04/05/2021
*९ मे मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन वेबिनार*
ठाणे:रोटरी क्लब ऑफ ठाणे व आगरी समाज मंडळ ठाणे परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि ९ मे २०२१ रोजी संध्या ४ ते ६ वा रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या फेसबुक पेजवर लाइव्ह https://www.facebook.com/Rotaryclubthane मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन वेबिनार आयोजित केले आहे.
या वेबिनार मध्ये मेजर सुभाष गावंड (१० वी / १२ वी पास / जवान पोस्ट) व कमांडर पटनाईक (पदवीधर / अधिकारी पद) यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे रोटरी ठाणे जिल्हा (३१४२ ) गवर्नर डॉ. संदीप कदम असणार आहेत.
सर्व १० वी / १२ वी पास आणि पदवीधर विद्यार्थी उमेदवारांनी मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन वेबिनारला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उल्हास वैद्य, अध्यक्ष ठाणे रोटरी क्लब, विजय गावंड, अध्यक्ष आगरी समाज मंडळ ठाणे परिसर. यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
संपर्क-९८२००४५१६५.
९८१९७०३८८८.