पंचायत समिती सेनगाव

पंचायत समिती सेनगाव this is the official page for panchayat samiti sengaon

https://youtube.com/shorts/dG6EAzqhif4?si=n81g2OWH-QcgOJKHआदर्श गाव आसोला येथील गणेश विसर्जन मिरवणूक....Dj  वरील  गाण्या...
06/09/2025

https://youtube.com/shorts/dG6EAzqhif4?si=n81g2OWH-QcgOJKH

आदर्श गाव आसोला येथील गणेश विसर्जन मिरवणूक....
Dj वरील गाण्याऐवजी भारुड अभंग,
गुलाला ऐवजी फुले,
पारंपारिक गणवेशात आणि पूर्ण गावात केवळ एकच गणेश मंडळ!
सर्व नियोजन मंडळाचे खूप अभिनंदन.

26/03/2025

दरवर्षी २६ मार्च रोजी साजरा केला जाणारा पर्पल डे हा एपिलेप्सीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी एक जागतिक उपक्रम आहे. हा दिवस लोकांना पर्पल कपडे घालण्यास, माहिती सामायिक करण्यास आणि एपिलेप्सीबद्दल समजून घेण्यासाठी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करतो, ही एक अशी स्थिती आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. पर्पल डे वर, एपिलेप्सी म्हणजे काय, त्याबद्दल जागरूकता कशी वाढवायची आणि उपलब्ध असलेल्या नवीनतम उपचार पर्यायांचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे. एपिलेप्सी म्हणजे काय? एपिलेप्सी ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जी भारतातील लाखो लोकांना प्रभावित करते आणि वारंवार, विनाकारण झटके देते, तरीही ती मोठ्या प्रमाणात गैरसमज राहते. मेंदूमध्ये अचानक विद्युत क्रियाकलाप वाढल्यास झटके येतात. हे झटके तीव्रतेत बदलू शकतात, ज्यामध्ये लक्ष देण्यास थोडा वेळ लागतो ते पूर्ण शरीराला आकुंचन येते. अनुवांशिकता, मेंदूला दुखापत, संसर्ग किंवा इतर अंतर्निहित आरोग्य स्थितींसह विविध घटकांमुळे अपिलेप्सी होऊ शकते.

*********************************❀ ११ एप्रिल ❀**महात्मा ज्योतिबा फुले जयंती*********************************जन्म - ११ एप...
11/04/2023

********************************
*❀ ११ एप्रिल ❀*
*महात्मा ज्योतिबा फुले जयंती*
********************************

जन्म - ११ एप्रिल १८२७ (कटगुण,सातारा)
स्मृती - २८ नोव्हेंबर १८९० (पुणे)

थोर भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म कटगुण, सातारा येथे झाला. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.

* महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८४८ मध्ये पहिली, १८५१ मध्ये दुसरी आणि तिसरी मुलींची शाळा काढली.
* महात्मा फुले शिक्षणाचे महत्व असलेले व स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय होत. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून, तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.
* अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत.
* १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.
* समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
* सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
* सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला. केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘बालहत्या प्रतिबंधगृह' ही संस्था सुरु केली.
* वयाच्या ६० व्या वर्षी जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना ‘महात्मा' ही पदवी बहाल केली. डॉ. आंबेडकर हे ज्योतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत.

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या काही कवितेच्या ओळी :
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली ,
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले ,
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले !

महात्मा ज्योतिबा फुले यांचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे देहावसन झाले. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !

अनाथाश्रम, महिला स्वागत केंद्र आणि संरक्षण गृहांमध्ये मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत ही योजना विविध सरकारी/एनजीओ संचलित...
16/02/2022

अनाथाश्रम, महिला स्वागत केंद्र आणि संरक्षण गृहांमध्ये मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत
ही योजना विविध सरकारी/एनजीओ संचलित संस्था जसे की राज्य गृह, अनाथाश्रम, निवारागृहे, माहेर योजनेंतर्गत संरक्षण गृहे आणि 18 वर्षे पूर्ण केलेल्या बालगृहे इत्यादी मुलींना लागू आहे.
रु.चा धनादेश. मुलीच्या नावाने तिच्या बँक खात्यात (राष्ट्रीयीकृत बँकेत) लग्नाशी संबंधित खर्च खरेदी करण्यासाठी आणि भांडी इत्यादी खरेदीसाठी 25,000 रुपये जमा केले जातात.

💪 जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बॅंकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे✔️ विकसनशील देशांना एकत्र आ...
14/01/2021

💪 जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बॅंकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे

✔️ विकसनशील देशांना एकत्र आणण्याच्या हेतूने १९९९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली

✔️ वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे

✔️ जी २० देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे ९० टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा ८० टक्के भाग या देशात आहे

✔️ जगाची दोनतृतीयांश लोकसंख्या या देशात राहते व जगातील निम्मा भूभाग या देशात आहे .
✔️ जी २० देश

🇺🇲 अमेरिका
🇦🇷 अर्जेंटिना
🇦🇺 ऑस्ट्रेलिया
🇧🇷 ब्राझील
🇨🇦 कॅनडा
🇨🇳 चीन
🇪🇺 युरोपियन संघ
🇫🇷 फ्रान्स
🇩🇪 जर्मनी
🇮🇳 भारत
🇮🇩 इंडोनेशिया
🇮🇹 इटली
🇯🇵 जपान
🇲🇽 मॅक्सिको
🇷🇺 रशिया
🇸🇦 सौदी अरेबिया
🇿🇦 दक्षिण आफ्रिका
🇰🇷 दक्षिण कोरिया
🇹🇷 तुर्की
🇬🇧 ब्रिटन .

14/01/2021

'पेट‘ ऑनलाईन नोंदणीला १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद, दि.१२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाच्यावतीने ‘पेट‘साठी ऑनलाईन नोंदणीस येत्या १८ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

पीएच डी प्रवेशपूर्व परीक्षा (पेट ) साठी १ जे ११ जानेवारी दरम्यान ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. दरम्यान, आज पुन्हा आठ दिवसासाठी मुदतवाढ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट‘ पहिला पेपर घेण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात येईल. त २१ फेब्रुवारी रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल. तर १४ फेब्रुवारी रोजी निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २८ फेब्रुवारी रोजी लागेल. प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी मार्चमध्ये तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या (आर आर सी) बैठका घेण्यात येणार आहेत. ४२ विषयात ‘पेट‘ होणार असून विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.

*नेट-सेट धारकांना 'पेट'मधून सुट*

‘पेट‘चा दुसरा टप्पा १ मार्च ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या काळात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सुट मिळालेले दुस-या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी‘ मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. १ ते १५ मार्च दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. तर २० मार्च पर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या (आरआरसी ) बैठका होणार आहेत, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळविले आहे.

………
संजय शिंदे
जनसंपर्क अधिकारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

English Grammar notes !
13/01/2021

English Grammar notes !

जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.राजमाता जिजाऊ...
12/01/2021

जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.
राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाईंना एकूण आठ(८) अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.

शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[४]

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.
राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-

जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर

जेधे शकावली

शिवभारत

जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )

जिजाई : मंदा खापरे ट

गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव

अग्निरेखा

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सन 1635 ला पुण्यात लाल महाल बांधून पुणे मुक्कामी राहू लागल्या, आदिलशाहीचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते. पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्षे वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली. सोबत रायनाक या दलिताचा मुलगा, रामोश्याचा, मातंगाचा आणि लोहाराचा एक अश्या पाच बालकांनी नांगर चालवून शापित भूमी नांगरली. वाघोलीच्या रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भटाचा थयथयाट झाला आणि आता शिवाजी राजा मरेल अशी भिती या भटद्वयांनी पेरली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अश्या धमक्यांना पुरुन उरणार्या होत्या, जिजाऊंनी शिवबाला नांगर तसाच सुरू ठेवावा असे फर्मावले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. समतेचे‌, न्यायाचे, ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले. धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील भटांनी रोवलेल्या सर्व पहारी उखडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणार्या तलवारी तयार करण्यात आल्या संपूर्ण पुण्याची शापित पांढरी जमिन कसण्यास सुरुवात केली.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌. तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने बाळाजी हैबतराव या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली. स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करुन खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला, तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खुन केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेवून अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.

1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करुन कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका,
2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला.
3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे अठरापगड जातींच्या मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

11/01/2021
🗓️ २००३ पासून दरवर्षी ०९ जानेवारीला " प्रवासी भारतीय दिवस " साजरा करण्यात येत आहे✔️ याच दिवशी १९१५ ला महात्मा गांधी आफ्र...
09/01/2021

🗓️ २००३ पासून दरवर्षी ०९ जानेवारीला " प्रवासी भारतीय दिवस " साजरा करण्यात येत आहे

✔️ याच दिवशी १९१५ ला महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतात परतले होते

✔️ २००३ साली सर्वात प्रथम प्रवासी भारतीय दिवस हा नवी दिल्लीत साजरा करण्यात आला होता

🚫 २०१६ मध्ये काही कारणास्तव या दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते

🏢 केंद्र सरकारने प्रवासी भारतीय केंद्राचे नाव बदलून " सुषमा स्वराज भवन " असे केले आहे .
✔️ प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन स्थळे २००३ पासून २०२१ पर्यंत

🔰 २००३ : नवी दिल्ली
🔰 २००४ : नवी दिल्ली
🔰 २००५ : मुंबई
🔰 २००६ : हैदराबाद
🔰 २००७ : नवी दिल्ली
🔰 २००८ : नवी दिल्ली
🔰 २००९ : चेन्नई
🔰 २०१० : नवी दिल्ली
🔰 २०११ : नवी दिल्ली
🔰 २०१२ : जयपूर
🔰 २०१३ : कोची
🔰 २०१४ : नवी दिल्ली
🔰 २०१५ : गांधीनगर
🔰 २०१७ : बंगळुरू
🔰 २०१९ : वाराणसी
🔰 २०२१ : आभासी माध्यम( online).
✔️ प्रवासी भारतीय दिन व प्रमुख पाहुणे (२००३ ते २०२१)

👤 २००३ : अनिरुद्ध जुगनाथ , पंतप्रधान (मॉरीशस)
👤 २००४ : भारत जगदेव , राष्ट्रपती (गुयाना)
👤 २००५ : जे आर अजोधिया , उपराष्ट्रपती (सुरीनाम)
👤 २००६ : के अहमद (दक्षिण आफ्रिका)
👤 २००७ : एस जयकुमार , उप पंतप्रधान (सिंगापूर)
👤 २००८ : आर नवीनचंद्र , पंतप्रधान (मॉरीशस)
👤 २००९ : एस रामदेईन , उपराष्ट्रपती (सुरीनाम)
👤 २०१० : डॉ. खालिद हामीद , (ब्रिटन)
👤 २०११ : आनंद सत्यानंद , (न्यूझीलंड)
👤 २०१२ : बी कमला प्रसाद (त्रिनिदाद अॅन्ड टोबॅगो )
👤 २०१३ : पी राजकेश्वुर , राष्ट्रपती (मॉरीशस)
👤 २०१४ : डी पलानीवेल , (मलेशिया)
👤 २०१५ : डी रबिंद्रनाथ , (गुयाना)
👤 २०१७ : अन्टोनिओ कोस्टा , पंतप्रधान (पोर्तुगाल)
👤 २०१९ : प्रविंद जुगनाथ , पंतप्रधान (मॉरीशस)
👤 २०२१ : चंद्रिका प्रसाद संतोखी , राष्ट्रपती (सुरीनाम).

08/01/2021

✅ महाराष्ट्राचे आतापर्यंतचे पोलीस महासंचालक
👮 नारायणराव मारुतीराव कामटे : १९४७-५५
👮 मानसिंघजी मेरूजी चुडासमा : १९५५-५९
👮 कुमार श्री प्रवीणसिंगजी : १९५९-६०
👮 कैकश्रू जहांगिर नानावाती : १९६० ते १९६५
👮 सय्यद मजीदुल्लाह : १९६५ ते १९६८
👮 अनंत गणेश राजाध्यक्ष : १९६८ ते १९७५
👮 महारुद्र गणपतराव वाघ : १९७५ ते १९७६
👮 इमानुअल सुमित्रा मोडक : १९७६ ते १९७८
👮 मधुकर गणपत मुग्वे : १९७८ ते १९७८
👮 श्रीधर व्यंकटेश तांखीवाला : १९७८ ते १९७८
👮 विनायक वासुदेव चौबाल : १९७८ ते १९७९
👮 वसंत विनायक नगरकर : १९७९ ते १९८०
👮 रामदास लक्ष्मण भींगे : १९८० ते १९८१
👮 सुशिलकुमार चतुर्वेदी : १९८१ ते १९८२
👮 कृष्णकांत पांडुरंग मेढेकर : १९८२ ते १९८५
👮 सुर्यकांत शंकर जोग : १९८५ ते १९८७
👮 दत्तात्रय शंकर सोमण : १९८७ ते १९८८
👮 सत्येंद्र प्रसन्न सिंह : १९८८ ते १९८९
👮 रामकांत शेशगीरीराव कुलकर्णी : १९८९ ते १९८९
👮 वसंत केशव सराफ : १९९० ते १९९२
👮 एस. राममूर्ती : १९९२ ते १९९३
👮 शिवाजीराव वि बारावकर : १९९३ ते १९९४
👮 ए. व्ही. कृष्णन : १९९४ ते १९९५
👮 सुरेंद्र मोहन पठानिया : १९९५ ते १९९६
👮 अमरजित सिंघ समारा : १९९६ ते १९९७
👮 अरविंद सिद्धेश्वर इनामदार : १९९७ ते २०००
👮 सुभाष चंद्र मल्होत्रा : २००० ते २००३
👮 ओम प्रकाश बाली : २००३ ते २००३
👮 सुरेंद्र मोहन शंगारी : २००३ ते २००४
👮 कमल कृष्ण कश्यप : २००४ ते २००५
👮 पी.एस. पासरिचा : २००५ ते २००८
👮 अनामी नारायण रॉय : २००८ ते २००९
👮 एस. एस. विरक : २००९ ते २००९
👮 अनामी नारायण रॉय : २०१० ते २०१०
👮 डी. सिवानंधान : २०१० ते २०११
👮 अजित पारसनीस : २०११ ते २०११
👮 के. सुब्रमण्यम : २०११ ते २०१२
👮 संजीव दयाल : २०१२ ते २०१५
👮 प्रवीण दिक्षीत : २०१५ ते २०१६
👮 सतीश माथुर : २०१६ ते २०१८
👮 डी. डी. पडसलगीकर : २०१८ ते २०१९
👮 एस. के. जैस्वाल : २०१९ ते २०२१
👮 हेमंत नगराळे : २०२१ पासून .

Address

Sengaon
431542

Telephone

+919689335580

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पंचायत समिती सेनगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share