Hrishikesh Tayde Official

Hrishikesh Tayde Official अध्यक्ष - ठाणे शहर शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)🚩
जनसेवा, विकास आणि न्यायासाठी सदैव तत्पर

वरळी विधानसभेचे आमदार व माजी पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂Aaditya Thacker...
13/06/2026

वरळी विधानसभेचे आमदार व माजी पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे

10/06/2026

ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागातील आगीची सीआयडी चौकशी करा – शेकाप ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी**

ठाणे

ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील शहर विकास (नगररचना) विभाग कार्यालयात दिनांक ८ जून २०२६ रोजी लागलेली आग ही अत्यंत गंभीर आणि संशयास्पद घटना असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

नगररचना विभाग हा विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, टीडीआर, आरक्षणे तसेच विविध महत्त्वपूर्ण प्रशासकीय कागदपत्रांशी संबंधित संवेदनशील विभाग आहे. त्यामुळे या विभागात आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसारमाध्यमांमधून काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणात आगीचे नेमके कारण काय होते, सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, कोणत्या कागदपत्रांचे नुकसान झाले, डिजिटल अभिलेख सुरक्षित आहेत का तसेच या घटनेचा सार्वजनिक हिताच्या बाबींवर काही परिणाम झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे ऋषिकेश तायडे यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पुढील मागण्या केल्या आहेत :

• या आगीची सीआयडीमार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
• आगीचे कारण, नुकसानाचे स्वरूप आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तांत्रिक व फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी.
• आगीत प्रभावित झालेल्या सर्व कागदपत्रे, डिजिटल नोंदी व अभिलेखांचा तपशील सार्वजनिक करण्यात यावा.
• भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व महापालिकांमध्ये अभिलेख संरक्षण, डिजिटल बॅकअप आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे.
• चौकशी अहवाल निश्चित कालावधीत सार्वजनिक करण्यात यावा.

जनतेच्या करातून चालणाऱ्या संस्थांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकून राहण्यासाठी या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचेही ऋषिकेश तायडे यांनी नमूद केले असून राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

– *ऋषिकेश तायडे*
*अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) ठाणे शहर*

“विक्रम तर झाला… पण उत्तरं कुठे आहेत?”मोदीजींनी भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम केला. अभिनंदन!पण जनतेला ...
10/06/2026

“विक्रम तर झाला… पण उत्तरं कुठे आहेत?”

मोदीजींनी भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम केला. अभिनंदन!

पण जनतेला अजूनही वाट पाहावी लागतेय — एका खुल्या पत्रकार परिषदेसाठी.

लोकशाहीत प्रश्नांना सामोरं जाणं हे ताकदीचं लक्षण असतं, टाळण्याचं नाही.

#लोकशाही #शेकाप #ठाणे

ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागातील आग ही गंभीर व संशयास्पद घटना आहे.महत्त्वाच्या कागदपत्रांशी संबंधित विभागात आग लागल्...
09/06/2026

ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागातील आग ही गंभीर व संशयास्पद घटना आहे.

महत्त्वाच्या कागदपत्रांशी संबंधित विभागात आग लागल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष सीआयडी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

– ऋषिकेश तायडे
अध्यक्ष - ठाणे शहर (शेकाप)

PWPMaharashtra Jayant Patil Dr. Babasaheb Deshmukh - डॉ. बाबासाहेब देशमुख Balaram Dattatray Patil शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party Hrishikesh Tayde Prasad Salvi

जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, स्पष्टवक्ते आणि अभ्यासू नेतृत्व माजी विधानसभा अध्यक्ष व साकोली मतदार संघा...
05/06/2026

जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, स्पष्टवक्ते आणि अभ्यासू नेतृत्व माजी विधानसभा अध्यक्ष व साकोली मतदार संघाचे आमदार मा. नाना पटोले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभो. समाजकारण व लोकसेवेच्या आपल्या कार्याला अधिक बळ मिळो, ही सदिच्छा.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂
Nana Patole

🎉 Happy Birthday Brother, Ajaz khan! 🦁✨Wishing the most talented actor and a brother with a massive heart a truly blockb...
31/05/2026

🎉 Happy Birthday Brother, Ajaz khan!

🦁✨Wishing the most talented actor and a brother with a massive heart a truly blockbuster year ahead. May God bless you with unmatched success, roaring happiness, and great health, bhai.Have an absolute blast today! Keep shining like the superstar you are. 🙌❤️

21/05/2026

Address

Vartak Nagar
Thane
400606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hrishikesh Tayde Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category