MLA Devendra Rajesh Kothe

MLA Devendra Rajesh Kothe आमदार - २४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा,महाराष्ट्र

MLA - 249 Solapur City Central Assembly Maharashtra
(1)

06/09/2026

भक्ती आणि विकासाचा संगम — ₹३६ लाख ५८ हजारांच्या निधीतून सभामंडपाची उभारणी!

प्रभाग क्रमांक २१ येथील राजेशकुमार मनपा कर्मचारी वसाहत परिसरातील गणेश मंदिर व हनुमान मंदिर येथे ₹३६ लाख ५८ हजार रुपयांच्या विकास निधीतून सभामंडप उभारण्यात येणार आहे. या सभामंडपाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव, भजन-कीर्तन तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांसाठी नागरिकांना हक्काची आणि सुसज्ज जागा उपलब्ध व्हावी, तसेच परिसरातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि भक्तगणांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे.

श्रद्धास्थानांचा विकास आणि नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल सातत्याने सुरू आहे.

यावेळी नगरसेवक शिवाजी तात्या वाघमोडे, सात्विक बडवे, संगीता ताई जाधव, अक्षय अंजिखाने, गुरुशांत धूत्तरगांवकर, नागेश सरगम,धनराज आनंदानी, रविकांत कोळेकर, राजाभाऊ माने, महेश बनसोडे, नितीन भिसे, शशिकांत खेडकर, राघवेंद्र सावळगी, संतोष हालकुडे, राहुल म्हेत्रे, वासुदेव कुलकर्णी, सिद्राम म्हेत्रे, नवनाथ इंगळे, किरण हुच्चे तसेच श्री गणेश-हनुमान भक्त तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#प्रभागक्रमांक२१ #सभामंडप #विकासकामे #भूमिपूजन #गणेशमंदिर #हनुमानमंदिर #जनसेवा #विकासाचीवाटचाल

प्रभाग क्रमांक २१ येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमच्या सहकारी सौ. सुवर्णा तोटुंगल (दास मॅडम) यांच्या निवा...
06/09/2026

प्रभाग क्रमांक २१ येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमच्या सहकारी सौ. सुवर्णा तोटुंगल (दास मॅडम) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी परिवारातील श्री. सतीश बेलसुरे, सौ. आरती बेलसुरे, अर्चना बंडगर, ममता संघावार, किरण शिवसिंगवाले, श्रीकांत वंजारी यांच्यासह मनमोकळा संवाद साधला.

यावेळी नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक शिवाजी तात्या वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेवक अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, राजाभाऊ माने, निशिकांत खेडकर, रविराज वाघमोडे, राज जगताप आदी उपस्थित होते.

तसेच मीरा सोसायटी येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व उद्योजक श्री. धनराज आनंदानी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अमित आनंदानी, यतीन आनंदानी, नगरसेवक सात्विक बडवे, महेश बनसोडे उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांवर चर्चा करणे हीच आपल्या सार्वजनिक जीवनाची खरी ताकद आहे.
Kothe Devendra Rajesh

#प्रभाग21 #सोलापूर #भाजपा #जनसंवाद #सोलापूरविकास

कार्यकर्त्यांच्या भेटीतून संवाद, समस्या जाणून घेण्यासह विकासाचा संकल्प!प्रभाग क्रमांक १३ येथे विकासकामांच्या शुभारंभानंत...
06/09/2026

कार्यकर्त्यांच्या भेटीतून संवाद, समस्या जाणून घेण्यासह विकासाचा संकल्प!

प्रभाग क्रमांक १३ येथे विकासकामांच्या शुभारंभानंतर परिसरातील आमचे ज्येष्ठ पदाधिकारी व अनेक वर्षांपासून पूर्व भागात पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणारे यादगिरी बोम्मा काका यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी परिवारातील सदस्यांशी मनमोकळा संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्ते श्री. सदानंद अण्णा गुंडेटी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी यंत्रमागधारक उद्योजक बांधवांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायातील अडचणी, समस्या व विविध प्रश्न जाणून घेतले.

सोलापूरच्या पारंपरिक यंत्रमाग व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, उद्योजकांना सक्षम करून शहराचे हरवलेले औद्योगिक व आर्थिक गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी केला.

यावेळी महापौर श्री विनायक दादा कोंड्याल, नगरसेवक श्री सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, प्रशांत पल्ली, राजमहेंद्र कमटम,यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, लेबर फेडरेशनचे शंकर चौगुले, श्रीनिवास गाली,राजकुमार गुजर, तसेच बोम्मा व गुंडेटी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
Kothe Devendra Rajesh

#प्रभाग13 #सोलापूर #भाजपा #कार्यकर्ते #यंत्रमागउद्योग #सोलापूरचेगतवैभव

श्रीकृष्ण जयंती ब्रह्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न! भावनाऋषी पेठेतील श्रीकृष्ण देवस्थान येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आ...
05/09/2026

श्रीकृष्ण जयंती ब्रह्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न!

भावनाऋषी पेठेतील श्रीकृष्ण देवस्थान येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित श्रीकृष्ण जयंती ब्रह्मोत्सवास उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णांची मनोभावे पूजा-अर्चना केली व दर्शन घेतले.

नारळी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या ‘दशावतार दस दिन महोत्सवा’ची आज गोपाळकाल्याच्या पवित्र दिवशी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सत्कार स्वीकारला तसेच उपस्थित भाविकांशी मनमोकळा संवाद साधला.

भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करताना सोलापूर शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी मंगलकामना केली. श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने समाजात प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना अधिक दृढ होवो, हीच प्रार्थना!

याप्रसंगी श्रीकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष श्री. मधुकर येमुल, लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, माजी स्थायी समिती सभापती राजमहेंद्र कमटम, श्रीनिवास गाली, गोवर्धन कमटम, केशव चाटला, विजय कमटम, लक्ष्मीकांत चाटला, रायमल्लू कमटम, रविंद्र रच्चा, राजमोगली कमटम, मोहन कमटम, रवी कमटम, श्रीकांत कमटम, पवनकुमार येमुल आदी उपस्थित होते.

जय श्रीकृष्ण!

#श्रीकृष्ण #जन्माष्टमी #गोपाळकाला #श्रीकृष्णदेवस्थान #श्रीकृष्णजयंती

॥ ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ॥पवित्र श्रावण मासातील शेवट...
05/09/2026

॥ ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ॥

पवित्र श्रावण मासातील शेवटच्या शनिवारी पूर्व भागातील श्री लक्ष्मीनरसिंह मंदिरात सहपरिवार जाऊन भगवान श्री लक्ष्मीनरसिंहांची विधिवत पूजा-अर्चना करून मनोभावे दर्शन घेतले.

भगवान श्री नरसिंहांच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.

यावेळी शंकर अण्णा चौगुले, रायमल्लू कमटम काका, मंदिराचे ट्रस्टी व विश्वस्त व्यंकटेश पुंजाल, अध्यक्ष श्रीनिवास पासकंटी, राजेशाम उयाला, जनार्दन बलपुरी, प्रकाश काशेट्टी, भास्कर गाजुल, दत्तात्रय चिप्पा, रवींद्र गाजरला, गणेश गोली, चैतन्य सादुल यांच्यासह मंदिरातील पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते.

श्री लक्ष्मीनरसिंह गोविंदा...गोविंदा!
Kothe Devendra Rajesh

#श्रीलक्ष्मीनरसिंह #श्रावणमास #श्रावणशनिवार #सोलापूर #हिंदुत्व

"आला रे आला गोविंदा आला"दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!
05/09/2026

"आला रे आला गोविंदा आला"
दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!

समाजबांधवांशी आपुलकीचा संवाद… विकासकामांना गती!मोदी भागातील मोची समाजाचे ज्येष्ठ नेते तथा समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. सईद...
05/09/2026

समाजबांधवांशी आपुलकीचा संवाद… विकासकामांना गती!

मोदी भागातील मोची समाजाचे ज्येष्ठ नेते तथा समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. सईदप्पा जगडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तसेच आमचे सहकारी व मोची समाज युवक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. रतिकांत कमलापुरे यांच्या घरी भेट देऊन परिवारातील सदस्यांशी आपुलकीने संवाद साधला.

यावेळी मोची परिसरातील समाजबांधवांचे विविध प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. समाजाच्या अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचा विश्वास दिला.

यावेळी नगरसेवक ऋषिकेश मेट्रे, यल्लाप्पा कमलापुरे, रुपेश जक्कल, सोनू खरात, संजय जगडेकर, दत्तू असादे, बाबू कमलापुरे, विठ्ठल मेट्रे, श्याम म्हेत्रे, नरसिंग आम्लेकर, तीमराव खानापुरे आदी उपस्थित होते.
Kothe Devendra Rajesh

#प्रभाग17 #मोचीसमाज #समाजसंवाद #विकासकामे #भाजपा

प्रभाग क्रमांक १७ | आपुलकीच्या भेटीगाठी!प्रभाग क्रमांक १७ येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी गेलो असता जांबमुनी मोची समाजा...
05/09/2026

प्रभाग क्रमांक १७ | आपुलकीच्या भेटीगाठी!

प्रभाग क्रमांक १७ येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी गेलो असता जांबमुनी मोची समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी स्थायी समिती सभापती तथा भाजपा शहर उपाध्यक्ष श्री. देवेंद्र भंडारे साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.

तसेच पक्षातील आमचे सहकारी श्री. अनंत गोडलोलू यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवारातील सदस्यांशी आपुलकीने संवाद साधला.

विकासकामांसोबतच कार्यकर्ते आणि नागरिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद हीच आमच्या वाटचालीची खरी ताकद!
Kothe Devendra Rajesh

#प्रभाग17 #भाजपा #कार्यकर्तासंवाद #सोलापूर

Address

Solapur

Telephone

+919881567777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MLA Devendra Rajesh Kothe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MLA Devendra Rajesh Kothe:

Shortcuts

Share