अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटना ,शिरपूर

  • Home
  • India
  • Shirpur
  • अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटना ,शिरपूर

अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटना ,शिरपूर अन्याय और अत्याचार के खिलाफ उलगूलान जारी है.. और जारी रहेगा..!

05/08/2026
 #जागतिक_आदिवासी_दिनानिमित्त_शिरपूर_शहरात_नियोजनाबाबत_महत्वपूर्ण_बैठक_संपन्न!तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना कळव...
22/07/2026

#जागतिक_आदिवासी_दिनानिमित्त_शिरपूर_शहरात_नियोजनाबाबत_महत्वपूर्ण_बैठक_संपन्न!

तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांना कळविण्यात येते की,सालाबादाप्रमाणे दरवर्षी वर्षी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस शिरपूर शहरात मोठया उत्साहात आयोजित करण्यात येत असतो. याही वर्षी #मा. #आमदार_काशीराम_दादा_पावरा यांच्या #मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी,पोलीस पाटील,सरपंच,उपसरपं,डॉक्टर्स,कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते,शिरपूर शहरातील स्थानिक समाजबांधव,विद्यार्थी आदींची मिटिंग घेण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आपापले मनोगत व्यक्त केले.तसेच चर्चे अंति सर्व्याच्या संमतीने ९ ऑगस्ट २०२६ जागतिक आदिवासी दिवस शिरपूर शहरात आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले.मा.काशीराम दादा पावरा यांनी उपस्थितांना कार्यकमाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत उत्सव समिती समिती गठीत करण्याचे ठरले.यावेळी मोठया संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹________________________________🔴  #व्यसनमुक्ती_प्रबोधनासाठी_महत्वपूर्ण_बैठक_______________________________  ...
08/05/2026

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
________________________________

🔴 #व्यसनमुक्ती_प्रबोधनासाठी_महत्वपूर्ण_बैठक
_______________________________

शिरपूर तालुक्याच्या आदिवासी समाजातील व्यसनाचे प्रमाण लक्षात घेता काळजीवाहू आमदार मा. काशिराम दादा पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमदार कार्यालय येथे आदिवासी संघटना प्रतिनिधींची समाजातील व्यसनाचे प्रमाण, परीणाम याबाबत अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली.
तालुक्याचे प्रथम नागरिक असलेल्या आमदार महोदयांनी स्वत:च्या समाजातील व्यसनावर प्रबोधन, चळवळ करणे ही समाजासाठी आनंदाची बाब आहे. सदर बैठकीत व्यसनाच्या प्रत्येक पैलुंवर चर्चा झाली. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेतून व्यसनाच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आमदार दादांसह संघटनांनीही संकल्प घेतला. लवकरच व्यसनमुक्ती चळवळ, प्रबोधनाला सुरूवात होईल. त्यासाठी येत्या 17 मे रोजी सुळे येथे प्रबोधन मेळावा, नियोजन बैठक घेतली जाईल. यावेळी मनोज पावरा, सुंदरलाल पावरा, भरत पावरा, डॉ. संदीप पावरा, यशवंत पावरा, जगदीश पावरा, जगदीश कनोजे उपस्थित होते.
__________________________________

_@ # व्यसनमुक्त समाज, सशक्त समाज._

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..🙏🏻💙"शि...
13/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..🙏🏻💙
"शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा -हाच आमचा मार्ग..!"🔥✊🏻
"१४ एप्रिल-स्वाभिमान,समता आणि न्यायचा दिवस!"💙

 #आदिवासी_क्रांतिवीर_खाज्या_नाईक यांच्या  #स्मृतिदिनानिम्मित विनम्र  #अभिवादन.....!🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
10/04/2026

#आदिवासी_क्रांतिवीर_खाज्या_नाईक यांच्या #स्मृतिदिनानिम्मित विनम्र #अभिवादन.....!
🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धडगाव येथील पावरा समाज मेळाव्यात घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दलची माहिती . समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्या...
25/03/2026

धडगाव येथील पावरा समाज मेळाव्यात घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दलची माहिती . समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठराव येथे एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.
या बातमीतील मुख्य ठराव खालीलप्रमाणे आहेत:
मुख्य सामाजिक निर्णय

* बालविवाह विरोध: मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

* हुंडा प्रथा: हुंड्याची रक्कम संपूर्ण समाजात एकसमान ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

* साधेपणाला प्राधान्य: विवाहात अनावश्यक खर्च, भेटवस्तू, साखर नेणे किंवा भांडी देणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

* व्यसनमुक्ती: विवाहात तंबाखू आणि सिगारेटचा वापर पूर्णतः बंद करण्यात आला असून, दारूचा वापर केवळ पूजेसाठी मर्यादित ठेवला जाईल.

* सांस्कृतिक जपणूक: पारंपरिक वाद्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला असून डीजे (DJ) आणि बँडवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

इतर महत्त्वाचे ठराव
| क्षेत्र | घेतलेले निर्णय |
|---|---|

| अंत्यविधी | प्रेतावर अनावश्यक कपडे किंवा पैसे टाकण्याची प्रथा बंद. उत्तरकार्य साध्या पद्धतीने करून मांसाहाराची (बकऱ्याचे मटण) प्रथा बंद करणे. |

| इंदल कार्यक्रम | इंदल कार्यक्रमासाठी बकऱ्याची किंवा पैशांची भेट स्वीकारण्यावर बंदी. पत्रिकेऐवजी साध्या पद्धतीने आमंत्रण देणे. |

| परंपरा | पारंपरिक पूजाऱ्यांचा सन्मान राखणे आणि 'नवाय' सारखे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करणे. |
| आरोग्य | सिकलसेल जनजागृती आणि विवाहपूर्व तपासणी करण्यावर भर. |

या ठरावांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गाव समित्यांवर सोपवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 #आदिवासी_जनजागृती_संघटनेचे_प्रदेश_अध्यक्ष व आमचे  #मार्गदर्शक,  #गुरु श्री  #दिनेश_पावरा_साहेब आपणास  #वाढदिवसाच्या हार...
01/03/2026

#आदिवासी_जनजागृती_संघटनेचे_प्रदेश_अध्यक्ष व आमचे #मार्गदर्शक, #गुरु श्री #दिनेश_पावरा_साहेब आपणास #वाढदिवसाच्या हार्दिक #शुभेच्छा..
🌹🌹🌹🎂🎂🌹🌹🌹

 #शिरपूर_सोनगीर_धुळे_नंदुरबार_नाशिक वरील टोल नाक्यावर  #टोल_फ्री बाबत सौ. #मंजुळाताई_गावित यांच्या मार्फत पत्र देण्यात आ...
11/01/2026

#शिरपूर_सोनगीर_धुळे_नंदुरबार_नाशिक
वरील टोल नाक्यावर #टोल_फ्री बाबत सौ. #मंजुळाताई_गावित यांच्या मार्फत पत्र देण्यात आले आहे.तरी कोणीही टोल देऊ नये..

Address

Shirpur
425405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटना ,शिरपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटना ,शिरपूर:

Shortcuts

Share