CPI Solapur

CPI Solapur भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा

06/04/2026
🟥 कॉम्रेड व्यंकप्पा मडूर स्मृतिदिन कार्यक्रम 🟥भारतीय कम्युनिस्ट पक्ष, साखर पेठ — सोलापूर यांच्या वतीनेकॉम्रेड व्यंकप्पा ...
12/10/2025

🟥 कॉम्रेड व्यंकप्पा मडूर स्मृतिदिन कार्यक्रम 🟥

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, साखर पेठ — सोलापूर यांच्या वतीने
कॉम्रेड व्यंकप्पा मडूर यांच्या स्मृतिदिन निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आदरपूर्वक पार पडला.

या प्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी आणि नागरिकांनी
कॉम्रेड मडूर यांच्या जाज्वल्य कार्याची आठवण करून
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

✊ “कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणाऱ्या त्या योद्ध्यास लाल सलाम!” ✊

🟥 कॉम्रेड व्यंकप्पा मडूर यांचे कार्य थोडक्यात 🟥

कॉम्रेड व्यंकप्पा मडूर हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निष्ठावान, तळमळीचे आणि लोकहितैषी कार्यकर्ते होते.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार, शेतकरी आणि गरीब जनतेच्या हक्कांसाठीच्या संघर्षाला अर्पण केले.

ते सोलापूर कामगार चळवळीचे सक्रीय संघटक होते आणि अन्यायाविरुद्ध नेहमी अग्रभागी उभे राहिले.
त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मजूर आंदोलने, संप आणि जनजागरण मोहिमा यशस्वीरीत्या पार पडल्या.

त्यांचे विचार, संघर्ष आणि त्याग आजही नव्या पिढीला समानता, न्याय आणि समाजवादाच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देतात.

✊ लाल सलाम कॉम्रेड व्यंकप्पा मडूर! ✊

🚩🔥 जनतेचा विजय – दडपशाहीवर घाव! 🔥🚩आज दिनांक 10/09/2025 रोजी जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी काढण्यात आल...
10/09/2025

🚩🔥 जनतेचा विजय – दडपशाहीवर घाव! 🔥🚩

आज दिनांक 10/09/2025 रोजी जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी काढण्यात आलेला मोर्चा जनतेच्या उसळत्या सहभागामुळे प्रचंड यशस्वी ठरला!

📢 “जनतेची सुरक्षा – दडपशाही नव्हे!”
📢 “अन्यायाविरुद्ध जनता उठली आहे!”

🔴 उपस्थित लढवय्ये :
✨ कॉ. राजेंद्र करली
✨ कॉ. विक्रम तडकापल्ली
✨ कॉ. लता तडकापल्ली
✨ कॉ. सुवर्णा गोली

🔥 ही लढाई केवळ कायद्याविरुद्ध नाही, तर लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे!

✊ जनता एकजूट आहे – विजय आपलाच आहे!

#जनतेचा_विजय #जनआंदोलन #लोकशाहीची_लढाई #जनसुरक्षा

🚩 शाहीर अमर शेख स्मृती दिन 🚩🎤 जनतेचा आवाज… कामगार–शेतकऱ्यांचा शाहीर…कॉम्रेड अमर शेख यांच्या गीतांतून अन्यायाविरुद्ध लढण्...
29/08/2025

🚩 शाहीर अमर शेख स्मृती दिन 🚩

🎤 जनतेचा आवाज… कामगार–शेतकऱ्यांचा शाहीर…
कॉम्रेड अमर शेख यांच्या गीतांतून अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद जनतेला मिळाली.

🌾 त्यांनी गाण्यांतून शोषित–पीडितांचा आक्रोश मांडला,
✊ साम्यवाद व सामाजिक न्यायाची मशाल पेटवली,
🚩 आणि जनतेला संघटित करून लढ्याची प्रेरणा दिली.

आज त्यांच्या स्मृती दिनी त्यांना लाल सलाम!
🙏🚩 लाल सलाम कॉम्रेड अमर शेख! 🚩🙏

#स्मृतिदिन #जनतेचाशाहीर

The CPI announces with profound grief the passing of our beloved former General Secretary, Comrade S. Sudhakar Reddy.Bor...
22/08/2025

The CPI announces with profound grief the passing of our beloved former General Secretary, Comrade S. Sudhakar Reddy.

Born in 1942, Comrade Sudhakar dedicated his entire life to the struggles of the working class and the downtrodden, serving as CPI General Secretary from 2012 to 2019 and representing Nalgonda twice in the Lok Sabha.

A lifelong fighter for the people, he will be remembered for his humility, clarity, and unwavering commitment to the CPI & the Left movement.

Red Salute, Comrade. You will live forever in our struggles!

आज पुज रे बैलाले फेड उपकाराचे देनबैला, खरा तुझा सण शेतकऱ्या तुझं रीन!शेतकरी राजास बैलपोळा सणाच्या हार्दिक सदिच्छा ! #बैल...
22/08/2025

आज पुज रे बैलाले फेड उपकाराचे देन
बैला, खरा तुझा सण शेतकऱ्या तुझं रीन!

शेतकरी राजास बैलपोळा सणाच्या हार्दिक सदिच्छा !

#बैल_पोळा #पोळा #शेतकरी #बळीराजा

मुंबईत आज आझाद मैदानावर पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी आणि इस्रायल कडून सुरू असलेल्या नरसंहाराचा तीव्र निषेध करण्यासाठी...
20/08/2025

मुंबईत आज आझाद मैदानावर पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी आणि इस्रायल कडून सुरू असलेल्या नरसंहाराचा तीव्र निषेध करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेला विविध राजकीय पक्षांसह सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

सभेमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे, पक्षाचे मुंबईतील ज्येष्ठ नेते कॉ. प्रकाश रेड्डी आणि मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे यांनी विचार मांडले. इस्रायलने गाझामध्ये चालविलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करताना त्यांनी पॅलेस्टाईनच्या जनतेशी एकात्मता व्यक्त केली.

गाझातील निर्दोष नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांकडे जगाने डोळेझाक करणे हा मानवतेवरील सर्वात मोठा अपमान आहे. शांततेसाठी आणि न्यायासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत, या संघर्षात पॅलेस्टाईनच्या जनतेसोबत ठाम उभे राहण्याची भूमिका सभेमधून अधोरेखित करण्यात आली.

भाकप, माकप, शेकाप यांच्या वतीने आयोजित या सभेला सीपीआय एम एल लिबरेशन, समाजवादी पार्टी पक्ष, कॉग्रेस, राष्ट्रवादीचे नेते व विविध मान्यवर उपस्थित होते.

Address

Solapur
413005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CPI Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share