Vba अंबिका नगर न.२, ठाणे.

  • Home
  • India
  • Thane
  • Vba अंबिका नगर न.२, ठाणे.

Vba अंबिका नगर न.२, ठाणे. वंचित बहुजन आघाडी, ठाणे शहरातील विविध वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणारं आपलं माध्यम!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा. आशुतोष डुंबरे साहेब, पोलिस आयुक्त, ठाणे शहर यांस आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या रणध...
18/09/2025

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा. आशुतोष डुंबरे साहेब, पोलिस आयुक्त, ठाणे शहर यांस आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांकडून महापुरुषांच्या नावाने असलेले नामफलक, प्रतिमा, पुतळे इ. पक्षीय बॅनरद्वारे झाकून समाजविघातक कृत्य करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर प्रकरणी मा. पोलिस आयुक्त साहेब यांनी ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरीत कारवाई करण्यास सांगून भविष्यात असे कृत्य होऊ नये म्हणून महानगर पालिका व पोलिस प्रशासन यांच्याकरिता कारवाई संबंधित प्रकरणी पत्रक काढण्याचे निर्देश देण्यात आले.


राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर

10/09/2025

सम्यक विद्यार्थी आंदोलन आयोजित मुस्लिम विद्यार्थी स्कॉलरशिप परिषद, छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद).



राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर

अंबिका नगर नं.२, आझाद इंग्लिश शाळेजवळील नवीन बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय अनेक दिवसापासून किरकोळ कामामुळे रखडलेले अस...
06/09/2025

अंबिका नगर नं.२, आझाद इंग्लिश शाळेजवळील नवीन बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय अनेक दिवसापासून किरकोळ कामामुळे रखडलेले असल्याने सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. या गैरसोयीपायी नागरिकांनी हे सार्वजनिक शौचालय उद्घाटनापूर्वी वापरण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु सदर शौचालयात साफसफाई अथवा देखभाली करिता कोणतीही सोय ठा.म.पा प्रशासनाकडून करण्यात न आल्याने अस्वच्छता व घाण होत असल्याने रोगराई पसरण्याची वेळ आलेली आहे तसेच या शौचालयाचा वापर व्यसनी व गंजेडी कडून होत असल्याने असुरक्षेचे स्थिती निर्माण झाली आहे. तरी सदर प्रकरणी त्वरीत सार्वजनिक शौचालय स्थानिक नागरिकांच्या सोयीकरिता सुरू करण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग यास वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येत आहे.

अंबिका नगर नं. २, आज़ाद इंग्लिश स्कूल के पास बनाए गए नए सार्वजनिक शौचालय का काम छोटे-छोटे कार्यों के कारण कई दिनों से अधूरा पड़ा है, जिसके चलते आम नागरिकों को भारी असुविधा हो रही है। इस असुविधा के कारण नागरिकों ने इस सार्वजनिक शौचालय का उद्घाटन से पहले ही उपयोग करना शुरू कर दिया है। लेकिन इस शौचालय की सफाई या रख-रखाव के लिए प्रशासन की ओर से कोई भी ठोस व्यवस्था न किए जाने के कारण गंदगी और अस्वच्छता बढ़ रही है, जिससे बीमारियाँ फैलने की स्थिति पैदा हो गई है। साथ ही, इस शौचालय का उपयोग नशेड़ी और असामाजिक तत्वों द्वारा किए जाने से असुरक्षा की स्थिति भी उत्पन्न हो रही है। इसलिए, इस मामले में तुरंत यह सार्वजनिक शौचालय स्थानीय नागरिकों की सुविधा के लिए शुरू किया जाए, ऐसी मांग सार्वजनिक बांधकाम विभाग और घनकचरा व्यवस्थापन विभाग से वंचित बहुजन आघाड़ी की ओर से की जा रही है।



राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर

श्री साई दर्शन मित्र मंडळ, अंबिका नगर, ठाणे आयोजित गणेशोत्सव कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व समर्थक यांच्यावत...
01/09/2025

श्री साई दर्शन मित्र मंडळ, अंबिका नगर, ठाणे आयोजित गणेशोत्सव कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व समर्थक यांच्यावतीने दर्शनाकरिता सदिच्छा भेट!



राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर

आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांच्याकरवी तक्रार दाखल करण्यासाठी नारपोली पोलिस स्टेशन (भिवंडी) येथे भेट.           ...
24/08/2025

आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांच्याकरवी तक्रार दाखल करण्यासाठी नारपोली पोलिस स्टेशन (भिवंडी) येथे भेट.



राजू नारायण डावरे
सचिव- ठाणे शहर

16/08/2025

बाळासाहेबांचा कार्यकर्ता! ✊

13/08/2025

वंचित बहुजन आघाडीचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA)च्या भ्रष्ट कारभाराविरोधात
✊ जन आक्रोश मोर्चा ✊

Jayashri Mahendra Shinde

12/08/2025

साहेब...🔥

Jayashri Mahendra Shinde

09/08/2025

वंचित बहुजन आघाडीचे ४ वर्षे नागरिक सुरक्षितता दक्षतेचे!..
मागील अनेक वर्षापासून वागळे इस्टेट मधील अनेक कंपनी सुरक्षा बाबींसंबधित नियमावली, अटी व शर्तीचे उल्लंघन करीत सभोवतालच्या स्थानिक वस्त्या तसेच वंचित घटकात मोडणारा कामगार वर्ग यांना असुरक्षित वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे. ४ वर्षापूर्वी झालेल्या अग्नीतांडवच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीने या ज्वलंत प्रश्नी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत औद्योगिक वसाहतीच्या नजीकच्या वस्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे परंतु यापुढे अधिक ताकतीने व जोमाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ठाणे महानगर पालिका कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये कंपन्याकडून सुरक्षा नियमावलीची होत असलेल्या पायमल्लीच्या कारणास्तव सभोवतालच्या रहिवासी क्षेत्राला कायमस्वरूपी गंभीर अपघाताच्या छत्रछायेत राहण्याची वेळ आलेली आहे. वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे वंचित घटकातील कामगार व स्थानिक रहिवासी वस्त्या यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेटाने पुढाकार घेऊन ठा. म. पा. व MIDC प्रशासनास विकास नियंत्रण नियमावली (DCR), अतिक्रमण व अग्नी / कामगार सुरक्षा नियमाच्या संबंधित प्रशासकीय/कायदेशीर पाठपुरवठा करत त्यांना मिळणाऱ्या राजकीय आश्रयाच्या विरोधात पुढील काळात ठाम भूमिका घेत आहोत.

Jayashri Mahendra Shinde Sarvjeet Bansode Anil Narayan Jadhav

राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंबिका नगर नं. २ येथील शिवराय गल्ली मधील सार्वजनिक शौचालयाच्या नजीक कित्येक दिवसांपास...
08/08/2025

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंबिका नगर नं. २ येथील शिवराय गल्ली मधील सार्वजनिक शौचालयाच्या नजीक कित्येक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साठून परिसरात पसरत चालल्याने दुर्गंध व रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. परंतु संबंधित विभागाचे या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधितांनी या समस्याचे त्वरित निराकरण करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी पायाभूत नागरी सुविधांची अंमलबजावणी करून घ्यावयास कटिबद्ध आहे.

Jayashri Mahendra Shinde

राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर

अंबिका नगर नं. २, ठाणे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) चे विद्युत पॅनल मध्यभागी स्थापित असल...
07/08/2025

अंबिका नगर नं. २, ठाणे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) चे विद्युत पॅनल मध्यभागी स्थापित असल्यामुळे स्थानिकांना अडचणीला जावे लागत होते तसेच नजीकच आझाद इंग्लिश स्कूलचा परिसरात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने अपघात किंवा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. सदर प्रकरणी तक्रार अर्जावर ठाणे महानगरपालिका व MSEDCL यांनी तत्परतेने सदर तक्रारीची दखल घेत निवारण केल्याबद्दल धन्यवाद!..

अंबिका नगर नं. २, ठाणे में महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) का विद्युत पैनल बीच सड़क पर स्थापित होने के कारण स्थानीय लोगों को परेशानियों का सामना करना पड़ रहा था। साथ ही, पास ही स्थित आज़ाद इंग्लिश स्कूल के परिसर में छात्रों की आवाजाही अधिक होने के कारण दुर्घटना या किसी अनुचित घटना की संभावना बनी हुई थी। इस संदर्भ में की गई शिकायत पर ठाणे महानगरपालिका और MSEDCL ने तत्परता से संज्ञान लेते हुए समाधान किया, इसके लिए धन्यवाद!

05/08/2025

आमच्या नगरचा उकिरडा करून ठेवणाऱ्यांनो कुठं नेऊन ठेवलाय आमचा विकास?
ठाणे महानगरपालिका?
नगरसेवक?
प्रस्थापित पक्षांनो?
कुठंय आमच्या सुविधा... गटारीचे पाण्यात चालायची सुखसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमच्या निष्क्रियतेला सलाम!..
Jayashri Mahendra Shinde Mahendra Shinde

राजू नारायण डावरे
सचिव-ठाणे शहर

Address

Ambika Nagar No. 2, Thane(W)
Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vba अंबिका नगर न.२, ठाणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share