01/09/2018
Important Alert, who are planning to visit Kaas plateau on 2nd Sept. 2018.
हिल मॅरेथॉनसाठी सातारा शहरातील वाहतुकीत बदल
सातारा, दि. 31: सातारा शहरामध्ये 2 सप्टेंबर रोजी हिल मॅरेथॉन-2018 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे दि.2 सप्टेंबर रोजी पहाटे 4 ते सकाळी 11 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्पर्धक, नागरिकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत पुढीलप्रमाणे बदल केले आहेत.
जिल्हा तालिक संघाचे मैदान-मोती चौक-समर्थ मंदिर-प्रकृती हिल रिसोर्ट-गणेख खिंड पुढे अखरेच्या वळण पॉईन्टवरुन परत त्याचमार्गाने समर्थ मंदिर-अदालत वाडा-शाहु चौक- अलंकार हॉल हा मार्ग रुग्णवाहिक, पोलीस वाहने अग्निशामक दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल.
जिल्हा तालिक संघाकडे येणारे मार्गावरील बगाडे हॉस्पीटल चौक, ट्रॉफिक ऑफिस पासुन पुढे शाहुचौकाकडे जाण्याकरीता तसेच राजसपुरा पेठेतील मौलाली दर्गा चौक पासुन पुढे जिल्हा तालिक संघ मैदानकडे जाणे करीता सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद राहिल.
शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोलीमार्गे पोवईनाका बाजुकडे येणारी सर्व वाहने बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौक- वाढे फाटा-भुविकास बॅक मार्गे सातारा शहरात ये जा करतील. बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौकातून पोवईनाका बाजुकडे येणारी सर्व वाहने वाढे फाटा -भुविकास बॅक मार्गे सातारा शहरात ये जा करतील. मुख्य बसस्थानक - राधिका सिग्नल- तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्ग कडे जाणारी सर्व वाहने ही भुविकास बॅक-जुना आर.टी.ओ चौक- जरंडेश्वर नाका वाढे फाटा मार्गे सातारा शहराच्या बाहेर जातील. सज्जनगड,ठोसेघर,परळी कडून येणारी-जाणारी सर्व वाहने ही भुविकास बॅक -जुना आर.टी.ओ चौक - जरंडेश्वर नाका-वाढे फाटा-शेंद्रे मार्गे ये जा करतील. कास बाजुकडून सातारा शहर बाजुकडे येणारी वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यत सातारा बाजुकडे येणार नाहीत किंवा पर्यायी मार्गाने सातारा शहराकडे येतील.
हिल मॅरेथॉन स्पर्धाकरीता येणारे स्पर्धकांनी व नागरिकांनी आपली वाहने ही नवीन नियोजीत शिवाजी संग्रहालय इमारतीचे पुढे असणारे मोकळ्या मैदानामध्ये, कलेक्टर ऑफिस ते जिल्हा परिषद ग्राऊंड रस्त्यांचे दोन्ही बाजुस, वाय.सी.कॉलेज व गांधी मैदान राजवाडा येथे लावावीत.
या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.