Santosh Pawar - संतोष पवार

Santosh Pawar -  संतोष पवार जन सेवा हिच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे मार्ग फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी झटणार

न्याय, धर्म, सेवा आणि सुशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र ...
31/05/2026

न्याय, धर्म, सेवा आणि सुशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#अहिल्याबाई_होळकर

समर्पण, संघर्ष आणि संयमाच्या प्रतिमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! #माता_रमाई_भीमराव_आंब...
27/05/2026

समर्पण, संघर्ष आणि संयमाच्या प्रतिमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

#माता_रमाई_भीमराव_आंबेडकर #स्मृतीदिन #अभिवादन

॥ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।छायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥श्री शनैश्वर महाराज जयंतीनिमित्त सर्व भक्ता...
16/05/2026

॥ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।
छायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥

श्री शनैश्वर महाराज जयंतीनिमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा.

न्याय, संयम आणि कर्मनिष्ठेची प्रेरणा देणाऱ्या श्री शनिदेवांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो ही प्रार्थना. ✨

#शनिदेव #श्रद्धा #भक्ती

मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर।फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।।दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा।म्हणुनी उरात धरुया शिवसि...
14/05/2026

मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।।
दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।।

स्वराज्यरक्षक, वीर योद्धे, हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!🚩

#धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज #जयंती #अभिवादन

माझे सहकारी, मार्ग फाउंडेशनचे मुख्य समन्वयक मा. श्री. संतोष राठोड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐आपल्या सामाजि...
11/05/2026

माझे सहकारी, मार्ग फाउंडेशनचे मुख्य समन्वयक मा. श्री. संतोष राठोड यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐

आपल्या सामाजिक कार्यातील समर्पण, युवकांना दिलेली प्रेरणा आणि समाजासाठीची अखंड धडपड प्रेरणादायी आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! ✨

जागतिक मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #जागतिक_मातृदिन
10/05/2026

जागतिक मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

#जागतिक_मातृदिन

दहावीच्या परीक्षेत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ...
08/05/2026

दहावीच्या परीक्षेत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

आपल्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे हे यश असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर असेच यश, प्रगती आणि उज्ज्वल भविष्य लाभो हीच सदिच्छा!





राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! बहुजन, अस्पृश्य आणि महिलांसाठी त्यांनी अलौकिक कार्य केले. बह...
06/05/2026

राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

बहुजन, अस्पृश्य आणि महिलांसाठी त्यांनी अलौकिक कार्य केले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी झटत त्यांच्या सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली.

#राजर्षी_शाहू_महाराज #पुण्यतिथी

04/05/2026

मुंबई–पुणे मार्गावर माझा नेहमीच रस्त्याने प्रवास होत असतो. त्यामुळे “मिसिंग लिंक” प्रकल्प सुरू होण्यापूर्वीचा प्रवास आणि आता उद्घाटनानंतरचा बदल अतिशय जवळून अनुभवता आला. पूर्वी घाट विभागातील वाहतूक कोंडी, वळणावळणाचे रस्ते आणि प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे अनेक अडचणी जाणवत असत. विशेषतः पावसाळ्यातील प्रवास अधिक कठीण व्हायचा. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेले बोगदे, उंच पूल आणि नियोजनबद्ध मार्गामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे.

२०१९ पासून सुरू असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता अखेर जनतेसाठी खुला झाला असून, महाराष्ट्राच्या विकासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा केवळ रस्ता नसून आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अशा दर्जेदार पायाभूत सुविधा राज्याच्या आर्थिक विकासाला नवी चालना देतात आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करतात. अभियांत्रिकी क्षेत्रातील हा अद्भुत नमुना प्रत्यक्ष अनुभवताना महाराष्ट्राच्या विकासाचा अभिमान निश्चितच अधिक वाढला. 🚧✨

हा भव्य आणि आधुनिक प्रकल्प साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व अभियंते, कामगार, अधिकारी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिश्रम, समर्पण आणि जिद्दीमुळेच हा अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना आज जनतेच्या सेवेत उभा राहिला आहे. 🙏

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।शुर - वीरांची, संत - महात्म्यांची ही...
01/05/2026

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।

शुर - वीरांची, संत - महात्म्यांची ही महाराष्ट्र भूमी या भूमीला लाभलेला ज्ञान, संस्कृती, कला, आणि इतिहासाचा लाभलेला उज्ज्वल वारसा चिरंतन अबाधित ठेवण्याचा संकल्प या महाराष्ट्र दिनी करूया. महाराष्ट्र निर्मितीसाठी शहीद हुतात्म्यांना व महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या कामगारांना नमन ..!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ..!

#महाराष्ट्रदिन

Address

Vijapur Road
Solapur
413003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Pawar - संतोष पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Santosh Pawar - संतोष पवार:

Share