शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना

  • Home
  • India
  • Satara
  • शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक क्षेत्रातील महत्वपूर्ण संघटन

श्रीक्षेत्र पैठण येथील सोहळ्यास व्हिडिओ कॉल द्वारे उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभेच्छा देत सहभाग दर्शवला...
01/01/2026

श्रीक्षेत्र पैठण येथील सोहळ्यास व्हिडिओ कॉल द्वारे उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभेच्छा देत सहभाग दर्शवला. त्याचे शब्द संकलन..

बोला पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल… ||

शरण शरण एकनाथा | पायी माथा ठेविला ||

गुरु–भक्ती–ऐश्वर्य परंपरा सोहळा, पैठण येथे आयोजित या पवित्र उत्सवास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज या सोहळ्याची सांगता होत आहे. वास्तविक मी स्वतः या उत्सवास उपस्थित राहणार होतो. आदरणीय योगीराज महाराज गोसावी यांनी प्रत्यक्ष भेटून मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. मनापासून येण्याची इच्छा होती; मात्र कार्यबाहुल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य झाले नाही. तथापि माझे व आपले सर्वांचे प्रतिनिधी म्हणून अक्षय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा मला आनंद आहे.

उपस्थित संत, कीर्तनकार, गायक वादक, लाडके वारकरी आणि लाडक्या बहिणी... सर्वांना माझा राम कृष्ण हरि..

मला आठवतंय ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, तुकाराम महाराज कळस झाले पण या इमारतीचा प्रत्यक्ष आधार व खांब आपल्या सर्वांचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते.“जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत |”

वारकरी संप्रदायाच्या वाटचालीत संत एकनाथ महाराज हे एक भक्कम आधारस्तंभ आहेत. त्याच परंपरेचे वारसदार म्हणून योगीराज महाराज गोसावी यांचे कार्य अत्यंत अलौकिक आहे. एकनाथ महाराज मिशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेले उपक्रम अभिनव असून, संत साहित्याचा संस्कार घरोघरी पोहोचवणारे आहेत. संत एकनाथ महाराजांचे अभंग उन्नत, सात्त्विक आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा देतात. परमार्थ आणि प्रपंच यांचा सुंदर समन्वय महाराजांच्या कार्यातून आम्हाला सतत अनुभवायला मिळतो. देवाने ज्यांच्या घरी सेवा करावी, ते आमचे एकनाथ महाराज अशीच वारकऱ्यांची भावना आहे.

माझे नावही एकनाथ आहे. जसे संत एकनाथ महाराजांवर सर्व संतांनी अपार प्रेम केले, तसेच एकनाथ शिंदे म्हणजे माझ्यावर वारकरी संप्रदायाने भरभरून प्रेम केले. हा अनुभव मी स्वतः मनापासून घेतला आहे.

वारकरी संप्रदायासाठी जे जे आवश्यक होते, ते ते आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. इतिहासात प्रथमच वारकरी दिंड्यांना प्रत्येकी ₹२०,००० इतका निधी देण्याचा निर्णय घेतला गेला. यामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा विशेष समावेश होता. आजवर अनेक मुख्यमंत्री पंढरपूरला गेले; मात्र आम्ही एक नवा पायंडा पाडला आमचा पांडुरंग हा वारकऱ्यांच्या चरणांमध्ये आहे. आणि या वारकऱ्यांची सेवा केली, की पांडुरंगालाही आनंद होतो. ज्येष्ठाना एसटी मोफत, महिलांना अर्धे तिकीट... कित्येक योजना आणल्या व त्या सफल झाल्या..संपूर्ण पंढरपूर स्वच्छ, चकाचक आणि सुव्यवस्थित करण्याचे कार्य आपण केले. टोलमाफी, आरोग्य सुविधा, चरणसेवा अशा अनेक सेवाभावी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.

माझ्या लाडक्या बहिणी देखील हजारोंच्या संख्येत उपस्थित आहेत. अपार कष्ट मेहनत करून त्या प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालतात. या सर्व वारकरी लाडक्या बहिणींना देखील वंदन करतो. तुम्हीच आमच्या मुक्ताई, जनाबाई व माता गिरीजाबाई..

महाराजांचे नावावरून माझे नाव देखील आई-बाबांनी एकनाथ ठेवले. फरक फक्त एवढाच आहे एकनाथ महाराज पूर्णतः शांती ब्रह्म होते. आणि मी देखील महाराजांच्या विचारांवर पाऊल ठेवून त्यांच्या आशीर्वादाने प्रवास करत आहे. पण आपल्याला हे देखील विसरून चालणार नाही प्रसंगी हाती तलवार घेण्याची वेळ आली तर एकनाथ महाराजांनी तेही केले होते. आणि तोही गुण मी घेतलाय. महाराष्ट्र जेव्हा अडचणीत वाटला त्यावेळी आम्ही बंड देखील पुकारलं.. आणि मग महाराष्ट्राने पाहिलं की हा एकनाथ काय करू शकतो.. मग थेट करेक्ट कार्यक्रम होतो..महाराष्ट्राला प्रगतीचे विकासाचे दिवस आले ते केवळ संतांच्या विचारांमुळे.. त्यामुळे एकनाथ महाराजांचे सर्व गुण विचार आत्मसात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

आज जरी मी प्रत्यक्ष येऊ शकलो नसलो, तरी संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यास निश्चितच उपस्थित राहीन. पैठणच्या विकासासाठी आजपर्यंत जे कार्य केले आहे, ते पुढेही अधिक जोमाने सुरू राहील हीच ग्वाही देतो. महाराजांच्या समवेत त्यांचा संपूर्ण परिवारा विशेष करुन माई महाराज यांचे देखील मोठे योगदान आहे. या संपूर्ण परिवारास व सोहळ्यास मी शुभेच्छा देतो.

राम कृष्ण हरि..

- उप मुख्यमंत्री ना. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब

Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे Vilas Bhumare - विलास संदीपान भुमरे Shivsena - शिवसेना Yogiraj Maharaj Paithankar

 #ठाणे महानगरपालिका  - शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आ...
01/01/2026

#ठाणे महानगरपालिका -

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रवक्ता तथा शिवसना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षयमहाराज भोसले यांच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका प्रभागनिहाय समन्वयकांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Uday Ravindra Samant Shivsena - शिवसेना Naresh Mhaske Sanjay More - संजय भाऊराव मोरे

नवी मुंबई महानगरपालिका  - शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेन...
27/12/2025

नवी मुंबई महानगरपालिका -

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रवक्ता तथा शिवसना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षयमहाराज भोसले यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका प्रभागनिहाय समन्वयकांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Uday Ravindra Samant Shivsena - शिवसेना

महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्यभर समन्वयकांची तात्काळ नियुक्ती शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री...
27/12/2025

महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्यभर समन्वयकांची तात्काळ नियुक्ती शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षयमहाराज भोसले यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका क्षेत्रांसाठी निवडणूक समन्वयकांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sanjay More - संजय भाऊराव मोरे Shivsena - शिवसेना Dr Shrikant Eknath Shinde

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना सोलापूर पदाधिकारी संवाद बैठक, सुर्डी बार्शी येथे.Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr S...
12/11/2025

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना सोलापूर पदाधिकारी संवाद बैठक, सुर्डी बार्शी येथे.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde Pratap Sarnaik Purvesh Pratap Sarnaik

“आई, हे दुःख तुमचंच नाही... माझंही आहे. शासन तुमच्या पाठीशी ठाम उभं आहे. मी शब्द देतो, पुन्हा अशी वेळ कोणत्याही आईवर येऊ...
06/11/2025

“आई, हे दुःख तुमचंच नाही... माझंही आहे. शासन तुमच्या पाठीशी ठाम उभं आहे. मी शब्द देतो, पुन्हा अशी वेळ कोणत्याही आईवर येऊ देणार नाही.”

हे वाक्य कोणत्या नेत्याच नाही तर तुमच्या आमच्या आपल्या सर्वांना आपलस वाटणाऱ्या राज्याच्या कुटुंबप्रमुखाच आहे. ते संवेदन शील नेतृत्व म्हणजे राज्याचे उप मुख्यमंत्री ना. श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील रोहन विलास बोंबे या १३ वर्षांच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आज पुणे दौऱ्यावर असताना त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ना.साहेबांनी त्यांचे सांत्वन केले.

Shivsena - शिवसेना

कृपया प्रसिद्धीसाठी - भगवान कोकरे यांची कोकण विभाग समन्व्यक पदी केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येत आहे. Shivsena -...
15/10/2025

कृपया प्रसिद्धीसाठी -

भगवान कोकरे यांची कोकण विभाग समन्व्यक पदी केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येत आहे.

Shivsena - शिवसेना

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष Akshay Maharaj Bhosale यांच्या मार्गदर्शनाने श्री. मयूरजी थिटे यांना शिवसे...
22/08/2025

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष Akshay Maharaj Bhosale यांच्या मार्गदर्शनाने श्री. मयूरजी थिटे यांना शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना राज्य #उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.

यावेळी स्वत: आमचे आधारस्तंभ आदरणीय शिवसेना मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

Shivsena - शिवसेना
Dr Shrikant Eknath Shinde

#हिंदू

शिवसेना मुख्य नेते उप मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या आदेशाने  खासदार Dr Shrikant Eknath Shin...
03/08/2025

शिवसेना मुख्य नेते उप मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या आदेशाने खासदार Dr Shrikant Eknath Shinde दादा यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी वेदमूर्ती श्री.मयूरजी थेटे त्र्यंबकेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरला अ वर्ग दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.

सदर नियुक्ती तत्काळ लागू करण्यात येत आहे.

Shivsena - शिवसेना

20/07/2025
सस्नेह जय महाराष्ट्र !वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मानन...
10/07/2025

सस्नेह जय महाराष्ट्र !

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननिय श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेब (उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) आदेशाने खासदार Dr Shrikant Eknath Shinde दादा मार्गदर्शनानुसार शिवसेना पक्षाच्या धर्मवीर अध्यात्मिक सेना - ' हिंदू शक्ती ' विभाग राज्य समन्व्यक पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

Bendre Shivsena - शिवसेना Sanjay More - संजय भाऊराव मोरे

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share