महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना

  • Home
  • India
  • Solapur
  • महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना सहकार्यातून समृद्धीकडे

पावसात कोणीही मोटर चालू अथवा बंद करण्यास बाहेर पडू नये
26/09/2025

पावसात कोणीही मोटर चालू अथवा बंद करण्यास बाहेर पडू नये

📢 भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दि.२०ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा(अंगणवाडी...
20/08/2025

📢 भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दि.२०ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा(अंगणवाडी, प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक, महाविद्यालये)बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत
नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे

12/01/2025

*कर्मचारी मित्रांनो नमस्कार.......*
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP 5825 वतीने आपणास माहितीस्तव सादर करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बांधव यांचे ऑक्टोंबर महिन्यांपर्यंतचे पेमेंट सुरळीतपणे मिळालेले आहे. काही कर्मचारी यांचे काही महिन्याचे वेतन थकीत आहेत. ही मात्र सत्यताच आहे. ग्रामपंचायत कर्मचारी यांचे होत असलेले पेमेंट राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान पुणे यांच्याकडून मात्र ते आता जिल्हा परिषद ते पंचायत समितीच्या स्तरावर पोहोचलेले आहे. जिल्हा परिषद,पंचायत समितीला आपले वेतन पोहोचल्यानंतर शासन मात्र विविध पत्राच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन असो, कर्मचाऱ्यांचा एकोणीस महिन्याचा नऊ महिन्याचा फरकाची रक्कम असो, कर्मचारी यांची 16 वित्त आयोगाची माहिती असो, एरियस मध्ये मिळालेली कमी जास्त रक्कम असो, याकरिता एक ना अनेक पत्र शासनाने काढून प्रश्न मिटविण्याचा सतत प्रयत्न करीत आहे.
शासन स्तरावर या सर्व गोष्टी पत्राद्वारे होत असताना आपण कर्मचारी म्हणून ग्रामपंचायत स्तरावरून ते जिल्हा स्तरापर्यंत आपण काय माहिती शासनास सादर केली. स्वतःचं पेमेंट बाबत स्वतःला काळजी असायला हवी का नाही. आपण आपल्या पेमेंट बाबत किती गंभीर आहोत याची आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपले वेतन पंचायत समिती ते जिल्हा परिषद स्तरावर होत असताना कर्मचारी म्हणून आपल्याला संघटनेने निवडलेल्या जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी ते ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आपापल्या पद्धतीने पाठपुरावा करून शासनाच्या पत्रात ग्रामपंचायत स्तरावरून माहिती उपलब्ध करून देणे, ही आपली जबाबदारी नाही का? सर्वांनी खालील मुद्द्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरून ते जिल्हा परिषद स्तरापर्यंत कधी पाठपुरावा केलात का याचे अवलोकन करणे फार गरजेचे आहे.
* शासनाने ग्रामपंचायत स्तरावर मागितलेली माहिती वेळेत देणे.
* एरियस संबंधाने मागितलेली माहिती प्रपत्रात भरून पंचायत समिती ते जिल्हा परिषद प्रशासनापर्यंत पाठपुरावा करणे
* 16 वा वित्त आयोगाची कर्मचाऱ्यांची माहिती वेळेत भरून देणे
* ग्रामपंचायत कर्मचारी यांचे चुकविलेले वेतन खाते व जीपीएफ खाते सुधारणा करणे.
* ग्रामपंचायत च्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून मागितलेली माहिती ग्रामपंचायत स्तरावर असून सुद्धा वेळेत सादर केले का याकडे गांभीयाने लक्ष देणे.
* थकीत पडलेल्या वेतनाची माहिती प्रपत्र सादर करण्याकरता कळविले असता वेळेस सादर करणे
* वेतनाचा निधी जिल्हा परिषद ते पंचायत समिती स्तरावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होईल, याकरिता करावयाचा पाठपुरावा करणे
*
अशा एक ना अनेक प्रश्न वा शासन परिपत्रकाप्रमाणे पाठपुरावा आपण मात्र करीत नाहीत, आणि पगार नाही झाले याचा मात्र सर्व दोष मात्र शासनावर आपण ढकलून मात्र मोकळे होतो, ही मात्र सत्यता आहे.
शासन वा प्रशासणास दोषारोपण करण्यापेक्षा आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सतत फोन करण्यापेक्षा आपण आपली माहिती वेळेत प्रशासनास पोहचवली, तर सर्व कर्मचाऱ्यांचे नक्कीच वेतन वेळेत होण्यास प्रशासनास कुठलाही पडसर निर्माण होणार नाही.
करिता सर्व कर्मचारी बांधवांनी आपल्या स्तरावरील सर्व समस्या वेळेत पूर्ण करण्याकरिता सतत पाठपुरावा चालू ठेवून प्रशासनास सहकार्य करावा. माहिती वेळीच पाठवावा , संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना कळविण्यात येत आहे .
श्री. विलास कुमरवार,
संस्थापक तथा राज्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP 5825

अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त...
10/12/2024

अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळ े आता अर्जाची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर नियमबाह्यपण े अर्ज बाद केले जातील."

आदिती तटकरे
माजी महिला व बालकल्याण मंत्री

12/09/2024

मित्रांनो एरियस RGSA पुणे ला जमा झाले, केव्हा मिळेल अशी विचारणा आपणांकडून होत आहे..... या घडीला ग्रामविकास विभागाकडून 200 कोटी रुपये RGSA पुणे यांचेकडे जमा झालेले नाही, शनिवारी, रविवारी, सोमवारी व मंगळवारी मंत्रालयीन सुट्टी आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. RGSA पुणे यांचेकडे 200 कोटी रुपये पुढील आठवड्यात जमा होतील, त्यानंतर जिल्हा परिषद आले की मिळतील , पण त्याला सुद्धा वेळ लागेल, कोणत्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळाले किती बाकी आहेत , त्याची टक्केवारी किती ही माहिती जिल्हा परिषद कडे नाही, त्यामुळे ती माहिती घ्यायला वेळ लागेल , उदा- 5100 ₹ वेतन असेल सदर कर्मचारी 50% उत्पन्नात बसत असेल तर त्यांना यापूर्वी 2550 ₹ वेतन अनुदान मिळाला होता , सुधारित वेतन 11625₹ म्हणजेच 5813₹ - 2550 = 3263 ₹ x 19 महिने = आणि 200 कोटीचा हिशोब लावावे लागेल, कारण 19 महिन्याच्या फरकाकरिता 437.78 कोटी रुपये लागतात, यामुळे वेळ लागणार आहे , मला लिहायला 1 मिनिटं लागला , पण त्यांना माहिती गोळा करायला किती वेळ लागेल याचा आपणच विचार करावा....
विलास कुमरवार, राज्यध्यक्ष

20/06/2024
*मित्रांनो .... आपण दिनांक 1 जुलै 2024 रोजी विधानसभेवर भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहेत, राज्यातील मोठ्यासंख्येने ग्रामपं...
16/06/2024

*मित्रांनो .... आपण दिनांक 1 जुलै 2024 रोजी विधानसभेवर भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहेत, राज्यातील मोठ्यासंख्येने ग्रामपंचायत कर्मचारी आझात मैदान मुबंई येथे येणार आहेत...* पण काही अल्पसंतुष्ट नेत्यांनी आमचा संघटनेचा मोर्चा नाही, मोर्चाला जाऊ नका असे सांगून कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.., ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, व इतर मागण्या मंजूर होऊ नये, आपली फक्त संघटना सुरू असावी आणि आपला पोट भराव अशीच त्यांची इच्छा असावी असे वाटते. म्हणून हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे , *महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा एकच लक्ष वेतनश्रेणी हा असून , पूरक मागण्या सोबत ठेवलेल्या आहेत , राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या रास्त मागण्यांसाठी साठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने पुकारलेल्या 1 जुलै 2024 रोजीच्या मोर्चाद्वारे आंदोलन आयोजित केले असून राज्यातील तमाम कर्मचारी तुझा माझा न बघता 100% कर्मचारी उपस्थित राहणार आहेत , आम्ही विधानसभा, विधानपरिषद, मोर्चा आंदोलन, व हायकोर्टात केसेस इत्यादी व्दारे शासनावर दबाव आणून आपल्या मागण्यांसाठी आपली ताकत दाखवायची आहे , सर्व कर्मचारी यांना पुनःछ विनंती आहे की , ईतर संघटनेच्या अल्पसंतुष्ट नेत्यांनी आपल्या संघटनेचा मोर्चा नाही म्हणून दिशाभूल करीत आहेत, मोर्चा संघटनेचा नाहीतर राज्यातील 60 हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आहे , तेव्हा राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनंती आहे की दिनांक 1 जुलै 2024 रोजी होऊ घातलेल्या भव्य मोर्चाला, आपल्या न्याय हक्कासाठी आपण उपस्थित राहणार आहात... विलास कुमरवार , राज्याध्यक्ष .*

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या "थिमक्काने" लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा ४ कि.मी.पर्...
25/05/2024

दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या "थिमक्काने" लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा ४ कि.मी.पर्यंत चक्क २८४ वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय.
थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय.
प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर २८४ वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्कीच लावून वाढवू शकता.
#झाडे_लावा_झाडे_जगवा🌳🌳

बऱ्याच कर्मचारी यांना कमी वेतन मिळत असल्याने RGSA नी दखल घेतली आहे, ग्रामविकास विभागास मार्गदर्शन मागितले आहे.
08/05/2024

बऱ्याच कर्मचारी यांना कमी वेतन मिळत असल्याने RGSA नी दखल घेतली आहे, ग्रामविकास विभागास मार्गदर्शन मागितले आहे.

03/07/2023

*अत्यंत महत्त्वाचे*
*ग्रामपंचायत कर्मचारी पेमेंट प्रक्रिया* –
ग्रामपंचायतच्या कुशल ,अर्धकुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांचे माहे (*एप्रिल,मे प्रलंबित असलेले*)
व माहे जुन २०२३ PAY and PASS Process दिनांक: 03/07/2023 ते 05/07/2023 या कालावधीत चालू ठेवण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असलेल्या (माहे एप्रिल व मे ) या दोन्ही महिन्यासाठी पुन्हा PAY and PASS करावे.
*गटविकास अधिकारी* :-
दिनांक 06/07/2023 ते 07/07/2023 या कालावधीत गट विकास अधिकारी पं.स. सर्व यांनी डिजिटल स्वाक्षरीने वेतन अदायगी साठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्या लॉगिनला FORWARD करावे.
*उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)* यांनी दिनांक 08/07/2023 ते 09/07/2023 या वेळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी डिजिटल स्वाक्षरीने वेतन अदायगी साठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यालयाकडे FORWARD करावे ही विनंती.
*कृपया उपरोक्त दिलेल्या मुदतीत सरपंच उपसरपंच मानधन व ग्रामपंचायत कर्मचारी वेतन अदाएगी बाबत मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी*.
धन्यवाद

Address

Solapur
413006

Telephone

+917350591491

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना:

Share

Category