आपल काशीळ

आपल काशीळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपल काशीळ, Landmark & historical place, At Post Kashil, Satara.

जय श्रीराम 🚩
12/12/2023

जय श्रीराम 🚩

श्रीराम यात्रा नवरात्र उत्सव काशिळजय श्रीराम 🚩
07/12/2023

श्रीराम यात्रा नवरात्र उत्सव काशिळ

जय श्रीराम 🚩

फक्त दोन दिवस बाकी....बाप्पा आपला येणार गणपती बाप्पा मोरया
16/09/2023

फक्त दोन दिवस बाकी....

बाप्पा आपला येणार

गणपती बाप्पा मोरया

29/06/2023

खुप वर्षाच्या प्रतिक्षेनंतर काशिळचा आठवडी बाजार आज आषाढ़ी एकादशी या शुभ दिवशी सुरु झाला...

काशिळकरांचा उदंड प्रतिसाद आणि उत्साह यावेळी दिसून आला असाच प्रतिसाद आणि उत्साह दर गुरुवारी असावा ही सदिच्छा.

आठवड़ी बाजार वार - गुरुवार
ठिकाण - काशिळ स्टैंड परिसर, काशिळ

Madhav Mane Saagar Mane Ganesh Mane Vinod Mane

सर्व काशिळकरांचे अभिनंदन....
20/06/2023

सर्व काशिळकरांचे अभिनंदन....

🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩काल स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आमच्या काशिळ म...
16/05/2023

🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

काल स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आमच्या काशिळ मधील श्रीराम प्रतिष्ठानच्या उत्कृष्ठ नियोजनाने आणि उपस्थित सर्व शिवशंभु भक्तांच्या साथीने संपन्न झाली....

हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली आणि समर्थ सांप्रदायाची भूमी असलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या किल्ले सज्जनगड येथून मावळ्यांनी शंभु ज्योत आणली होती...

गतवर्षी प्रमाणे याही वर्षी मिरवणूक ही रामकृष्णनगर मधून सुरु झाली...मिरवणुकी मध्ये आदित्य ऑडियो ही डॉल्बी सिस्टम वापरण्यात आली....

त्तपुर्वी काशिळ मधील जुन्या गावात चावडी चौक येथे छत्रपती इवेंट यानी भव्य दिव्य स्टेज उभारल होत... या मध्ये शंभुज्योत ठेवण्यासाठी स्टैंड, महाराजांची प्रतिमा तर समोर मावळे आणि ग्रामस्थ बसन्याकरीता कापड़ी मैटची बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती....

शिवशंभु गर्जना करत मिरवणूक हळू हळू काशिळ गावात आली तेथून माळावरुण यशवंत हायस्कूल मार्गे नवीन ग्रामपंचायत मार्गे स्टैंड वर आली येथे शिवकालीन मर्दानी खेळ असलेल्या शिवबा दांडपट्टा पथक अतीत यांचा दांड पट्टा डाव झाल्या नंतर मिरवणूक गांधीनगर येथील दत्त मंदिर पासून स्टैंड मार्गे जुन्या गावातील भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आलेल्या चावडी चौकात आली....

येथे सुद्धा दांडपट्टा चा चित्तथरारक डाव झाला, या डावाने उपस्थितांची व्हावा मिळवली....तदनंतर युवा कीर्तनकार वीरेंद्र यादव कवठेकर याने आपल्या अमोघ वाणी ने सर्वाना मंत्र मुग्ध केले...

बाल व्याख्यान झाले नंतर मुख्य व्याख्याते हरि भक्त परायण संतोष महाराज ढाणे यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच चरित्र सांगून जयंती सोहळयाची शोभा वाढवली....

ध्येय मंत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारतमाता की जय, हिंदु धर्म की जय, जय श्रीराम म्हणत जयंती सोहळ्याची सांगता झाली...

श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांचे आभार...

जय शिवराय 🚩
शिवराय असे शक्तीदाता 🚩

©राजेंद्र पाटील, श्रीराम प्रतिष्ठान, काशिळ

20 क्विंटल फुलांच्या सजावटीत सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज केदारनाथ धाम चे दरवाजे भाविकांसाठी उघडले 🙏🚩आजचे विहंगम दृ...
25/04/2023

20 क्विंटल फुलांच्या सजावटीत सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज केदारनाथ धाम चे दरवाजे भाविकांसाठी उघडले 🙏🚩

आजचे विहंगम दृश्य 🙏
जय श्री केदार 🚩🚩

13/09/2020

परतीचा मानसून 😍🌧️

© Aniket Mane Photography

पहाट झालीसोन किरणे आलीधरती चकचकु लागलीसोनेरी सकाळ झालीठिकाण- उरमोडी काठ, काशीळ
09/11/2019

पहाट झाली
सोन किरणे आली

धरती चकचकु लागली
सोनेरी सकाळ झाली

ठिकाण- उरमोडी काठ, काशीळ

पाल नगरी सजलीभक्तांच्या स्वागता आतुरलीव्हराडी बैलगाडी घेऊन निघालेमानाच्या काठ्या गाडे जमु लागलेलग्न सोहळा खंडेरायाचाजल्ल...
17/01/2019

पाल नगरी सजली
भक्तांच्या स्वागता आतुरली

व्हराडी बैलगाडी घेऊन निघाले
मानाच्या काठ्या गाडे जमु लागले

लग्न सोहळा खंडेरायाचा
जल्लोष भक्तांचा

येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट

आज यात्रेच्या आदल्या दिवशी पालीच्या म्हाळसाकांताची सिंहासनारुढ़ बांधलेली अलंकारिक महापूजा

उद्याच्या देव खंडोबा आणि म्हाळसा यांच्या विवाह सोहळ्यास यावे....

Address

At Post Kashil
Satara
4115519

Telephone

8149014758

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपल काशीळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share