झेप प्रतिष्ठान

झेप प्रतिष्ठान समाजातील दुर्बल घटकांसाठी झटणारी सामाजिक संस्था...झेप प्रतिष्ठान..

काल दिनांक 26एप्रिल रोजी झेप प्रतिष्ठान  तर्फे मुरबाड येथील भिमाद्री विद्यालयातील मुलाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात...
27/04/2026

काल दिनांक 26एप्रिल रोजी झेप प्रतिष्ठान तर्फे मुरबाड येथील भिमाद्री विद्यालयातील मुलाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

या आरोग्य शिबिरासाठी डॉ. अभिजीत मोकल, डॉ Prajakta Lade , डॉ Deipak K , Siddhant Murlidhar Bochare आणि योग शिक्षिका सोनल देठे तसेच शाळेचे शिक्षक श्री तुकाराम सर उपस्थित होते.

मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा झेप प्रतिष्ठान तर्फे योग्य ती काळजी घेतली जाते.. या उपक्रमासाठी तसेच मुलांना लागणाऱ्या औषधासाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार..

सुट्टीचा दिवस असूनही कुटुंबासोबत घालवता येणारा वेळ आमच्या डॉक्टरांनी या मुलांसाठी दिला त्याबद्दलही त्यांचे मनापासून कौतुक आणि आभार..

आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि मनोरुग्ण असलेल्या मुलीसाठी झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्यात आली..! झेप प्रतिष्ठान ...
15/04/2026

आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि मनोरुग्ण असलेल्या मुलीसाठी झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्यात आली..!

झेप प्रतिष्ठान
झेप प्रतिष्ठान_Zep Pratishthan

झेप प्रतिष्ठानतर्फे वडील गमावलेल्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत करण्यात आली.. !दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार.. झेप प्रतिष...
15/04/2026

झेप प्रतिष्ठानतर्फे वडील गमावलेल्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत करण्यात आली.. !

दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार..

झेप प्रतिष्ठान
झेप प्रतिष्ठान_Zep Pratishthan

|| छत्रपती शिवाजी महाराज जयंती उपक्रम ||दरवर्षी  प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती संभाजी नगर येथील कु...
19/02/2026

|| छत्रपती शिवाजी महाराज जयंती उपक्रम ||

दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती संभाजी नगर येथील कुत्तरवाडी तालुका पाथर्डी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने मॅरेथॉन स्पर्धेसाठी झेप प्रतिष्ठान तर्फे टी शर्ट वाटप करण्यात आले.

यासाठी Umesh Chhabubai Madhukar Sonawane सरांचे मोलाचे सहकार्य लाभले..

झेप प्रतिष्ठान
झेप प्रतिष्ठान_Zep Pratishthan

डिजिटल शिक्षणाकडे एक पाऊल पुढे! झेप प्रतिष्ठान तर्फे सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – पानास / विवर / कावड...
09/02/2026

डिजिटल शिक्षणाकडे एक पाऊल पुढे!

झेप प्रतिष्ठान तर्फे सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – पानास / विवर / कावडी / भोगवली या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर वाटप करण्यात आले.

या उपक्रमाच्या वेळी झेप प्रतिष्ठानचे सदस्य श्री. संदीप गोळे व श्री. किरण गोळे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कॉम्प्युटरचा योग्य व सुरक्षित वापर, शैक्षणिक अभ्यास, माहिती शोध, डिजिटल कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी,हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

झेप प्रतिष्ठानचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच मैलबिंदू ठरेल. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे मनापासून आभार!

आपलाच,
विकास धनवडे
(झेप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)
9700712020

झेप प्रतिष्ठान
झेप प्रतिष्ठान_Zep Pratishthan

|| झेप प्रतिष्ठान - डिजिटल लिटरसी प्रोजेक्ट 2026 ||आज झेप प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १७ जिल्हा प...
01/02/2026

|| झेप प्रतिष्ठान - डिजिटल लिटरसी प्रोजेक्ट 2026 ||

आज झेप प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १७ जिल्हा परिषद शाळांना कॉम्प्युटरचे वाटप करण्यात आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन जग वेगाने पुढे जात असताना, आजही दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत संगणक शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. ही दरी कमी करण्याच्या दृष्टीने झेप प्रतिष्ठानचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि काळाची गरज ओळखणारा आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहान वयातच संगणकाची ओळख, टायपिंग, इंटरनेटचा योग्य वापर, शैक्षणिक अ‍ॅप्स, ऑनलाइन माहिती शोधण्याची सवय तसेच डिजिटल साक्षरतेचे प्राथमिक धडे मिळणार आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात हे ज्ञान केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता, भविष्यातील करिअरच्या संधींसाठीही भक्कम पाया घालणारे ठरेल अशी आशा शाळा प्रतिनिधींनी व्यक्त केली.

या उपक्रमासाठी झेप प्रतिष्ठान सदस्य Yogesh Khakam , Sameer Kadam DrManoj Tarachand Kadam Anil Autade Archana Autade Sandip Gole Devanand Jadhav Santosh Utekar Deipak Siddhant Murlidhar Bochare dr. abhijit mokal, Mitul Talegaonkar dr. Kalpesh Sheth

तसेच या उपक्रमासाठी हॉल उपलब्ध करून देणारे श्री सुनील गद्रे यांचे मनपूर्वक आभार..
झेप प्रतिष्ठान
झेप प्रतिष्ठान_Zep Pratishthan

आपलाच,
विकास धनवडे
(झेप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)
9700712020

सामाजिक जाणिवेचा आदर्श — सौ. मानसी नारायण चक्रदेव व कुटुंबीयसौ. मानसी नारायण चक्रदेव (B.A.) यांचे 29 जानेवारी रोजी 75 वर...
31/01/2026

सामाजिक जाणिवेचा आदर्श — सौ. मानसी नारायण चक्रदेव व कुटुंबीय

सौ. मानसी नारायण चक्रदेव (B.A.) यांचे 29 जानेवारी रोजी 75 वर्षे वय पूर्ण झाले आणि त्या गृहिणी असूनही त्यांनी आयुष्यभर समाजासाठी आपले योगदान सातत्याने दिले आहे. मुक्ताई भजनी मंडळाच्या माध्यमातून भजनसेवा, महिला मंडळाची सक्रिय सदस्यता आणि सामाजिक उपक्रमांतील सहभाग यातून त्यांची सेवाभावना नेहमीच दिसून येते.

मानसीताई व त्यांचे पती श्री नारायण चक्रदेव यांनी देहदानाचा घेतलेला निर्णय हा समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वतःपलीकडे विचार करून पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारा हा निर्णय त्यांच्या व्यापक सामाजिक जाणीवेचे प्रतीक आहे.

झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांसाठी या दांपत्याने मनापासून देणगी देत महत्त्वाचे योगदान दिले आहे. “जमेल तशी मदत” ही त्यांची भूमिका असली, तरी शिक्षणासारख्या मूलभूत सामाजिक कार्यासाठी त्यांनी दाखवलेली उदारता अनेकांसाठी मार्गदर्शक ठरते. शिक्षणामुळे समाज घडतो, व्यक्ती सक्षम होते—हा विश्वास त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे.
अशा उदात्त उपक्रमांतून समाजाला हातभार लावण्याची वृत्ती प्रत्येकाने अंगीकारावी, हीच खरी शिकवण आहे.

मानसीताई व त्यांच्या कुटुंबीयांच्या या दातृत्वपूर्ण योगदानातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी, आणि आपल्या परीने समाजहिताच्या कार्यात सहभागी व्हावे—हीच त्यांच्या कार्याला खरी सलामी ठरेल.

झेप प्रतिष्ठान
झेप प्रतिष्ठान_Zep Pratishthan

आपलाच,
विकास धनवडे
(झेप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)
9700712020

Heartiest Congratulations! 🎉Proud moment for all of us at Zep Pratishthan 👏Warm congratulations to Dr. Abhijeet Mokal Ab...
28/12/2025

Heartiest Congratulations! 🎉

Proud moment for all of us at Zep Pratishthan 👏

Warm congratulations to Dr. Abhijeet Mokal Abhijeet Mokal on being honoured with the prestigious Maharashtra Gaurav Puraskar 2024 for his outstanding contribution to social service.

As a committed Zep Pratishthan NGO volunteer, Dr. Mokal has consistently demonstrated compassion, dedication, and a deep sense of responsibility towards society. This well-deserved recognition reflects his tireless efforts to make a meaningful difference beyond his professional commitments.

We are truly proud of this achievement and wish him continued success and strength in his journey of service to humanity. 🌟🙏




Zep members are not only creating meaningful social impact but also shining at their workplaces! 👏✨We are delighted to s...
17/12/2025

Zep members are not only creating meaningful social impact but also shining at their workplaces! 👏✨

We are delighted to share that Zep volunteer Mr. Hemant Pawar Hemant Pawar has been recognised with the prestigious Employee of the Year Award at his organisation. 🥇
Heartiest congratulations, Hemant! Keep up the great work. 💐💐💐

We are equally proud to announce that Mrs. Archana Shinde Archana Phadtare - Shinde has been honoured with two distinguished awards — Agility Champion and Commitment Value Champion. 🏆✨
Congratulations, Archana! Your dedication and excellence truly inspire us. 💐💪👏

Balancing professional responsibilities, personal life, and social work is never easy. Yet, the volunteers at Zep Pratishthan do it exceptionally well. Their consistent success is a true reflection of the selfless social service they have been contributing for many years. 🌱🙏

Let us all congratulate Hemant and Archana on this wonderful achievement and wish them continued success in all their future endeavours! 🎉✨




















|| आभारपत्र ||झेप प्रतिष्ठानच्या डिजिटल लिटरसी प्रोजेक्ट 2025 अंतर्गत कॉम्प्युटर्स वाटप करण्यात आलेल्या शाळेकडून आभारपत्...
27/11/2025

|| आभारपत्र ||

झेप प्रतिष्ठानच्या डिजिटल लिटरसी प्रोजेक्ट 2025 अंतर्गत कॉम्प्युटर्स वाटप करण्यात आलेल्या शाळेकडून आभारपत्र मिळाले. या उपक्रमाचा उपयोग करून डिजिटल दुनियेत दुर्गम भागातील मुलांनी झेप घ्यावी ही अपेक्षा.

या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार..

झेप प्रतिष्ठान

Address

Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when झेप प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to झेप प्रतिष्ठान:

Share