Dhanaji Chudmunge संघर्ष योद्धा

  • Home
  • India
  • Shirol
  • Dhanaji Chudmunge संघर्ष योद्धा

Dhanaji Chudmunge संघर्ष योद्धा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhanaji Chudmunge संघर्ष योद्धा, Social service, Shivaji Chowk, Shirol.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुजल
22/05/2023

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुजल

I have reached 500 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
15/03/2023

I have reached 500 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

06/12/2022
मेरी जाण तिरंगा
13/08/2022

मेरी जाण तिरंगा

09/08/2022

जैनापूर खांडसरी ला 2018 साली ऊस घातलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर आज चेक मिळाले आणि तेही 2903 रुपये प्रति टन या प्रमाणे
2500 रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण करायचा प्रयत्न खांडसरी कडून गेले वर्षभर सुरु होता तो मोडून काढत आज 2903 रुपया प्रमाणे चेक मिळाले यात समाधान आहे.
शेतकऱ्यांची चिकाटी आणि दानोळी मधील टीम अंकुश मुळे हे शक्य होऊ शकले.
त्याचबरोबर खमकी भूमिका घेणारे कामगार यांनी मोलाची साथ दिली म्हणून त्यांचाही सर्व थकीत पगार मिळाला व वाहतूक दार यांचेही पैसे मिळाले.
या सर्वात शेतकऱ्यांना जयसिंगपूर पोलिसांनी साथ दिली त्यांचे विशेष आभार

धनाजी चुडमुंगे
आंदोलन अंकुश

09/08/2022

कोणी कितीही ताकतवान असला तरी कायद्याने वागावे लागते
हे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष
मा श्री जयंत पाटील यांना समजले असावे
शेतकऱ्यांना आता फसवता येणार नाही
कारण इथे आंदोलन अंकुश चे पूर्ण लक्ष आहे
गत हंगामात तोडणी वाहतूक खर्चात जादा लावलेले जवळपास 4 कोटी रुपये परत करावे लागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे
शेतकऱ्यांना ही 4 कोटीची रक्कम frp स्वरूपात आता द्यावी लागणार आहे.

29/07/2022

अंकुश चा फेटा म्हणजे....
मुर्दाड भ्रष्ट अधिकाऱ्यांना शालूतून जोडा....
जनहिताची चाड नसणारे, भ्रष्टाचार करून जनतेच्या तिजोरीवर डाका टाकणाऱ्या मुर्दाड अधिकाऱ्यांना फेटा बांधून शालूतून जोडा मारण्याच्या पद्धतीची दहशत शिरोळ तालुक्यात निर्माण झाली आहे.
आज शिरोळ बंधाऱ्याच्या मजबुती करणाच्या नावाखाली निकृष्ट काम जनतेच्या माथी मारण्यास जबाबदार असलेल्या पाटबंधारे अधिकाऱ्याला फेटा बांधला आणि झालेल्या चुकीची उपरती संपूर्ण पाटबंधारे विभागाला झाली.
आता इथून पुढे अश्याच प्रकारे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आंदोलन अंकुश कडून अपमानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात येणार.
निदान आता तरी शिरोळ तालुक्यात आंदोलन अंकुश च्या फेट्याचा मानकरी ठरू नये, म्हणून अधिकारी डोळे उघडून प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करतील काय...?

आंदोलन अंकुश मुळे दत्त च्या शेतकऱ्यांना 2 कोटी 33 लाखाचा  चा फायदागत हंगामा मध्ये मशीन तोड ऊसास दत्त साखर कारखान्याला 5%...
26/07/2022

आंदोलन अंकुश मुळे दत्त च्या शेतकऱ्यांना 2 कोटी 33 लाखाचा चा फायदा

गत हंगामा मध्ये मशीन तोड ऊसास दत्त साखर कारखान्याला 5% ऐवजी 1% वजावट लावण्यास भाग पाडले होते.
दत्त कारखान्याने एकूण 33 मशीनद्वारे 2 लाख 3 हजार टन ऊस मागील हंगामात तोडला होता.
5% ऐवजी 1% वजनात वजावट लावली गेल्यामुळे शेतकऱ्यांची 4% वजावट वाचली होती.
2 लाख टनाची 4% ने 8 हजार टन वजावट कमी लागली.
गत हंगामा मध्ये दत्त ने 2920 रुपयाने उसाचा दर दिला आहे. म्हणजे 8000×2920=2,33,60, 000 रुपये जादा मिळाले आहेत.

आंदोलन अंकुश च्या रेट्यामुळेच दत्त साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना 2 कोटी 33 लाखाचा फायदा झाला आहे.

22/07/2022

मशीन तोड ऊसास कारखाने 5% ते 10% वजावट लावून शेतकऱ्यांना लुबाडत आहेत.
साखर आयुक्तांनी उसातून पाचट किती येते हे ठरवण्यासाठी अभ्यास गट नेमला त्यांनी शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी ठरवून खोटी आकडेवारी समोर आणली आणि त्या लूटीला अधिकृत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.साखर आयुक्तांनी अभ्यास गटाचा अहवाल 6 जुलै रोजी राज्य सरकार कडे पाठवला आहे आणि आजच सहकार सचिवांनी याबाबत सर्वांची ऑनलाईन बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्याच्या ते प्रयत्नात आहेत.
मशीन ने ऊस तोडताना नुकसान शेतकऱ्यांचे होते आणि त्यात भर म्हणून पुन्हा त्याच्याच वजनातून वजावट करणे हे अन्यायकारक आहे. याउलट कारखाने सरासरी रिकव्हरी द्वारे उसाला दर देतात त्यामुळे उसातून पाचट आले तर कारखान्याची सरासरी रिकव्हरी कमी होऊन शेतकऱ्यांना दर कमी मिळेल पण त्यामुळे कारखान्याला कोणताही तोटा नसताना त्याला मात्र वजावट लावण्याची परवानगी साखर आयुक्त देत आहेत.
वर्षाला हजारो कोटींचा कारखान्यांना फायदा करून देण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे.
कोयत्याने ऊस तोडला तर त्याचा तोडणी खर्च हा प्रति टन 237 रुपये व मशीन ने ऊस तोडल्यास त्याला तोडणीसाठी 380 रुपये दिले जातात.
म्हणजे मशीन तोड उसामुळे सरासरी तोडणी वाहतूक खर्च वाढत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून frp कमी होत आहे.
म्हणजे दुहेरी मार हा शेतकऱ्यांना बसत आहे.
हे सगळं धोरण ठरत असताना कोणत्याही प्रस्थापित पक्षाचे किंवा प्रस्थापित शेतकरी नेत्याचे याकडे लक्ष नाही.
यावर्षी अंदाजे 13 कोटी टनापेक्षा जास्त ऊस तोडला गेला आहे त्यातील जवळपास निम्मा ऊस हा मशीन ने तोडला गेल्याचा अंदाज आहे.
अंदाजे 6 कोटी टन उसाला फक्त कमीत कमी 5% वजावट लावली आहे असं धरलं तर 30 लाख टन ऊसाची वजावट झाली आहे.
त्या 30 लाख टन उसाचा सध्याचा 2500 रुपये प्रति टन दर धरल्यास ही रक्कम 750 कोटी रुपये होते.
ही वजावटीची संपूर्ण रक्कम ही कोणाच्या खिश्यात जाते हे सांगण्याची आवश्यकता नाही.
या इतक्या मोठया रक्कमेसाठी ही इतकी धडपड कारखानदारांची सुरु आहे त्याला साखर आयुक्तांची साथ असल्यामुळे शेतकऱ्यांना राजरोसपणे लुटण्याचा प्रयत्न राज्य स्तरावर सुरु आहे आणि त्याला रोखण्याचा आमचा प्रयत्नही सुरु आहे.

धनाजी चुडमुंगे
आंदोलन अंकुश

Address

Shivaji Chowk
Shirol
416103

Telephone

+919923323157

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanaji Chudmunge संघर्ष योद्धा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhanaji Chudmunge संघर्ष योद्धा:

Share

Category