30/12/2025
"स्त्री, तिचं शरीर आणि एक वेगळं दृष्टिकोन"
स्त्रीच्या योनी आणि स्तनांबद्दल पुरुषांच्या आकर्षणाची मानसिकता ही एक गंभीर गोष्ट आहे. हे आकर्षण कधी प्रेम म्हणून समजलं जातं, तर कधी केवळ शरीराची भूक म्हणून पाहिलं जातं. लग्नाआधी मला देखील असे विचार आले होते. घरच्यांनी माझ्यासाठी प्रीती नावाची मुलगी पाहिली, आणि आमचं लग्न ठरलं.
शुरुवातीला प्रीतीचं सुंदर, सुडौल शरीर पाहून आकर्षित होणं हे खूप नैसर्गिक होतं. पण मनात एक प्रश्न सतत होताच:
"हे प्रेम तिच्यावर आहे की तिच्या शरीरावर?"
सुरुवातीचं लग्नसंस्कार आणि संगमाचे क्षण आनंददायी होते. पण जेव्हा प्रीती काही वेळा नकार देई, तेव्हा मला खूप त्रास होई, आणि काही दिवस आमचं बोलणंही बंद होई. मात्र जेव्हा आम्ही जवळ येत होतो, तेव्हा सगळं व्यवस्थित होई.
काही महिन्यांनंतर प्रीती गर्भवती झाली. तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. पुढे कळलं की तिचं नॉर्मल डिलीव्हरी करणं कठीण होतं. ऑपरेशनचा विचार मनात होता, पण काही डॉक्टरांनी सांगितलं की योग्य काळजी घेतली तर नॉर्मल डिलीव्हरी होऊ शकते.
९ मार्चला तिला रुग्णालयात दाखल केलं. डिलीव्हरीच्या वेळी ती वेदनेने तडफडत होती, तिच्या पल्स कमी होऊ लागल्या, आणि ती बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी मला बोलावलं आणि परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी सांगितलं की मी तिला मोटिवेट करावं.
मी तिला धीर देण्यासाठी तिच्या समोर उभा राहिलो. तिथे माझ्या डोळ्यासमोर माझी पत्नी नग्न अवस्थेत होती. तिच्या योनीतून बाळ बाहेर येत होतं. त्या क्षणी मला जाणवलं की जे शरीराचा मोह मला नेहमी वाटायचा, त्याचा एक वेगळा अर्थ समोर आला होता.
बाळ बाहेर आलं, आणि डॉक्टरांनी त्याला प्रीतीच्या स्तनावर ठेवून त्याला उष्णता दिली. हीच ती जागा होती, जिथे जन्म आणि पोषण दोन्हीचं एकत्र दर्शन होतं.
त्या दिवसानंतर माझ्या पत्नीबद्दलचा दृष्टिकोन बदलला. ती फक्त शरीर नव्हे, ती एक स्त्री आहे, जी एका नवीन जीवाला जन्म देण्यासाठी प्रचंड वेदना सहन करते. त्या क्षणी मी तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणं शिकलो.
याशिवाय माझ्या आईबद्दलचा आदरही अनेक पटींनी वाढला. मला जाणवलं की माझ्या जन्मासाठी तिने किती वेदना सहन केल्या असतील.
मुलांनो, जो आपल्या पत्नीला फक्त संभोगाचं साधन समजतो, त्याने एकदा तरी प्रसुतीच्या वेळी तिला पाहावं. तो क्षण तुम्हाला स्त्रीचं खरं महत्व शिकवेल.
आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका 😊
© Silent Killer (Sandeep Chavan)
® Common Man Think
नोट: लेख कॉपी पेस्ट करताना credit डिलिट करू नये अन्यथा कार्यवाही केली जाईल
#स्त्रीचा_त्याग #आईचा_आदर #खरं_प्रेम #जीवनाचं_खरं_तत्त्व