22/05/2026
जेंव्हा कारागृहात
आयुष्मान पोहोचते...
आज नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांसाठी 'आयुष्मान भारत कार्ड' उद्घाटन व वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या घटकापर्यंत हक्काचे आरोग्य कवच पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेला उपस्थित राहून या उपक्रमाचा आढावा घेतला. तसेच यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामाचा गौरव केला. आयुष्मान ही लोकाभिमुख योजना कल्पनेच्या पुढे जाऊन कारागृहातील बंदिवांनासाठी आरोग्यकवच ठरणार आहे.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आयुष्मान भारत योजनेची व मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या आरोग्यविषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करताना समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. या कार्यक्रमात तुरुंग व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अधीक्षक श्री. प्रमोद वाघ, उप अधीक्षक श्री. गोविंद राठोड, उप अधीक्षक श्री. महादेव पवार, उप अधीक्षक श्री. जितेंद्र काळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सर्वश्री सचिन झिंझोर्डे आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) व आयुष्मान भारतचे रायगड जिल्हा प्रमुख श्री. समरेश शेळके, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल पाटील, जिल्हा पर्यवेक्षक श्री. विजय घरत आणि आरोग्यमित्र यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग घेतला. कारागृह व पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त समन्वयातून बंदिवानांना आवश्यक आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.