Mahamanav Baba Amte Vikas Seva Sanstha, Shrigonda Dist Ahmednagar

Mahamanav Baba Amte Vikas Seva Sanstha, Shrigonda Dist Ahmednagar Promote equality of women and tribal children through access to education, knowledge and opportunity.

महामानव बाबा आमटे संस्था ही एक सामाजिक संस्था आहे. समाजातील दुर्लक्षित-उपेक्षित घटकातील मुलांसाठी हि संस्था काम करते सध्या संस्थेने ४० मुलांचे पालकत्व स्विकारले आहे. संस्थेला कसल्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरती संस्थेचे काम सुरु आहे. संस्थेने अल्प दरामध्ये तालुक्यातील मुलांसाठी ए.पि.जे अब्दुल कलाम अभ्यासिका वाचनालय चालू केले आहे. त्याचप्रमाणे श्रीगोंदा येथी

ल सेवा वस्तीमध्ये संस्था संचलित बालभवन प्रकल्प चालवला जातो. काष्टी या ठिकाणी आरंभ बालभवन ही चालवले जाते. समाजातील दुर्लक्षित मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत हे संस्थेचे ध्येय आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठीहि मुलांकडे लक्ष दिले जाते. सध्या ४० मुलांचे शिक्षण आणि त्यांची आर्थिक जबाबदारी संस्थेने घेतली आहे. मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण प्रगतीसाठी गृह उपयोगी साहित्य, शैक्षणिक साहित्य खरेदी करताना संस्थेला अनेक अडचणी भासत असतात. या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला आपल्या सहयोगाची अत्यंद आवश्यकता आहे. संस्थेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोग देण्यासाठी तुम्ही संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊ शकता. महामानव बाबा आमटे बहूउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेला दिलेल्या सर्व देणग्यांना 80G कलमान्वये आयकर सवलत आहे.
संस्थेला मदत करण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.
मो-९४०४९७६८३३,९८८१५२३७२३३,९६८९१६९३९८,
९६८९०७२३५४
संस्थेला दिलेल्या सहयोगाबद्दल संस्था सदैव कृतज्ञ राहील.
एकदा संस्थेला आवश्य भेट द्या .............................

*आग्रहाचे निमंत्रण* ..*अखंड वारी ज्ञानप्रबोधनाची* ....! *प्रबोधन व्याख्यानमाला* 🎤🎤*(वर्ष १३ वे )**आपणास आग्रहपूर्वक हार्...
13/12/2025

*आग्रहाचे निमंत्रण* ..

*अखंड वारी ज्ञानप्रबोधनाची* ....!

*प्रबोधन व्याख्यानमाला* 🎤🎤

*(वर्ष १३ वे )*

*आपणास आग्रहपूर्वक हार्दिक निमंत्रण👏👏*

*दि १८, १९ ,२० डिसेंबर २०२५ सायंकाळी ७:२० वा* ...

*कार्यक्रम स्थळ* - रत्नकमल मंगल कार्यालय, पंचायत समिती रोड, श्रीगोंदा अहमदनगर...🎤🎤

*आयोजक* -

महामानव बाबा आमटे सेवा संस्था श्रीगोंदा,
जि अहमदनगर, (महाराष्ट्र) ४१३७०१
मो ९४०४९७६८३३ ९८८१५२३७३३,
[email protected]

🎤🎤🎤

19/06/2025
*निर्गुण निराकार तोचि हा आमचा परमेश्वर*अनेक दिवसापासून काकाजी संस्थेला भेट देतील असे सुरू होते काल अहमदनगर आनंद ऋषी व्या...
28/03/2024

*निर्गुण निराकार तोचि हा आमचा परमेश्वर*

अनेक दिवसापासून काकाजी संस्थेला भेट देतील असे सुरू होते काल अहमदनगर आनंद ऋषी व्याख्यानमालेच्या निमित्ताने काकाजीचे सायंकाळ वेळ ७ वा व्याख्यान समारोप झाल्यावर स्नेही मित्र अमोल लगड कडे काकाजी चा निरोप आला⚡

खूप दिवसांपूर्वी अनंत कडे गेलो होतो त्यावेळी संस्था कुलकर्णी वाड्यात होती त्यानंतर नवीन जागेत संस्थेचा विस्तार झाला आहे.

तो ही खूप दिवसापासून बोलावतो जायचे ही त्यांच्याकडे खूप दिवसाचे राहून गेले आहे.

आपण ह्यावेळेस मात्र आपण अनंताकडे महामानव बाबा आमटे संस्थेत मुक्कामाला जाऊच असा अमोल चा मला निरोप आला आम्हाला मनस्वी खूप आनंद झाला..

*काकाजी म्हणजे तरुणाचा अखंड ऊर्जेचा स्रोत*..

श्री. इंद्रजीत देशमुख काकाजी
संस्थापक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि शिवम् आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान परीवार घारेवाडी, ता.कराड,जि.सातारा
माजी सनदी प्रशासकीय अधिकारी

आपल्या अमृतवाणीतून प्रबोधनाद्वारे समाजात सदपरिवर्तन घडविणारे विचारवंत हि काकाजीची अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे 👏

आज हि हजारो युवकांच्या आयुष्यात चैतन्य फुलवणारा , ज्ञानाचा ऊर्जेचा प्रेरणेचा अखंड स्रोत म्हणजे काकांजी

आध्यात्मिक साधक, संतसाहित्याचे अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे आचरणकर्ते, कृतिशील समाजसेवक,महाराष्ट्र काकाजींना ओळखतो..

अहमदनगर मधून श्रीगोंदयाच्या दिशेने काकांचा प्रवास सुरू झाला रात्री ११ वा महामानव बाबा आमटे संस्थेच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्रामध्ये काका पोहचले संस्थेत काकाजींचा मुक्काम झाला 👏

सकाळी सकाळी सर्व आदिवासी मुलांशी काकाजी यांनी संवाद साधला प्रेरणा देणाऱ्या दोन गोष्टी काकांनी मुलांना सांगितल्या त्यात नेहमी आपण कोठे जन्मलो हे महत्वाचे नाही आपण कसे घडलो याला खूप महत्व आहे..

कष्ट करा जिद्द चिकाटी ठेवा ध्येय ठेवा आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा काकांनी मुलांना सांगितले..

आदिवासी मुलांच्या शुभ हस्ते काकाजींचे स्वागत करण्यात आले अमोल ने मानपत्राचे वाचन केले.

आदिवासी मुलांच्या शुभहस्ते काकाजीं ना मानपत्र देण्यात आले काकाजी ची ही भेट संस्थेला भेट आमच्या सर्वांसाठी नेहमी अविरत प्रेरणा देत राहील

*जय हो मंगल हो*...

*संपर्क कार्यालय*
महामानव बाबा आमटे विकसित सेवा संस्था श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
मो 9404976833,9922168569

माझा देश माझी जबाबदारीमहा एनजीओ फेडरेशनआशीर्वाद: प.पू . श्री.श्री.रविशंकर (गुरूजी)जागतीक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ...
13/03/2023

माझा देश माझी जबाबदारी

महा एनजीओ फेडरेशन

आशीर्वाद: प.पू . श्री.श्री.रविशंकर (गुरूजी)

जागतीक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्कार*

“स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व”

*शुभ हस्ते: पद्मश्री. मा.सौ. राहीबाई पोपेरे*
प्रमुख उपस्थिती: मा. सौ.मेधाताई कुलकर्णी

मा.शेखर मुंदडा: संस्थापक: महा एनजीओ फेडरेशन.

आदिवासी मुलांच्या शिक्षण पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सौ शुभांगी अनंत झेंडे ,महामानव बाबा आमटे सामाजिक विकास सेवा संस्था यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले ...

*||जाणीव झाली आता बदल घडवूया||*

अखंड वारी ज्ञानप्रबोधनाची*महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प**भावनिक बुद्धी विकसित झाल्यास डिप्रेशन आ...
06/01/2023

अखंड वारी ज्ञानप्रबोधनाची

*महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प*

*भावनिक बुद्धी विकसित झाल्यास डिप्रेशन आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. - डॉ. यश वेलणकर*

*सोमवार दि. 26 डिसेंबर 2022*

श्रीगोंदा:- भावनिक बुद्धी ही विकसित करता येते. मात्र आपल्या मुलांना भावनिक बुद्धी विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. कारण भावनिक बुद्धीच यशासाठी आवश्यक असते. यावेळी उदाहरण देताना डॉ यश वेलणकर यांनी गांधीजींचा उल्लेख केला. भावनिक बुद्धी गांधीजींकडे प्रचंड होती. सत्याग्रहाचा जन्म हा आफ्रिकेत झाला. गांधीजी हे वकिलीसाठी आफ्रिकेत राहिले होते. आणि तिथे रेल्वेसाठी तिकीट घेतलेले असता त्यांना आलेल्या अनुभवाचा किस्सा आपणा सर्वांना माहिती आहे. गांधीजी वकील तर होतेच मात्र त्याहीपेक्षा ते हुशार आणि कुशाग्र होते. त्यांची भावनिक बुद्धी ही विकसित झालेली होती. म्हणून ते रेल्वेत बसले आणि त्यांना रेल्वेत आलेल्या अनुभवामुळे आफ्रिकेत सत्याग्रहाचा उदय झाला. त्यावेळी गांधीजी रागाने पेटून उठले असते तर सत्याग्रह समजायला जगाला अजून कित्येक वर्ष लागली असती. म्हणून दैनंदिन जीवनात आपण आपल्या रागाचा शोध घेतला पाहिजे. सत्याग्रहामुळेच गांधीजींचा विजय झाला आणि तेथील पोलिसांनी गांधीजींना सन्मानाने रेल्वेत बसवाव लागले, हा भावनिक बुद्धीचा विजय आहे.

आज रागाच्या भरात तरुण आपल्याला आत्महत्या करताना दिसून येत आहेत. शहरी आणि ही ग्रामीण भागात देखील हीच परिस्थिती आपण अनुभवत आहोत. यावेळी डॉक्टर यश वेलणकर यांनी मागील काही वर्षातील अपघात - कोरोनाने मृत्यमुखी पडलेल्या आणि आत्महत्या झालेल्या मृत्यूंची आकडेवारी ही सांगितली. त्यामध्ये आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या ही खूपच जास्त असल्याचे आढळून आले आहे. खरंतर ही आत्महत्या करण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संकटांचा सामना कसा करायचा हे आपण मुलांना शिकवत नाही. आणि त्यामुळे ही तरुण पिढी नैराश्यात जाऊन आत्महत्या करत आहे असे म्हटले. म्हणजेच त्यांची भावनिक बुद्धी विकसित होत नाहीये. जीवनात आपल्याला पायावर उभे राहताना जो त्रास झाला तो आपल्या मुलांना नको म्हणून आपण आपल्या मुलांना सर्व आयत्या गोष्टी देत आहोत. आणि त्याचा परिणाम म्हणजेच आपल्या मुलांच्या भावनिक बुद्धीचा विकास होतच नाही. म्हणूनच आपल्या मनाविरुद्ध काही झाल्यास आज आपल्याला तरुण पिढी आत्महत्या करताना दिसत आहे, यासाठी पालकांनी सजग व्हायला हवे.

भावनेच्या भरात आपण काय करतोय याचे आपल्याला भान असायला हवे. स्वतःच्या भावनांना आपण न्याय दिला पाहिजे. त्या दाबून ठेवल्यास त्याचा मानसिक त्रास आपल्यालाच होतो. सैराट होऊन केलेली कृती नेहमी घातक असते. भावनेचा विचार न करता केलेली कृती म्हणजे सैराट होणे होय. आणि यामुळे फक्त मानसिक त्रास आणि नुकसानच होते.

यावेळी बहिणाबाई यांचे उदाहरण देऊन डॉ. वेलणकर यांनी मन वढाय वढाय याचा भावार्थ समजुन सांगितला. भावनिक बुद्धी नसेल तर मानसिक विकृती उदयास येते. आणि मग मानसोपचार तज्ज्ञची गरज भासते. स्त्री आणि पुरुष यांच्या भावनेची सुरुवातीपासूनची जडण घडण कशी आहे याची नैसर्गिक संकलप्नाही विविध अंगांनी रूपांनी समजुन सांगितली.

आजच्या काळात डिप्रेशनमध्ये - चिंता रोग असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये याचे प्रमाण खूपच जास्त आहे. डिप्रेशन - चिंता रोग म्हणजे काय तर मेंदूमध्ये बदल झालेली क्रिया असते. काही वेळा मानसोपचार तज्ञांकडून डिप्रेशन दूर होऊ शकते, मात्र डिप्रेशन जास्तच खोलवर असेल तर त्यावेळेस मात्र औषधांची गरज पडते. मुळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना कसा करायचा हे आपण शिकलो ते डिप्रेशनमध्ये कोणीही खोलवर जाऊ शकणार नाही. समुपदेशन केल्याने ती व्यक्ती पूर्ववत होऊ शकते. यावेळी डॉ. वेलणकर यांनी घरगुती उदाहरणे देखील दिली.

आज आपण बहुतेक करून बुद्धीची कामे करतो. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही ही चिंतेची बाब आहे. म्हणून आपल्याला मानसिक स्वास्थ्य टिकवायचे असेल तर आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे. आपल्या श्वासावर आपण लक्ष दिले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने रोज 20 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा सराव केल्यास त्यांच्या मेंदूत रचनात्मक बदल केल्याचे आपणास अनुभवायला मिळतील असेही ते म्हणाले.

यावेळी व्याख्यान संपल्यावर सुमारे 45 मिनिटे पुन्हा प्रश्नोत्तरे चा कार्यक्रम रंगला. श्रीगोंदेकरांनी भरभरून प्रश्न विचारले आणि त्यांची समर्पक अशी उत्तरे डॉ. यश वेलणकर यांनी दिली.

यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी मानपत्र देऊन डॉ. वेलणकर यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शेठ यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्रीगोंदा तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात आशासेविका यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना उद्धव गायकवाड यांनी तर आभार घनश्याम अण्णा शेलार यांनी मानले. सूत्र संचालन कवी चंद्रशेखर पाटील यांनी केले.

संपर्क कार्यालय -
महामानव बाबा आमटे संस्था,
घुगलवडगांव, मांडवगण रोड,
ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर
पिन 413701
मो- 9404976833,9881523733

अखंड वारी ज्ञानप्रबोधनाची*महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प**भावनिक बुद्धी विकसित झाल्यास डिप्रेशन ...
05/01/2023

अखंड वारी ज्ञानप्रबोधनाची

*महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प*

मो- 9404976833

भारताचं नाव सगळ्यांच्याच ओठी असेल७५ वा अमृत महोत्सव सन्मानाने साजरा करूयातुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्राच्या शुभेच्छा द...
15/08/2022

भारताचं नाव सगळ्यांच्याच ओठी असेल
७५ वा अमृत महोत्सव सन्मानाने साजरा करूया
तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्राच्या शुभेच्छा देऊया
स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."

महामानव बाबा आमटे सामाजिक विकास सेवा संस्था
श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर

आत्महत्या प्रतिबंध:*प्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केली किंवा गरीब शेतकरी असे आपण वर्तमानपत्रात वाचतो. आत्महत्या का होतात?...
11/08/2022

आत्महत्या प्रतिबंध:*

प्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केली किंवा गरीब शेतकरी असे आपण वर्तमानपत्रात वाचतो. आत्महत्या का होतात? व्यक्ती, कुटुंब, समाज, सरकार आणि वैद्यकीय समुदायाची भूमिका काय आहे? चला या गुंतागुंतीच्या विषयाबद्दल जाणून घेऊया आणि स्वतःला शिक्षित करू या.

भाषा मराठी

झूम वर आमच्यात सामील व्हा
तारीख रविवार 14 ऑगस्ट 2022
भारत संध्याकाळी 5:30 वा
यूएसए मध्ये सकाळी 7 वा central
ऑस्ट्रेलिया: रात्री 10 वा

सेतू इंटरनॅशनल फाऊंडेशन तुम्हाला नियोजित झूम मीटिंगसाठी आमंत्रित करत आहे.

ZOOM मीटिंगमध्ये सामील व्हा
Setu International Foundation is inviting you to a scheduled Zoom meeting.

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84846931243?pwd=MzhJUzBBcGYwcUovQzZqeDBwMkNyZz09

Meeting ID: 848 4693 1243
Passcode: 708773

Address

Mahamanav Baba Amte Santha, Kulkarni Wada, Gavaligalli, Tal Shrigonda Dist Ahmednagar
Shrigonda
413701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahamanav Baba Amte Vikas Seva Sanstha, Shrigonda Dist Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mahamanav Baba Amte Vikas Seva Sanstha, Shrigonda Dist Ahmednagar:

Share