Amhi Kumthekar - आम्ही कुमठेकर

Amhi Kumthekar - आम्ही कुमठेकर कुमठे गावच्या माहितीसाठी अधिकृत फेसबुक पेज

16/05/2026

🚩 श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज

स्वराज्याचे स्वप्न पाहणारा राजा…
जनतेसाठी जगणारा नेता…
आणि शौर्य, धैर्य, स्वाभिमान यांचा जाज्वल्य इतिहास! 🔥

आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आजही जिवंत आहे छत्रपतींची प्रेरणा 🙏

॥ जय शिवराय ॥ 🚩

13/05/2026

❤️❤️❤️

दि. 10 मे 2026 रोजी या मंगल दिवशी आपल्या कुमठे गावचे ग्रामदैवत श्री. ज्योतिर्लिंग देवाचे नयनरम्य, मन मोहून टाकणारे दिव्य...
10/05/2026

दि. 10 मे 2026 रोजी या मंगल दिवशी आपल्या कुमठे गावचे ग्रामदैवत श्री. ज्योतिर्लिंग देवाचे नयनरम्य, मन मोहून टाकणारे दिव्य रूप पाहण्याचे भाग्य लाभले…
ही पावन क्षणं जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवोत हीच प्रार्थना…🌼

#कुमठेगाव #ग्रामदैवत #ज्योतिर्लिंगदेव

🚩 स्वराज्यसंरक्षक, धर्मरक्षक, शौर्य आणि त्यागाची जाज्वल्य परंपरा… 🚩छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त मनःपूर्वक अ...
09/05/2026

🚩 स्वराज्यसंरक्षक, धर्मरक्षक, शौर्य आणि त्यागाची जाज्वल्य परंपरा… 🚩

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त मनःपूर्वक अभिवादन! 🙏

शिवरायांच्या विचारांचा वारसा जपत, स्वराज्यासाठी अखंड लढणाऱ्या आणि धर्मासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या महान पराक्रमी राजाचे स्मरण म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. 🔥

“शिवरायांची परंपरा… स्वराज्याची शपथ…
संभाजी महाराजांचा आदर्श… आपला श्वास!”

कुमठे ते किल्ले पुरंदर या अभिमानाच्या प्रवासात आपण सर्वजण सहभागी होऊ या! 🚩

📅 वर्ष पहिले – 14/05/2026

जय जिजाऊ! जय शिवराय! जय संभाजी महाराज! 🚩🔥

#संभाजीमहाराज #शिवराय #स्वराज्य #जयंतीउत्सव #कुमठेतेपुरंदर

कुमठ्याच्या धडाकेबाज कामगिरी सलाम...... काल दिनांक सहा.. गायरान बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता कोरेगावचे...
07/05/2026

कुमठ्याच्या धडाकेबाज कामगिरी सलाम...... काल दिनांक सहा.. गायरान बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता कोरेगावचे पीआय यांच्याबरोबर गायरान मोजणीस हरकत याविषयीची चर्चा झाली. निवेदन घेऊन तुमच्या भावना वर कळवतो असे सांगून भूमी अभिलेख कार्यालयात एक निवेदन द्या.. असा पर्याय निघाला. भूमी अभिलेख कार्यालयात निवेदन घेऊन गेले असता कळले की कुमटे गायरान मोजणीस पोलीस संरक्षण घेऊन कोरेगाव नगरपालिका चे अधिकारी व कर्मचारी, भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, सातारा पोलिसांची जादा कुमक यांची मदत घेऊन मोजणीच्या तयारीत आहेत... मग मात्र नाट्यमय घडामोडींना वेग आला.. गावात माहिती मिळाल्यावर कुमट्यातील नागरिक तरुण वर्ग वनीकरणाच्या दिशेने निघाले... मोठा फौजफाटा असून सुद्धा अतिशय निर्भीड पद्धतीने कुमठ्याचा काय पारा असतो तो दाखवल्यावर कोरेगाव नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हद्दीबाहेर जायला सांगितले. पोलीस प्रशासनाने ही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न्यायाची भूमिका घेत भूमिलेख अधिकारी व पोलीस प्रशासनाने शांततेत निवेदन घेऊन ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले व आंदोलनास वेगळे वळण लागू नये याची काळजी घेतली.. अशाच प्रकारचे निवेदन त्यानंतर तहसीलदार व प्रांत साहेबांना दिले.. हा सगळा प्रसंग अनुभवताना. गावच्या एकीचा चमत्कार पाहायला मिळाला . अन्यायाविरुद्ध चांगलाच वचक बसला. नुसत्या मेसेजवर आणि फोन वर शे पाचशे माणसं गोळा झाली. टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन.. त्या सर्वांचे शतश आभार... विषय जेव्हा गावावर येतो तिथे दुफळी नाही.. पक्ष नाही.. अन पुढच्याला सुट्टी ही नाही

28/04/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमठे नं. १
✨ वार्षिक स्नेहसंमेलन २०२५–२०२६ ✨

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत, आणि आनंदाने भारलेले वातावरण… या स्नेहसंमेलनाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि अभिमानाची भावना निर्माण केली.शाळेच्या प्रगतीचा आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा हा सुंदर उत्सव… सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

#वार्षिक_स्नेहसंमेलन

28/04/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमठे नं. १
✨ वार्षिक स्नेहसंमेलन २०२५–२०२६ ✨

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत, आणि आनंदाने भारलेले वातावरण… या स्नेहसंमेलनाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि अभिमानाची भावना निर्माण केली.शाळेच्या प्रगतीचा आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा हा सुंदर उत्सव… सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

#वार्षिक_स्नेहसंमेलन

धारनाथ महाराज मठ, कुमठे ✨आपल्या कुमठे गावाची आध्यात्मिक ओळख म्हणजे धारनाथ महाराज मठ ही केवळ एक जागा नाही, तर श्रद्धा, भक...
27/04/2026

धारनाथ महाराज मठ, कुमठे ✨

आपल्या कुमठे गावाची आध्यात्मिक ओळख म्हणजे धारनाथ महाराज मठ ही केवळ एक जागा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि शांततेचं पवित्र स्थान आहे.

या मठामध्ये येताच मनाला एक वेगळीच समाधानाची भावना मिळते…
गावातील प्रत्येकाच्या आयुष्यात या ठिकाणाला खास स्थान आहे.
धारनाथ महाराजांच्या कृपेने अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले, आणि आजही त्यांच्या आशीर्वादाने भक्तांची मनोकामना पूर्ण होत आहे. 🌸

गावाची परंपरा, संस्कृती आणि श्रद्धा जपणारा हा मठ आपल्या कुमठे गावाचा खरा अभिमान आहे… 🚩

👉 एकदा तरी नक्की भेट द्या आणि त्या दिव्य अनुभूतीचा अनुभव घ्या.

#कुमठे #धारनाथमहाराज #श्रद्धा #भक्ती

Address

At Post Kumthe Tel-Koregaon Dist-Satra
Satara
415501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amhi Kumthekar - आम्ही कुमठेकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category