता होते. निसर्गासोबत सहभोजन घेण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा वसा आणि वाघाला देव मानण्याची परंपरा हे गावचे गावपण टिकवून ठेवण्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य होय.
Forwarded from Whatsapp Group

Address

THANE
Thane
400606

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपले ठाणे - Aaple Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आपले ठाणे - Aaple Thane:

Share