31/05/2026
📍खटाव (जि. सातारा) 🗓️ ३० मे २०२६
#खटाव येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मा. उपाध्यक्ष, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. महेशदादा शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई महेशदादा शिंदे यांच्या खटाव येथील निवासस्थानी आयोजित स्नेहभोजन - संवाद बैठक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या बैठकीदरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावोगावी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे, महिला व युवक सक्षमीकरण तसेच शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती यांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार (भाऊ) गोरे, सौ. सोनियाताई गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, सातारा जिल्हा भाजपा मा.अध्यक्ष धैर्यशील कदम, सत्यजित पाटणकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैया भोसले, सातारा जिल्हा परिषद सर्व समितींचे सभापती, सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष , जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.