Shirshinge

Shirshinge Shirshinge means hevan

09/03/2024

गणपतीत गावाला जात आहात ,
गावाला पोहचले असाल.
वेळ काढून निदान यावर विचार करा...

कोकण काल ,आज आणि उद्या.

कोकणात जैवविविधता , अफलातून सुंदर निसर्ग भरपूर आहे.
डोंगर , नद्या, खाड्या, जंगल, धबधबे ,झरे , समुद्र किनारे , पठार , वन्य जीव ,पश्चिम घाट ...
भात शेती , बागायती , मासेमारी ,पर्यटन...

पण कोकणी माणूस -
*निसर्गाने भरभरून दिल्यामुळे किमान पोट भरायला संघर्ष करायला लागला नाही.
म्हणून कदाचित*
अल्पसंतुष्ट.

पोटापुरते मिळाले की उगाच अजून काही जास्त मिळवून भविष्याची बेगमी करण्याच्या फंदात सहसा पडला नाही.

मुंबईत -
आधी गिरण्या , घरगडी - बाई, शिपाई , कपडा आदी मार्केट मध्ये सेल्समन आणि अन्य उद्योगात अर्ध कारागीर वैगरे नोकऱ्या...
कोकणातून मुंबई व परिसरात स्थलांतराचा सतत पॅटर्न.

आर्थिक जाणं बेताचीच. पैसा कळत नाही.
मुंबईवर कधी आर्थिक कंट्रोल नव्हता.
गुजराती , मारवाडी , शेट्टी , दक्षिणी , पारशी आदी समूह रुल करत राहिले.
मनी ऑर्डर इकॉनॉमी कोकणात रुळली.
७०-८० मध्ये भाईगिरी. शोबाजी.
भावनिक शोषण करणाऱ्या पक्षांच्या उदयामुळे नादाला लागणे आलेच.

*आर्थिक दुर्बलतेतून आलेल्या न्यूनगंडातून थोडा आक्रस्ताळा आक्रमकपणा किंवा पराभूत मानसिकता.*

१९९० नंतर विमुक्तआर्थिक धोरणे राबवली गेली.
पैसा बाजारात येऊ लागला. पण त्यात कोकणी काही वाटेकरी होऊ शकला नाही.
मारवाडी - गुजराती यांच्याकडे हार्डवेअर , कपडा , स्वीट मार्ट ..
मुंबई परिसरात तरुणाई निम्न दर्जाचे जॉब करत असताना कोकणात आलेल्या एम आय डी सी व अन्य उद्योगात लेबर म्हणून उत्तर प्रदेश , बिहार येथून आलेले कामगार स्थिरावले.
बोटींवर नेपाळी (तराई भागातले) खलाशी , माकडापासून बागा राखणारे (पहाडी भागातले) नेपाळी , चिरेखणीवर धारवाडी , सामान्य कारागिरी भैय्या..

हळू हळू जगणे महाग होत गेले.
लग्न , आजारपण , मुंबई परिसरात छोटी का असे ना रूम ची आकांशा , भाऊ बंदकी , शेतीतले कमी उत्पन्न , शेतीत नाविन्याचा अभाव , न मिळणारे व न परवडणारे लेबर , रिस्क घ्यायच्या क्षमतेचा अभाव , भावनिक आर्थिक निर्णय...
*वडिलोपार्जित जमीन विकण्यासाठी एक ना अनेक कारणे.*

अलिबाग , महाड , दापोली , माणगाव , इंदापूर ,चिपळूण ,रत्नागिरी ,कुडाळ ...
सर्व मुख्य मार्केट परप्रांतियांकडे गेली.
मौक्याच्या जागा गुंतवणूकदारांकडे.
बिल्डर लॉबी मुख्यत्वे.

ग्रामसेवक , शिक्षक ,तलाठी आदी नोकऱ्या बहतांश कोकणाबाहेरच.

अपवाद वगळता कणाहिन , दूरदृष्टी नसलेले , राजकीय नेतृत्वच नशिबी. निर्णय प्रक्रियेत दबदबा नसणे , राजकारणात दुय्यम स्थान , कामगार युनियनस मधून उदयास आलेल्या सेटिंग बाज नेतृत्वाची चलती ....आणि या नेत्यांच्या नादाला लागणारी जनता.
नेता भाईच ...दादागिरी करणारच पाहिजे...मासिहा मानसिकता.

जंगल तोड , अवैध मासेमारी , दगडखाणी, रेती उपसा ...क्षणिक लाभासाठी निसर्गाची हानी करण्याकडे वाढता कल. कळणे , रेडी ची झालेली हानी.

दोडामार्ग - सावंतवाडी भागात केरळी लोकांचा हैदोस. रब्बर , अननस लागवडीसाठी बेसुमार जंगल तोड. स्थानिक तेथेच त्यांच्या इस्टेटी राखायला.

बोईसर , पाताळगंगा , सावित्री , वाशिष्ठी , कुंडलिका प्रदूषणाने ग्रस्त. वायू प्रदूषणाने वेढलेल्या एम आय डी सी. गमावलेले पारंपारिक रोजगार.

मोठ्या प्रकल्पाच्या बाबतीत...जमिनी आधीच गेलेल्या , कंत्राटी कामगार , परप्रांतियांना मिळणारा प्रेफ्रंस , निम्न दर्जाच्या नोकऱ्या..

नवी मुंबई ,रायगड पासून सुरू झालेले हे दुष्टचक्र रत्नागिरी - सिंधुदुर्गात येऊन ठेपलय.
१४ वर्षे ५०० किमीचा हायवे होतोय.
सागरी महामार्ग अजून पुरा नाही. आजू बाजूच्या जमिनी विकल्या गेलेल्या.
त्यात गरज नसताना अजून या दोन हाय वे मधला ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवे.या हायवेच्या आजू बाजूच्या जमिनीही आता पटापट विकल्या जात आहेत.
हा हायवे म्हणजे कोकणाचे अनिर्बंध औद्योगिकीकरण...हिरवेगार पणा गमावण्याची नांदी.

राजकीय अनास्था , नसलेले भांडवल, पैसा कमवायची नसलेली क्षमता , फुकाचा जातींचा अभीमान, अर्थिक धोका पत्करता न येणे , संकुचित विचार , गाव - देवस्की, बैठका , जीर्णोद्धार , ढोल ताशे , मिरवणुका ...वाढती धर्मांधता.
आदीतून बाहेर यायचा वेग मंद.

केमिकल एम आय डी सी , मायनिंग , क्वारी, अनधिकृत मासेमारी , औष्णिक ऊर्जा , स्टील प्लांट , रिफायनरी , केमिकल झोन...
अभिनंदन लोढा (अंजर्ले) सारख्यांकडे गमावलेले सुंदर किनारे...
मोठाली बंदरे व त्या बंदराना आवश्यक आयात- निर्यातीसाठी प्रदूषण करणारे उद्योग. त्यासाठी गिळंकृत होणाऱ्या जमिनी.

कसे वाचविणार कोकणाला?

त्यात हवामान बदलाचा धोका. वाढणारी वादळे ,जमिनीत घुसणारा समुद्र , घटती मासेमारी , बे भरवशाचा आंबा...न परवडणारी भात शेती.
आर्थिक बाहुबली तर राजकारण्यांशी हात मिळवून कोकण गिळायला बसलेच आहेत.

काय उपाय???
कोकणी माणूस काय करणार?
म्हणजे तुम्ही आणि मी...

- Satyajit

© Vineet Salgaonkar

14/01/2024
14/01/2024
13/01/2024
13/01/2024
13/01/2024
07/01/2024

Address

VEER WADI AP SHIRSHINGE
Savantvadi
416415

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirshinge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share