Zilla Parishad Solapur

Zilla Parishad Solapur Website:- www.zpsolapur.gov.in Govt. Org
(253)

*सीईओ जैन यांची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नांदेड जिल्हा भेट व तपासणी.*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान...
02/06/2026

*सीईओ जैन यांची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नांदेड जिल्हा भेट व तपासणी.*

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मुल्यमापन समितीमार्फत राज्यभरात तपासणी सुरू आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. सुर्यकांत भुजबळ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांची मुल्यमापन समिती 1 जून पासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहे. याप्रसंगी सीईओ जैन याच्या समितीने नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील कामळजा, देगलूर तालुक्यातील अंतापूर, येरगी,अंबुलगा आदी गावांना प्रत्यक्ष गावभेटी देवून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत झालेली कामे तसेच दाखविण्यात येणारी कामे व त्या अनुषंगाने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे गावांचे मुल्यमापन करीत आहे. यावेळी जैन मुल्यमापन समितीमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य केंद्र व गाव परिसरात भेटी देऊन अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी सीईओ जैन यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुलांशी संवाद साधला. येरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीने जैन यांच्यासमोर प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी जैन यांनी सदर विद्यार्थिनीचे कौतुक केले. याप्रसंगी सीईओ जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांचा येथील विद्यार्थिनीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संबंधित गावचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

22/05/2026
सोलापुरात अंध महिला क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप; विश्वचषक विजेत्या गंगा कदम यांचा श्री कुशल जैन सीईओ यांच...
21/05/2026

सोलापुरात अंध महिला क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप; विश्वचषक विजेत्या गंगा कदम यांचा श्री कुशल जैन सीईओ यांचे हस्ते विशेष सत्कार
सोलापूर येथील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडिया (CABI) च्या वतीने दिनांक ०५ मे ते २१ मे दरम्यान अंध महिलांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणेत आलेले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री. कुशल जैन उपस्थित होते. या शिबीरासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन 25 अंध मुली सहभागी झाल्या होत्या.
समारोप प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कुशल जैन यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मुलींचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला त्यांनी भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे टी-२० विश्वचषक विजेत्या अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कु. गंगा संभाजी कदम यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कुशल जैन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. गंगा कदम यांच्या यशाने उपस्थित सर्वच प्रशिक्षणार्थी मुलींना एक नवी प्रेरणा मिळाली.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री. चंद्रकांत रेबर्सू, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडियाच्या कु. राजश्री रमावत, तसेच श्री. राजू शेळके व प्रशिक्षक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

15/05/2026

Address

Zilla Parishad Solapur
Solapur
413003

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Zilla Parishad Solapur:

Share