akhil bhartiya vidyarthi parishad khamgaon

akhil bhartiya vidyarthi parishad khamgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from akhil bhartiya vidyarthi parishad khamgaon, Social service, JijauSrushti ShivDharmaPeeth MatruTirth SindkhedRaja Dist Buldhana, Sindkhed.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती ग...
01/01/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती गौरव यात्रेची आज मातृ-तीर्थ सिंदखेड राजा येथून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. या यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रांत सह संघटन मंत्री श्री. मनोजजी साबळे, बुलढाणा जिल्हा संघचालक प्रा. सुभाषजी मोरे, सिंदखेड राजा नगराध्यक्ष श्री. सौरभ तायडे, ॲड. गजानन कोरडे, श्री. अशोकजी मेहेत्रे, विदर्भ प्रांत छात्रा प्रमुख कु. आर्या पाचखेडे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री कु. पायल ताई किनाके यांना राष्ट्रीय अधिवेशन, देहरादून येथे राष्ट्रीय म...
30/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री कु. पायल ताई किनाके यांना राष्ट्रीय अधिवेशन, देहरादून येथे राष्ट्रीय मंत्री म्हणून घोषित करण्यात आली आहे.

विद्यार्थी शक्तीच्या संघटन कार्यामध्ये सातत्याने नेतृत्व, तळमळीची भूमिका व कार्यक्षम योगदान याची ही मोठी दखल असून, हा गौरव विदर्भ प्रांतासाठी प्रेरणादायी आणि गौरवाचा क्षण आहे.

नवीन जबाबदारीसोबत नवा प्रवास, विद्यार्थीहितासाठी नवी ऊर्जा, संघटनासाठी नवीन ऊंची साठी प्रेरक ठरणार आहे.

आम्हाला विश्वास आहे की पायल ताई यांचे नेतृत्व आगामी काळात विद्यार्थी परिषदेचे कार्य अधिक परिणामकारक आणि व्यापक करेल.

हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा ताई!

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव जिल्हा*खामगाव नगरा मध्ये भगवान बिर्सा मुंडा यांचा 150 वी जयंती निमित्य समाज कल्याण ...
15/11/2025

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव जिल्हा*
खामगाव नगरा मध्ये भगवान बिर्सा मुंडा यांचा 150 वी जयंती निमित्य समाज कल्याण मुलींचे वसतिगृह,खामगाव येथे कलश पूजन व भाषणात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

अ.भा.वि.प च्या 14 नोव्हेंबर 2025 रोजी  होणाऱ्या *धडक मोर्चा* संदर्भात खामगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात  प्रांत सहस...
09/11/2025

अ.भा.वि.प च्या 14 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या *धडक मोर्चा* संदर्भात खामगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात प्रांत सहसंघटनमंत्री मनोज जी साबळे यांच्या प्रवासात भेटी
विद्यार्थ्याना मोर्चाला येण्याचे आव्हान करण्यात आले

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव जिल्हासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या संलग्नित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना...
08/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव जिल्हा
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या संलग्नित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्या व विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात अभावीप च्या होणाऱ्या धडक मोर्चा बाबत 7/11/2025 कॉलेज बंद आंदोलन... म्हणून खामगाव, येथील विविध कॉलेज मध्ये निवेदन देण्यात आले. व महाविद्यालय बंद करण्यात आले. त्यावेळी अभाविप कार्यकर्ते, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मोर्चाबद्दल माहिती देण्यात आली.

📢 धडक मोर्चा - १४ नोव्हेंबर २०२५अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित *धडक मोर्चा💥*📍 ठिकाण: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापी...
01/11/2025

📢 धडक मोर्चा - १४ नोव्हेंबर २०२५
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित
*धडक मोर्चा💥*
📍 ठिकाण: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
🕚 वेळ: सकाळी ११.०० वाजता

विद्यापीठ प्रशासनाला जागे करण्यासाठी — प्रवेश, परीक्षा, परिणाम, पदभरती, पाठ्यक्रम आणि छात्रसंघ निवडणुका यासाठी एकत्र या!

✊ “उठ दोस्ता उगार मुठ… तूच तुझ्या शिक्षणाची थांबव लूट…”

बुलढाणा विभागात केंद्रीय प्रवासादरम्यान अखिल भारतीय जनजाती विद्यार्थी कार्य प्रमुख मा. प्रमोद राऊत यांची उपस्थिती लाभली....
01/11/2025

बुलढाणा विभागात केंद्रीय प्रवासादरम्यान अखिल भारतीय जनजाती विद्यार्थी कार्य प्रमुख मा. प्रमोद राऊत यांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी बुलढाणा विभाग समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत प्रांत सह संघटन मंत्री मनोज जी साबळे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रशांत देशमुख, प्रांत छात्रा प्रमुख आर्या पाचखेडे, विभाग प्रमुख प्रा. मयुरेश कुलकर्णी , विभाग संयोजक विवेक माने तसेच अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बैठकीत आगामी कार्ययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि संघटन विस्तारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🙏
21/10/2025

आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🙏

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव जिल्हा शाखा खामगांव नगर द्वारा 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 रोजी अ...
15/08/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव जिल्हा
शाखा खामगांव नगर द्वारा 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 रोजी अभाविप खामगांव कार्यालय येथे भारत माता पूजन, स्वच्छता अभियान, व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळेस खामगाव जिल्हा प्रमुख प्रा. गणेश घोराळे, खामगांव नगर अध्यक्ष प्रा. अस्मिता भोजने, नगर मंत्री वैष्णवी जवळकार, नगर सहमंत्री पंकज भोपळे व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव जिल्हा शाखा जळगाव जामोद*जळगाव जामोद येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अखिल भारत...
15/08/2025

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव जिल्हा शाखा जळगाव जामोद*
जळगाव जामोद येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे भव्य स्वरूपाच्या 500 फूट तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय येथून तिरंगा यात्रा सुरु होऊन विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बहुसंख्य सहभागाने 500 फुटाची तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी अभाविप खामगाव जिल्हा संयोजक शुभम राजपूत, जिल्हा सहसंयोजक सानिका राठोड, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख संकेत वानखेडे, जिल्हा गतीविधी प्रमुख शुभम राठोड, जिल्हा अर्थ व जनसंपर्क प्रमुख ऋषिकेश वाघमारे, जिल्हा विद्यार्थी विस्तारक आर्या पाचखेडे, जळगाव जामोद नगर मंत्री पूनम भगत, नगर सहमंत्री कपिल शर्मा, भागेश राजोरे, रंजना सातपुते, जानवी सूर्यवंशी, आनंद इंगळे, रितेश ढगे,आचाल धुरडे, वैष्णवी भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.*

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव शाखे द्वारे खामगांव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री.रामकृष्ण पवार यांना...
10/08/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव शाखे द्वारे खामगांव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री.रामकृष्ण पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय, कार्यक्षम व जनहितकारी सेवेबदल राष्ट्रपती पोलीस पदक मिळ्याल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विभाग छात्रा प्रमुख साक्षी करवते जिल्हा सह संयोजक सानिका राठोड, नगरमंत्री वैष्णवी जवळकार, जागृती नेमाने, सई देशमुख, प्रणाली अवचार,श्रेया राठोड, लक्ष्मी जवळकार, अतुल चव्हाण, आनंद निकाळजे, ऋषिकेश वाघमारे उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव शाखे कडून रक्षाबंधन निमित्त शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना राखी बांधू...
09/08/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगांव शाखे कडून रक्षाबंधन निमित्त शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. यावेळी विभाग छात्रा प्रमुख साक्षी करवते जिल्हा सह संयोजक सानिका राठोड, नगरमंत्री वैष्णवी जवळकार, जागृती नेमाने, सई देशमुख, प्रणाली अवचार,श्रेया राठोड, लक्ष्मी जवळकार, अतुल चव्हाण, आनंद निकाळजे, ऋषिकेश वाघमारे यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व कौतुक केले.

Address

JijauSrushti ShivDharmaPeeth MatruTirth SindkhedRaja Dist Buldhana
Sindkhed

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when akhil bhartiya vidyarthi parishad khamgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category